निस्त्याची चटणी
प्रस्तावना :-
निस्त्याची चटणी ही खान्देश भागातील पारंपारिक चटणी आहे. ही कळण्याच्या भाकरी सोबत आवर्जून खाल्ली जाते.अरे वा निस्ताची चटणी आणि कळण्याची भाकर आणि मेथीची भाकर मस्त बेत…. होऊन जाऊ या देऊ पार्टी….
साहित्य :-
- १ कांदा
- ६ रसगुल्ला मिरच्या
- सहा लसूण पाकळ्या
- कोथिंबीर
- मीठ
- एक चिंच (बी नसलेली)
- चमचाभर गूळ
कृती:-
सर्वप्रथम लाल मिरच्यांची नाके काढून घ्या. कांदा सोलून बारीक चिरून घ्या. लसणाच्या पाकळ्या सोलून घ्या.
तवा गरम करून त्यावर सहा रसगुल्ला मिरच्या चांगल्या खरपूस अशा तेल घालून भाजून घ्या. त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये चिरलेला कांदा भाजलेल्या रसगुल्ला मिरच्या, लसणाच्या पाकळ्या आणि थोडे चवीप्रमाणे मीठ घाला. .
यामध्ये दोन-तीन खडे गुळाचे आणि बिन असलेली चिंच घाला. या मिश्रणामध्ये थोडे पाणी घालून चांगले मिक्सरमध्ये चटणी करून घ्या.
सर्वात शेवटी कोथिंबीर घालून पुन्हा एकदा मिक्सरमध्ये फिरवून घ्या. आता ही तयार चटणी एका पातेल्यामध्ये काढून घ्या त्यामध्ये आपल्या आवडीप्रमाणे पाणी घाला.
ही चटणी जास्त पातळ नसते ती भाकरीवर मध्यभागी ठेवून त्यावर तेल घेऊन आपण खातो त्यामुळे चटणी ही घट्टसरच असावी.
नाहीतर मग निष्ठाची चटणी आपली खाण्यास तयार झालेली आहे. ही चटणी फारच झणझणीत असते त्यामुळे याला निसत्याची चटणी असे म्हटले जाते.
कारण यामध्ये मिरच्यांचा वापर केलेला आहे येथे मी रसगुल्ला मिरच्यांचा वापर केलेल्या आहे. तुम्ही मद्रास सपाटा मिरचीचाही वापर करू शकतात.
ज्यांना तिखट आवडते त्यांनी मद्रास सपाटा मिरच्यांचे प्रमाण एक दोन मिरची कमीने घेतले तरी चालेल. मात्र इतर बारीक मिरच्या घेऊ नये कारण चटणीला लालकटपणा येत नाही.
रसगुल्ला मिरच्या वापरल्याने चटणी एकदम लालसर येते आणि चवी सही छान लागते. खूप अशी तिखटही लागत नाही.
तर ही आंबट गोड तिखट अशी चटणी आपली तयार झालेली आहे आता ही चटणी आपण मेथीची भाकरी किंवा कळण्याची भाकरी या दोघ भाकरी सोबत खाऊ शकतो. मेथीच्या भाकरी ची रेसिपी मी माझ्या पुढच्या रेसिपी मध्ये लवकरच शेअर करेल…..
टिप्स:-
चटणी मध्ये रसगुल्ला मिरच्याच वापराव्या नाहीतर चटणी एकदम तिखट होईल. किंवा चपाटा मिरच्याही वापरू शकतात.
वेळ व परिमाण:
तयारीची वेळ-१० मिनिटे
एकूण वेळ ३० मिनिटे
परिमाण -चार जणांसाठी
