खमंग कुरकुरीत मिरची भजी
प्रस्तावना:::

आहाहा मिरची भजी तोंडाला लगेच कसं पाणी सुटते… फक्त सणासुदीला आपण ही भजी करतो… किंवा छान पाऊस पडत असला की भजींची आठवण येते त्यासोबत केली जाणारी ही खमंग आणि कुरकुरीत अशी मिरची भजी… आणि त्यासोबत गरमागरम चहा….. पाऊस पडत असताना भजी खायची मजाच काही वेगळी असते….
साहित्य:::

- एक वाटी बेसन
- दहा ते बारा जाडी मिरच्या
- कोथिंबीर
- ओवा
- हळद
- मीठ
- तळण्यासाठी तेल
- चिमूटभर सोडा
- चार ते पाच थेंब लिंबूचा रस
कृती:::
एका पातेल्यात बेसन पीठ घालून त्यामध्ये पाव चमचा हळद घाला चवीप्रमाणे मीठ घाला… आणि चिरलेली कोथिंबीर घाला…
तसेच पाव चमचा ओवा घाला… आता यामध्ये पाणी घालून बेसन पीठ भिजवून घ्या… बेसन पिठाचे मिश्रण जास्त पातळही नको आणि जास्त घट्ट ही नको….
त्यानंतर बेसन पिठामध्ये चिमूटभर सोडा घालून त्यावर लगेचच लिंबाचा रस घाला… त्यामुळे सोडा ऍक्टिव्हेट होईल…

सोडा फस-फसल्यानंतर हळूच विस्करच्या साह्याने मिक्स करून घ्या…. मिश्रण हे चोराने फेटायची नाही… कारण आपल्याला मिश्रण स्पंजी बनवायचे आहे….

यामुळेच आपल्या भज्यांना खमंगपणा आणि कुरकुरीतपणा येणार आहे… आता मिरच्या मधून चिरून घ्या…
मिरच्या तेलामध्ये चांगल्या तांबूस रंगावर तळून घ्या… मिरच्या डिशमध्ये काढून घ्या त्यावर सर्व बाजूने मीठ लागेल या पद्धतीने मीठ लावून घ्या…

मिरच्यांना सर्व बाजूने मीठ लागले की मग… बेसनाच्या मिश्रणामध्ये मिरच्या भिजवून गरम तेलामध्ये तळा.. दोन्ही बाजूंनी मिर ची भजी चांगल्या तळून घ्या…

मिरची भजी एकदम कुरकुरीत आणि खमंग तयार झालेली असतील…. तर मग एन्जॉय करूया खमंग आणि कुरकुरीत मिरची भजी….

टिप्स:::
सोडा मिश्रणामध्ये अगदी चिमूटभरच घाला… त्यापेक्षा जास्त सोडा घालू नका… नाहीतर भजे तेलकट होतील…
वेळ व परिमाण::
तयारीची वेळ :१०मिनिटे
एकूण वेळ :३०मिनिट
परिमाण::२ व्यक्तीसाठी
