कोथींबीरीच्या वड्या(सांबारवडी)

by Vaishali Chaudhari

कोथींबीरीच्या वड्या


प्रस्तावना::

कोथींबीरीच्या वड्या या ऋतू नुसार केल्या जातात हिवाळ्यामध्ये कोथिंबीर जास्त प्रमाणात येते. त्यावेळेस कोथिंबिरीच्या वड्या केल्या जातात याला सांबारवडी असेही म्हटले जाते नागपूर भागामध्ये सांभारवाडी खूपच प्रसिद्ध आहे.


साहित्य::

  • दोन जोडी कोथिंबीर
  • 20 ते 25 लसूण पाकळ्या
  • एक इंच अद्रकाचा तुकडा
  • दहा ते पंधरा हिरव्या मिरच्या
  • एक मोठी वाटी बेसन
  • खसखस एक लहान वाटी
  • एक चमचा ओवा
  • एक चमचा जिरे
  • पाव चमचा हळद
  • तळण्यासाठी तेल
  • मीठ
  • पाणी


कृती:::

सर्वप्रथम कोथिंबीर निवडून तोडून घ्या कोथिंबीर स्वच्छ फक्त पाणी पाणी घ्या त्यामध्ये कोथिंबीरीच्या काड्या घेऊ नका.

हे कोथिंबीरीचे पाने स्वच्छ दोन ते तीन पाण्यामध्ये धुऊन घ्या. कोथिंबिरीचे पाणी बारीक असे चिरून घ्या. मिक्सरच्या भांड्यामध्ये अद्रक लसूण हिरव्या मिरच्या एक चमचा जिरे घालून त्याची बारीक अशी पेस्ट करून घ्या.

एका तगारीत किंवा मोठ्या पातेल्यात चिरलेली कोथिंबीर घाला त्यावर अद्रक लसूण मिरचीची पेस्ट घाला. त्यामध्ये एक वाटी बेसन घाला.

त्यावर पाव चमचा हळद चवीप्रमाणे मीठ ओवा हातावर चुरून मग त्यात घाला. त्यानंतर त्यामध्ये एक पळी तेल घाला.

तीळ घातल्यामुळे आपल्या कोथिंबीरीच्या वड्या मऊसूत येतील. कोथिंबीर च्या वड्यांमध्ये आपण बेसन आपल्या गरजेनुसार घालू शकतो.

मी येथे बेसनाचा वापर कमीत कमी केलेला आहे. पण तुम्हाला जर जास्त आवडत असतील तर तुम्ही अजून पाव वाटी बेसन अजून त्यात घालू शकतात. आता यावर पाण्याचा शिपका मारून त्याचा गोळा मळून घ्या.

गोळा हा साधारण मऊसर असावा लागल्यास तुम्ही पाण्याचा वापर करू शकतात. पण पीठ एकदम पातळ भजी रवण प्रमाणे करू नये.

आता आपण एका ताटाला ब्रशच्या साह्याने तेल लावून घेऊ. कढईमध्ये पाणी घालून त्यामध्ये स्टॅन्ड ठेवा आणि पाण्याला चांगल्या उकळ्या येऊ द्या.

आता आपण ज्या ताटाला तेल लावले आहे त्यामध्ये कोथिंबीरच्या मिश्रणाचा गोळा थापून घ्या. या थापलेल्या मिश्रणावर एक चम्मच खसखस पसरवून घाला ती अलगद हाताने थापून घ्या.

म्हणजे ती त्याला चिटकून राहील. हे ताट कढईमध्ये ठेवलेल्या स्टॅन्ड वर ठेवा. आणि त्यावर पक्के झाकण ठेवा.आता हे मिश्रण साधारण पंधरा मिनिटे वाफवून घ्या.

त्यानंतर गॅस बंद करा. आणि झाकण अलगद काढून त्यामधील ताट बाहेर काढा. त्यानंतर एका सुरीला तेल लावून आपण त्याचे चौकोनी काप करून घेऊ.

काप केल्यानंतर वड्या काढून घेऊ या. याचप्रमाणे आपण जे मिश्रण केलेले आहे पुन्हा एका ताटाला तेल लावून उर्वरित मिश्रणाची ही आपण वड्या वाफवून घेऊ या.

आता या वड्या काढल्यानंतर एका पॅनमध्ये कडकडीत तेल गरम करा आणि दोघांसाठी हा वड्या तळून घ्या .त्या तांबूस रंगावर छान तळून घ्या.

तुम्हाला जर तळलेल्या आवडत नसल्यास एका पॅनमध्ये अगदी थोडे तेल घालून दोघं बाजूने तुम्ही तांबूस रंग येईपर्यंत तुम्ही या दोघ बाजूने भाजून घेऊ शकतात .

या वड्याही चवीला अत्यंत अप्रतिम लागतात. तर चला तर मग मैत्रिणींनो आपल्या कोथिंबीरीच्या वड्या गरमागरम तयार झाले आहेत….

या तुम्ही पुदिन्याच्या चटणीसोबत किंवा चिंचेच्या चटणी सोबत टोमॅटो सॉस सोबत खाऊ शकतात… तयार आहे गरमागरम कोथिंबीरीच्या वड्या…..


टिप्स::

कोथिंबीरीच्या वड्या करताना तुम्ही त्यामध्ये एक ते दोन पळी तेल नक्की घाला त्यामुळे वड्या मऊ होतात आणि तळल्यानंतर खायला एकदम खरपूस लागतात. तुम्ही इथे दोन चिमटी सोडा सुद्धा वापरु शकतात.

वेळ व परिमाण::
तयारीची वेळ :१०मिनिटे
एकूण वेळ ::४०मिनिटे

परिमाण :पाच व्यक्तींसाठी

You may also like

Leave a Comment

अन्न हे पूर्ण ब्रम्ह
सर्वाना नमस्कार
• अन्न हे केवळ पोटभरण्यासाठी नसून ते एक पवित्र आणि आवश्यक गोष्ट आहे, ज्यातून जीवन जगण्यासाठी ऊर्जा मिळते
• अन्न हे जीवन जगण्याचा आणि ऊर्जेचा मुख्य स्रोत आहे. ते शरीराचे पोषण करते आणि स्वस्थ आरोग्य सुधारण्यास मदत करते.
• अन्न ग्रहण करताना आपण अन्नचा आदर केला पाहिजे. हळू खाणे, त्याची चव घेणे आणि कृतज्ञता बाळगणे हे महत्त्वाचे आहे.
• ‘पूर्ण’ म्हणजे संपूर्ण आणि ‘ब्रह्म’ म्हणजे निर्मिती किंवा वाढ. या वाक्यातून अन्न हे केवळ पोट भरणारे नसून ते एक दैवी देणगी आहे.
• योग्य आणि पौष्टिक अन्न घेतल्याने शरीर निरोगी राहते. तसेच, अन्नाचा आदर केल्याने मानसिक शांतता मिळते.
आज विविध प्रसार माध्यमातून अनेक पुस्तके, youtube video, reals, कार्यक्रमाच्या मध्यमातून अनेक व्यंजनाच्या पाककृती आपणास बघायला मिळतात.
ह्या वेबसाइट च्या माध्यमातून महाराष्ट्रीयन खाद्य संस्कृती मधील व्यंजन बनविण्याची ते ही पारंपरिक पद्धतीने बनविण्याची कृती याद्वारे आपल्या पर्यन्त पोहचविण्याचा प्रयत्न करीत आहोत. याचा उपयोग निश्चितच पूर्ण ब्रह्माचा आस्वाद घेण्याऱ्या खव्वये, यांना होईल.

Visitor’s Counter

4331

© 2025 All Rights Reserved | Developed by Vaishali Ajay Chaudhari & Amol Gopal Zambare. || Maintenance by A2Z Web Solutions.