कुरकुरीत मसाला मखाना

by Vaishali Chaudhari

कुरकुरीत मसाला मखाना


प्रस्तावना::

मखाना हा आरोग्यासाठी एकदम चांगला असतो त्यामध्ये भरपूर प्रमाणात मॅग्नेशियम कॅल्शियम लोह पोटॅशियम ही खनिजे भरपूर प्रमाणात असतात याचा वापर हाडे मजबूत करण्यासाठी होतो….


साहित्य::

  • १ वाटी मखाने
  • एक चमचा काळे मीठ
  • एक चमचा चाट मसाला
  • दोन चिमूट एवढे तिखट
  • दोन चमचे साजूक तूप


कृती::

गॅसवर एका कढईमध्ये दोन चमचे तूप घाला तूप गरम झाल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा काळे मीठ घाला अर्धा चमचा चाट मसाला घाला..

दोन चिमूट इतके तिखट घाला आणि व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि एक वाटी मखाने घाला..

आता हे सर्व दोन ते तीन मिनिटे चांगले व्यवस्थित परतून घ्या. यामुळे मखाने खरपूस भाजले जातील. मखाने सतत ढवळत रहा.

मखाने अल्टी पलटी करत रहा…. मखाण्यांमध्ये एक कुरकुरीतपणा निर्माण होईल… मखाने चांगले दोन ते तीन मिनिटे व्यवस्थित परतून घ्या.

आता ती खाली एका बाऊलमध्ये काढून घ्या त्यावर उरलेले अर्धा चमचा काळे मीठ आणि अर्धा चमचा चाट मसाला घालून व्यवस्थित मिक्स करून घ्या…..

आता आपले मखाने चांगले व्यवस्थित परतून झालेले आहे आपले मसाला मखाने तयार झालेले आहे. ….


टिप्स::

मखाने करत असताना गॅसची आस मंद ठेवा.. त्यामुळे मखाने खरपूस असे भाजले जातील नाहीतर मखाने जळू शकतात..

लहान मुले मखाने डायरेक खात नाही त्यामुळे त्यांना मसाले मखाने करून दिल्यास ते आवडीने खातात….

Leave a Comment

अन्न हे पूर्ण ब्रम्ह
सर्वाना नमस्कार
• अन्न हे केवळ पोटभरण्यासाठी नसून ते एक पवित्र आणि आवश्यक गोष्ट आहे, ज्यातून जीवन जगण्यासाठी ऊर्जा मिळते
• अन्न हे जीवन जगण्याचा आणि ऊर्जेचा मुख्य स्रोत आहे. ते शरीराचे पोषण करते आणि स्वस्थ आरोग्य सुधारण्यास मदत करते.
• अन्न ग्रहण करताना आपण अन्नचा आदर केला पाहिजे. हळू खाणे, त्याची चव घेणे आणि कृतज्ञता बाळगणे हे महत्त्वाचे आहे.
• ‘पूर्ण’ म्हणजे संपूर्ण आणि ‘ब्रह्म’ म्हणजे निर्मिती किंवा वाढ. या वाक्यातून अन्न हे केवळ पोट भरणारे नसून ते एक दैवी देणगी आहे.
• योग्य आणि पौष्टिक अन्न घेतल्याने शरीर निरोगी राहते. तसेच, अन्नाचा आदर केल्याने मानसिक शांतता मिळते.
आज विविध प्रसार माध्यमातून अनेक पुस्तके, youtube video, reals, कार्यक्रमाच्या मध्यमातून अनेक व्यंजनाच्या पाककृती आपणास बघायला मिळतात.
ह्या वेबसाइट च्या माध्यमातून महाराष्ट्रीयन खाद्य संस्कृती मधील व्यंजन बनविण्याची ते ही पारंपरिक पद्धतीने बनविण्याची कृती याद्वारे आपल्या पर्यन्त पोहचविण्याचा प्रयत्न करीत आहोत. याचा उपयोग निश्चितच पूर्ण ब्रह्माचा आस्वाद घेण्याऱ्या खव्वये, यांना होईल.

Visitor’s Counter

5684

© 2025 All Rights Reserved | Developed by Vaishali Ajay Chaudhari & Amol Gopal Zambare. || Maintenance by A2Z Web Solutions.