मुळ्याचे पानाचे सॅलेड

by Vaishali Chaudhari

मुळ्याचे पानाचे सॅलेड


प्रस्तावना::

कुठल्याही सॅलडची शरीराला अत्यंत गरज असते कारण त्यामुळे आपल्याला शरीराला फायबर प्राप्त होतात. त्यामुळे थोडेफार कच्च्या भाज्या खाण्या गरजेच्या आहेत पण ते काही प्रमाणात खाल्ल्या जात नाही त्यामुळे त्याचे सॅलड बनवून खाल्ल्यास आवडीने खातात.


साहित्य::

  • मुळ्याची चार ते पाच पाने
  • तीन टोमॅटो
  • एक गाजर
  • अर्धा मुळ्याचा तुकडा
  • एक हिरवी मिरची
  • एक कांदा
  • अर्धा लिंबू
  • चाट मसाला
  • काळे मीठ
  • तिखट


कृती::


मुळ्याची पाने स्वच्छ धुऊन घ्या. धुतल्यानंतर मुळ्याची पाने एकदम बारीक चिरून घ्या. गाजर दोन शिलनी च्या साह्याने मुळा आणि गाजर शिलुन घ्या.

मुळा आणि गाजर शिजल्यानंतर किसणीवर गाजराचा आणि मुळ्याचा कीस पाडून घ्या. मिरचीचे बारीक काप करून घ्या.

कांदा सोलून बारीक चिरून घ्या. टोमॅटो ही बारीक कापून घ्या. आता हे सर्व साहित्य कापल्यानंतर एका बाऊलमध्ये गाजर मुळा टोमॅटो कांदा, मुळ्याचा पाला मिरची हे सर्व चिरलेले साहित्य एकत्र करून घ्या..

साहित्य एकत्र केल्यानंतर त्यावर थोडे चवीप्रमाणे काळे मीठ आपल्या आवडीप्रमाणे तिखट घाला मी इथे पाव चमचा घातलेला आहे.

आणि चाट मसाला अर्धा चमचा घाला आणि अर्धी लिंबू पिळून टाका. आणि सर्व मिश्रण एकत्र व्यवस्थित मिक्स करा.

आपल्या मुळ्याच्या पानांचा खुळा तयार झालेला आहे हे सॅलड अत्यंत चवदार लागते आणि हे कुठल्याही भाजी पोळी सोबत आपण खाऊ शकतो.

सॅलडची शरीराला फार गरज असते. त्यामुळे आपण रोज करू शकलो तर खूपच छान.. नाहीतर दिवसातून एकदा किंवा दोन दिवसात ना एकदा जरी खाल्ले तरी शरीराला योग्य ते फायबर्स मिळतात….


टिप्स::

इथे मी फक्त मुळ्याच्या पालाचा वापर केला आहे तुमच्याकडे अजून काही जसे की पत्ताकोबी कांद्याची पात इतर कोणत्या भाज्या तुम्हाला आवडत असतील ज्या की तुम्ही कच्च्या खाऊ शकतात त्या तुम्ही एकत्र करू शकतात..


वेळ व परिमाण::


एकूण वेळ::२० मिनिटे
परिमाण: २ व्यक्तीसाठी

You may also like

Leave a Comment

अन्न हे पूर्ण ब्रम्ह
सर्वाना नमस्कार
• अन्न हे केवळ पोटभरण्यासाठी नसून ते एक पवित्र आणि आवश्यक गोष्ट आहे, ज्यातून जीवन जगण्यासाठी ऊर्जा मिळते
• अन्न हे जीवन जगण्याचा आणि ऊर्जेचा मुख्य स्रोत आहे. ते शरीराचे पोषण करते आणि स्वस्थ आरोग्य सुधारण्यास मदत करते.
• अन्न ग्रहण करताना आपण अन्नचा आदर केला पाहिजे. हळू खाणे, त्याची चव घेणे आणि कृतज्ञता बाळगणे हे महत्त्वाचे आहे.
• ‘पूर्ण’ म्हणजे संपूर्ण आणि ‘ब्रह्म’ म्हणजे निर्मिती किंवा वाढ. या वाक्यातून अन्न हे केवळ पोट भरणारे नसून ते एक दैवी देणगी आहे.
• योग्य आणि पौष्टिक अन्न घेतल्याने शरीर निरोगी राहते. तसेच, अन्नाचा आदर केल्याने मानसिक शांतता मिळते.
आज विविध प्रसार माध्यमातून अनेक पुस्तके, youtube video, reals, कार्यक्रमाच्या मध्यमातून अनेक व्यंजनाच्या पाककृती आपणास बघायला मिळतात.
ह्या वेबसाइट च्या माध्यमातून महाराष्ट्रीयन खाद्य संस्कृती मधील व्यंजन बनविण्याची ते ही पारंपरिक पद्धतीने बनविण्याची कृती याद्वारे आपल्या पर्यन्त पोहचविण्याचा प्रयत्न करीत आहोत. याचा उपयोग निश्चितच पूर्ण ब्रह्माचा आस्वाद घेण्याऱ्या खव्वये, यांना होईल.

Visitor’s Counter

4319

© 2025 All Rights Reserved | Developed by Vaishali Ajay Chaudhari & Amol Gopal Zambare. || Maintenance by A2Z Web Solutions.