मिक्स भाज्यांची मसाला भाजी

by Vaishali Chaudhari

मिक्स भाज्यांची मसाला भाजी


प्रस्तावना::

मिक्स भाज्यांची मसाला भाजी ही पूर्वीपासून केली जाणारी भाजी आहे मसाले भाजी म्हटली की कोणी पाहुणे आले ना की आवर्जून केली जाते. आणि मसाले भाजीचा बेत जर असला तर पाहुण्यांना तर झक्कास वाटते.

साहित्य::

  • पाव किलो फ्लावर
  • तीन मोठे बटाटे
  • एक वाटी वाटाणे
  • तीन कांदे
  • वीस ते पंचवीस खोबऱ्याचे काप
  • कोथिंबीर
  • दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या
  • अर्धा इंच अद्रकाचा तुकडा
  • दोन चमचे तिखट
  • पाव चमचा हळद
  • एक चमचा धने पूड
  • अर्धा चमचा गरम मसाला
  • एक तेजपान
  • जिरे
  • मोहरी
  • मीठ
  • पाणी


कृती::

पाव किलो फ्लावर धून कापून घ्या. बटाटे धुवून सोलून मोठ्या पिसेस मध्ये कापून घ्या. फ्लावर बटाटा वाटाणा धुवून घ्या .

आणि एका पातेल्यामध्ये पाणी घालून फ्लावर बटाटा वाटाण वाफवून घ्या. साधारण दहा मिनिटे वाफवून घ्या.


चटणीची कृती:

एका पॅनमध्ये चिरलेला कांदा चांगला तांबूस रंगावर भाजून घ्या त्यामध्ये हवे तर तुम्ही थोडे तेलाचे पाच सहा थेंब घालून भाजू शकतात.

आता खोबऱ्याचे कापही तांबूस रंगापर्यंत भाजून घ्या. मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजलेला कांदा भाजलेले खोबरं लसणाच्या पाकळ्या अद्रकाचा तुकडा दोन चमचे तिखट घालून बारीक अशी पाणी घालून चटणी (पेस्ट) करा. आता आपली चटणी तयार झालेली आहे.


एका कढईमध्ये कडकडीत तेल गरम करा. कडकडीत तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिरे मोहरी फोडणी घाला.

जिरे मोहरी फोडणी घातल्यानंतर त्यात तेलच पान घाला. त्यामध्ये मसाला चटणी घाला. आता ही चटणी तेल सुटेपर्यंत सारखी परतवत राहा.

चटणी खाली लागू देऊ नका. चटणी सतत परतवत राहा. चटणी मध्ये पाव चमचा हळद एक चमचा तिखट एक चमचा धना पूड एक चमचा गरम मसाला घालून चांगले परतवून घ्या.

चटणीला तेल सुटल्यानंतर आपण जे फ्लावर बटाटा वाटाण्याचे वाफवून घेतलेले मिश्रण पाण्यासकट घाला.

आता हे व्यवस्थित एकत्र करून घ्या. भाजीला चांगल्या दोन उकड्या येऊ द्या. भाजीवर अर्धवट झाकण ठेवा.

उकडी आल्यानंतर आपल्या चवीप्रमाणे त्यामध्ये मीठ घाला. चिरलेली कोथिंबीर घाला. मीठ घातल्यानंतर भाजीला पुन्हा दोन ते तीन उकळ्या येऊ द्या.

भाजीला चांगला मस्तपैकी तवंग (लाल तरी) आलेला असेल. आता भाजीचा गॅस बंद करा. आपण ही भाजी पोळी चपाती भाकरी या सोबत खाऊ शकतो.

तसेच जीरा भातासोबत अत्यंत अप्रतिम चवीला लागते…. चला तर मग आपली मिक्स मसाला भाजी तयार झालेली आहे या मंडळी जेवायला मिक्स मसाला भाजी खायला……..


टिप्स::

आपण ज्यावेळेस कांदा खोबरं लसूण अद्रक याचा मसाला करतो त्यावेळेस आपण रसगुल्ला मिरची किंवा मद्रास चपाटा मिरचीचा वापर करू शकतो. या मिरचीचे प्रमाण साधारण एका व्यक्तीसाठी दोन मिरच्या याप्रमाणे आपण घेऊ शकतो.


वेळ व परिमाण::


तयारीची वेळ:२० मिनिटे
एकूण वेळ :३०मिनिटे
परिमाण :चार व्यक्तींसाठी

You may also like

Leave a Comment

अन्न हे पूर्ण ब्रम्ह
सर्वाना नमस्कार
• अन्न हे केवळ पोटभरण्यासाठी नसून ते एक पवित्र आणि आवश्यक गोष्ट आहे, ज्यातून जीवन जगण्यासाठी ऊर्जा मिळते
• अन्न हे जीवन जगण्याचा आणि ऊर्जेचा मुख्य स्रोत आहे. ते शरीराचे पोषण करते आणि स्वस्थ आरोग्य सुधारण्यास मदत करते.
• अन्न ग्रहण करताना आपण अन्नचा आदर केला पाहिजे. हळू खाणे, त्याची चव घेणे आणि कृतज्ञता बाळगणे हे महत्त्वाचे आहे.
• ‘पूर्ण’ म्हणजे संपूर्ण आणि ‘ब्रह्म’ म्हणजे निर्मिती किंवा वाढ. या वाक्यातून अन्न हे केवळ पोट भरणारे नसून ते एक दैवी देणगी आहे.
• योग्य आणि पौष्टिक अन्न घेतल्याने शरीर निरोगी राहते. तसेच, अन्नाचा आदर केल्याने मानसिक शांतता मिळते.
आज विविध प्रसार माध्यमातून अनेक पुस्तके, youtube video, reals, कार्यक्रमाच्या मध्यमातून अनेक व्यंजनाच्या पाककृती आपणास बघायला मिळतात.
ह्या वेबसाइट च्या माध्यमातून महाराष्ट्रीयन खाद्य संस्कृती मधील व्यंजन बनविण्याची ते ही पारंपरिक पद्धतीने बनविण्याची कृती याद्वारे आपल्या पर्यन्त पोहचविण्याचा प्रयत्न करीत आहोत. याचा उपयोग निश्चितच पूर्ण ब्रह्माचा आस्वाद घेण्याऱ्या खव्वये, यांना होईल.

Visitor’s Counter

4319

© 2025 All Rights Reserved | Developed by Vaishali Ajay Chaudhari & Amol Gopal Zambare. || Maintenance by A2Z Web Solutions.