मसाला बटाटा डोसा
प्रस्तावना:
इडली डोसा हा केरळ मधील प्रसिद्ध असा पदार्थ आहे. त्यांचे रोजचे खाद्य आहे.
डोसा:-
साहित्य:
३ वाट्या तांदूळ,
दीड वाटी उडीद डाळ,
१ वाटी हरभरा डाळ,
मीठ ,पाणी, चिमटीभर सोडा

कृती: तांदूळ, उडदाची डाळ आणि हरभऱ्याची डाळ वेगवेगळ्या भांड्यांमध्ये रात्री भिजत घालून ठेवावे. सकाळी तांदूळ आणि दोन्ही डाळी स्वच्छ धुऊन घ्याव्यात.
हे मिश्रण मिक्सरमध्ये एकदम बारीक वाटण करावे.
एकदम पतले वाटावे. त्यात मीठ व चिमूटभर सोडा घाला आणि रवण चांगले फेटून घ्या.
संध्याकाळी या रवणाचा डोसा बनवू शकतात.
डोसा तव्यावर तेल लावून डोसे काढून घ्या. डोसा तयार आहे.
बटाट्याची भाजी
साहित्य:

३ मोठे बटाटे,
१ कांदा,
१० लसूण पाकळ्या,
अर्धा इंच अद्रक तुकडा,
१० हिरव्या मिरच्या,
कढीपत्ता, जिरे
हळद,
कोथिंबीर, मीठ,
फोडणीसाठी तेल
कृती:
तीन बटाटे कुकरमध्ये दोन तीन शिट्ट्या होऊन वाफवून घ्या. बटाटे सोलून घ्या.
बटाटे चिरून घ्या. कांदा चिरून घ्या. अद्रक लसूण हिरवी मिरची ची पेस्ट बनवून घ्या.
एका कढईमध्ये तेल गरम करून त्यात जिरे घालून कढीपत्ता,कांदा परतवा.
अद्रक लसूण मिरचीची पेस्ट घालून परतवा. पाव चमचा हळद घाला.
उकडलेले चिरलेले बटाटे घाला आणि परतवून घ्या.
चवीप्रमाणे मीठ घाला. चिरलेली कोथिंबीर घाला.
भाजी परतवून घ्या. बटाट्याची भाजी तयार आहे.

टिप्स:
रवण वाटताना एकदम बारीक वाटा. रवणामध्ये हरभऱ्याची डाळ घालावी कारण त्यामुळे डोसे कुरकुरीत होतात.

वेळ व परिमाण:
तयारीची वेळ: ३० मिनिटे
एकूण वेळ: १ तास
परिमाण: २ जणांसाठी
