गुळाचा शिरा
प्रस्तावना::

गुळाचा शिरा हा आजीच्या बटव्यातील पारंपारिक गोडाचा पदार्थ आहे. अत्यंत पौष्टिक असून हिवाळ्यात तर आपण दररोज खाऊ शकतो.
साहित्य::

- १ वाटी रवा,
- १ वाटी गुळ,
- १० मनुका,
- १० काजू,
- १० बदामाचे काप,
- अर्धी वाटी तूप
- वेलची पावडर
कृती::
प्रथम एका पातेल्यामध्ये पाणी गरम करा त्यामध्ये एक वाटी गूळ घाला.
गूळ वितळेपर्यंत गुळाचे पाणी करून घ्या. गुळ वितळला की गुळाचे पाणी चांगले चाळणीने गाळून घ्या.
गुळामध्ये बऱ्याचदा कचरा असतो त्यामुळे गुळाचे पाणी गाळलेलीच बरे कचकच लागू शकते.
आता कढई गॅसवर ठेवा त्यामध्ये अर्धी वाटी तूप घाला. तूप वितळल्यानंतर त्यामध्ये मनुका घालून परतवून घ्या.
मनुका चांगल्या फुगल्या की मग त्यामध्ये रवा घाला. रवा चांगला गॅसच्या मंद आचेवर चांगला परतून घ्या.
रवा चांगला तांबूस रंगावर परतवला गेला की मग त्यामध्ये केलेले गुळाचे पाणी घाला. आता काजू-बदाम चे काम करून घ्या.
किंवा जाडसर कुटून घ्या. हे काजू बदाम चे काप मिश्रणात घाला. आता मिश्रणावर झाकण ठेवा .एक चांगली वाफ येऊ द्या.
पाच मिनिटे वाफ येऊ द्या. अधून मधून शिरा परतवत राहा. चिरा खाली लागणार नाही याची काळजी घ्या.
गॅस बंद करा. आणि दहा मिनिटे चेहऱ्यावर झाकण असू द्या. कारण रवा चांगला उमलून येईल. आपला गुळाचा शिरा खाण्यास तयार आहे…..
चला तर मग गरम गरम पोह्यांसोबत आपण गुळाचा शिरा सुद्धा खाऊयात. गरम गरम गुळाचा शिरा तोही साजूक तुपातला……
( रवा हा चांगला खरपूस भाजून घ्यावा. परवा जर कच्चा राहिला तर शिरा चिकट लागतो. म्हणून तो मंद आचेवर चांगला परतवून घ्यावा. साधारण तू तांबूस रंगाचा झाला तरी चालतो. तांबूस झाला तर तो कडसर लागेल.)

टिप्स::
गुळाचा पाक करू नये त्यामुळे शिरा कडक होईल. पूर्वी तुपाएवजी तेल वापरायचे.तेलाचा शिरा ही उत्तम चवीला लागतो.
वेळ व परिमाण::
तयारीची वेळ:१० मिनिटे
एकूण वेळ:३० मिनिटे
परिमाण :२ जणांसाठी
