खुसखुशीत बटाटा भजी

by Vaishali Chaudhari
0 views

खुसखुशीत बटाटा भजी


प्रस्तावना::

बटाटा भजी तर आपण नेहमीच खातो… पण हॉटेल स्टाईल जर मिळाले एकदम खुसखुशीत अशी भजी मिळाली तर किती छान…. त्याच पद्धतीने आपण भजी आता बनवणार आहे…


साहित्य:::

  • एक वाटी बेसन
  • एक बटाटा
  • कोथिंबीर
  • पाव चमचा हळद
  • चवीप्रमाणे मीठ
  • पाव चमचा ओवा
  • चिमूटभर सोडा
  • चार ते पाच थेंब लिंबू चा रस
  • पाणी
  • तळण्यासाठी तेल


कृती::

एक वाटी बेसनामध्ये पाव चमचा हळद चवीप्रमाणे मीठ ओवा घालून त्यामध्ये पाणी घालून मिडीयम असे मिश्रण करून घ्या….

जास्त घट्टही नको आणि जास्त पातळही नको असे मिश्रण आपल्याला तयार करायचे आहे… यामध्ये चिरलेली कोथिंबीर घाला…

हे मिश्रण तयार झाल्यानंतर भजी आपल्याला एकदम कुरकुरीत येण्यासाठी… चिमूटभर सोडा घालून त्यावर लिंबाच्या रसाचे चार ते पाच थेंब घाला…

म्हणजे सोडा ऍक्टिव्हेट होईल…. सोडा ऍक्टिव्हेट झाल्यानंतर विस्करच्या साह्याने हळूहळू मिश्रणामध्ये मिक्स करून घ्या….

मिश्रण हे जोरात मिक्स करायचे नाही…. त्यामुळे सर्व भज्यांचे रवण स्पंजीदार होईल…. आणि आपली भजी कुरकुरीत आणि खुसखुशीत होतील….

आता आपण बटाटा घेऊन सोलून घ्या… आणि बटाट्याच्या किसणीवर त्याच्या स्लाईस पाडून घ्या…

मीठ लावून घ्या… आता बटाट्याच्या स्लाईस बेसनाच्या मिश्रणामध्ये घाला…. आणि बटाटा भजी तळून घ्या….

व्यवस्थित करून घ्या भजी एकदम कुरकुरीत आणि खमंग अशी होतील… तर आपण एन्जॉय करूया हॉटेल स्टाईल बटाटा भजी….

टिप्स:::

सोडा अगदी चिमूटभर घालावा.. कारण सोन्याचे प्रमाण जर वाढले तर भजी तेलकट होतील…


वेळ व परिमाण:::
तयारीची वेळ:५ मिनिटे
एकूण वेळ ::२०मिनिटे
परिमाण: एका व्यक्तीसाठी

You may also like

Leave a Comment

अन्न हे पूर्ण ब्रम्ह
सर्वाना नमस्कार
• अन्न हे केवळ पोटभरण्यासाठी नसून ते एक पवित्र आणि आवश्यक गोष्ट आहे, ज्यातून जीवन जगण्यासाठी ऊर्जा मिळते
• अन्न हे जीवन जगण्याचा आणि ऊर्जेचा मुख्य स्रोत आहे. ते शरीराचे पोषण करते आणि स्वस्थ आरोग्य सुधारण्यास मदत करते.
• अन्न ग्रहण करताना आपण अन्नचा आदर केला पाहिजे. हळू खाणे, त्याची चव घेणे आणि कृतज्ञता बाळगणे हे महत्त्वाचे आहे.
• ‘पूर्ण’ म्हणजे संपूर्ण आणि ‘ब्रह्म’ म्हणजे निर्मिती किंवा वाढ. या वाक्यातून अन्न हे केवळ पोट भरणारे नसून ते एक दैवी देणगी आहे.
• योग्य आणि पौष्टिक अन्न घेतल्याने शरीर निरोगी राहते. तसेच, अन्नाचा आदर केल्याने मानसिक शांतता मिळते.
आज विविध प्रसार माध्यमातून अनेक पुस्तके, youtube video, reals, कार्यक्रमाच्या मध्यमातून अनेक व्यंजनाच्या पाककृती आपणास बघायला मिळतात.
ह्या वेबसाइट च्या माध्यमातून महाराष्ट्रीयन खाद्य संस्कृती मधील व्यंजन बनविण्याची ते ही पारंपरिक पद्धतीने बनविण्याची कृती याद्वारे आपल्या पर्यन्त पोहचविण्याचा प्रयत्न करीत आहोत. याचा उपयोग निश्चितच पूर्ण ब्रह्माचा आस्वाद घेण्याऱ्या खव्वये, यांना होईल.

Visitor’s Counter

7477

© 2025 All Rights Reserved | Developed by Vaishali Ajay Chaudhari & Amol Gopal Zambare. || Maintenance by A2Z Web Solutions.