सेंद्रिय गुळ पावडर लाडू
प्रस्तावना:::

सेंद्रिय गुळाचे लाडू हे अत्यंत पौष्टिक असून त्या कुळामध्ये कुठल्याही केमिकल वापरले गेलेले नसते. त्यामुळे ती शरीरासाठी अत्यंत उपयुक्त असे असते त्यामुळे शरीराला कुठल्याही अपाय होत नाही.
साहित्य:

- १ वाटी तीळ
- १ वाटी सेंद्रिय गुड पावडर पाच ते सहा खडे पिवळ्या गुळाचे
- १ वाटी तूप
कृती:
सर्वप्रथम तीळ निवडून स्वच्छ करून घ्या. गॅसवर कढई गरम करा त्यामध्ये तीळ खरपूस अशी भाजून घ्या.
तीळ गरम गरम असतानाच आपण त्याचा वापर करणार आहोत. कडे मध्ये थोडा गुळ गरम करून घ्या. मिक्सरच्या भांड्यामध्ये गूळ घालून फिरवून घ्या.
नंतर त्यामध्ये गरम गरम अशी तीळ घाला. आणि मिक्सरवर सिम सिम असे फिरवून घ्या. हे मिश्रण पूर्ण गरम झालेले असेल त्यामुळे गूळ वितळून त्याचा गोळा तयार होईल.
हे मिश्रण डिश मध्ये काढून घ्या. मिश्रण जर घुगरं वाटत असल्यास त्याचे लाडू वळणार नाही. या मिश्रणामध्ये तूप वितळवून त्यामध्ये तूप घाला.

आता त्याचे लाडू वळून घ्या. आपल्याला जर त्यामध्ये तूप घालायचं नसेल जर लाडू वळत असल्यास डायरेक्ट पण लाडू वळले तरी चालतील.

येथे पण दुधाचा वापर करू शकतो पण दूध घातल्यास लाडू जास्त दिवस टिकत नाही.(एका कुकरमध्ये डिश ठेवून त्यावर गुळाचा डब्बाठेवा.
डब्याला झाकण आवश्यक आहे. कारण गुळामध्ये पाणी घुसता कामा नये.डब्यामध्ये गुळ घालून एक शिट्टी घेऊन घ्या.
या पाकामध्ये सुद्धा तुम्ही तीळ घालून मऊ लाडू वळून घ्या. एकदम सोपी पद्धत आहे.) पण हे लाडू मी पाप न करताच केलेले आहे हे लाडू ही अत्यंत मऊ होतात.
चवीलाही एकदम छान लागतात. कारण यामध्ये नैसर्गिक गुळाचा वापर केलेला आहे. नैसर्गिक गुळाला एक त्याची स्वतःची वेगळी चव असते त्यामुळे ते लाडूलाही चव येते.
टिप्स::

लाडू मध्ये दूध घालण्याऐवजी खूपच घाला आणि शक्य तेवढं गरम गरम केळीचा वापर करा म्हणजे दूध आणि तूप या दोघांचाही वापर करावा लागणार नाही.
वेळ व परिमाण::
तयारीची वेळ: १० मिनिटे
एकूण वेळ: २० मिनिटे
परिमाण:३ जणांसाठी
