तिळाचे लाडू

by Vaishali Chaudhari
207 views

तिळाचे लाडू


प्रस्तावना::

तिळाचे लाडू हे आधीच्या तसेच आताच्या काळातले सगळ्यांच्या आवडीचे असे लाडू आहेत. लग्नाला रुखवत म्हणून दिले जाणारे तिळाचे लाडू… मकर संक्रांतीला हे लाडू आवर्जून केले जातात एकमेकांचे तोंड गोड करण्यासाठी लाडू बनवले जातात.चवीला भन्नाट असे लागणारे तिळाचे लाडू….


साहित्य::

  • एक वाटी तीळ
  • एक वाटी गूळ
  • एक चमचा तूप


कृती::


सर्वप्रथम तीळ चाळून गाळून आणि व्यवस्थित निवडून घ्या. कारण गावरानी तीळ वापरल्यास त्यामध्ये बारीक खडे असण्याची शक्यता असते.

तीळ गाळल्यानंतर गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये तीळ घाला. तीळ खरपूस अशी भाजून घ्या. त्यामधला कचवटपणा निघून जाईल.

एका कढईमध्ये थोडे तूप घालून त्यामध्ये गूळ घाला. गॅस मंद आचेवर ठेवा. गुळ सतत ढवळत रहा गुळाचा पाक होईपर्यंत गुळ सतत हलवा.

गुळ वितळला की त्याला फेस येतो. फेस आला की पाक झाला असे समजावे.. पाकाचा एक थेंब पाण्याच्या वाटीमध्ये घालून बघावा .

त्याची गोळी झाल्यास पास झाला असे समजावे. पास झाल्यानंतर गॅसची आच अजूनच मंद करावी. आणि त्यामध्ये एक वाटी तीळ घालावे.

ते सगळ्या बाजूने व्यवस्थित मिक्स करून घ्यावे. हाताला तूप लावून घ्यावे. चमच्याच्या साह्याने छोटे छोटे गोळे येऊन हाताने वळून घ्यावे.


किंवा हाताला चटके लागत असल्यास दोन गोलपळीचे चमचे घ्यावे. तेच आमचे खोलगट असायला हवेत त्या चमच्यांना आतून तूप लावून घ्यावे.

त्यामध्ये तिळगुळाचे मिश्रण घेऊन ते चमच्याला चमचा लावून दोन्ही बाजूने हलवावे. मध्ये लाडू तयार होईल.

लाडू काढून त्याला लगेच हाताने गोल करावा म्हणजे हाताला गरम चटका असा लागणार नाही. आणि लाडू अगदी सहज पद्धतीने वळता येईल.

किंवा चमच्याच्या साह्याने थोडा गोळा घेऊन छोटासा डबा घेऊन त्यामध्ये तो गोळा घालावा डब्यालाही तूप लावून घ्यावे.

आणि डब्याचे झाकण लावून पटापट ते हलवावे मध्ये गोल असा लाडू तयार होईल. अशा पद्धतीने सर्व लाडू वळून घ्यावे.


मिश्रण एकदम सुकून गेल्यास तिळगुळाचे मिश्रण पुन्हा कढईमध्ये गरम करून त्याचे लाडू वळावे…. चला तर मग आपले तिळाचे लाडू आता तयार झाले आहेत मकर संक्रांतीला हे लाडू आवर्जून केले जातात….


::


टिप्स::

पाक करताना येथे मी पाण्याचा वापर केलेला नाही पाण्याच्या वापर केल्याने लाडू बांधला जात नाही किंवा आपण कोणता गुळ वापरतो आहे यावर ते ठरते. पण चुकीच्या गुळामध्ये थोड्या पाण्याचा वापर करू शकतो.


वेळ व परिमाण::


तयारीची वेळ: १० मिनिटे
एकूण वेळ: ३० मिनिटे
परिमान: २ जणांसाठी

You may also like

Leave a Comment

अन्न हे पूर्ण ब्रम्ह
सर्वाना नमस्कार
• अन्न हे केवळ पोटभरण्यासाठी नसून ते एक पवित्र आणि आवश्यक गोष्ट आहे, ज्यातून जीवन जगण्यासाठी ऊर्जा मिळते
• अन्न हे जीवन जगण्याचा आणि ऊर्जेचा मुख्य स्रोत आहे. ते शरीराचे पोषण करते आणि स्वस्थ आरोग्य सुधारण्यास मदत करते.
• अन्न ग्रहण करताना आपण अन्नचा आदर केला पाहिजे. हळू खाणे, त्याची चव घेणे आणि कृतज्ञता बाळगणे हे महत्त्वाचे आहे.
• ‘पूर्ण’ म्हणजे संपूर्ण आणि ‘ब्रह्म’ म्हणजे निर्मिती किंवा वाढ. या वाक्यातून अन्न हे केवळ पोट भरणारे नसून ते एक दैवी देणगी आहे.
• योग्य आणि पौष्टिक अन्न घेतल्याने शरीर निरोगी राहते. तसेच, अन्नाचा आदर केल्याने मानसिक शांतता मिळते.
आज विविध प्रसार माध्यमातून अनेक पुस्तके, youtube video, reals, कार्यक्रमाच्या मध्यमातून अनेक व्यंजनाच्या पाककृती आपणास बघायला मिळतात.
ह्या वेबसाइट च्या माध्यमातून महाराष्ट्रीयन खाद्य संस्कृती मधील व्यंजन बनविण्याची ते ही पारंपरिक पद्धतीने बनविण्याची कृती याद्वारे आपल्या पर्यन्त पोहचविण्याचा प्रयत्न करीत आहोत. याचा उपयोग निश्चितच पूर्ण ब्रह्माचा आस्वाद घेण्याऱ्या खव्वये, यांना होईल.

Visitor’s Counter

7507

© 2025 All Rights Reserved | Developed by Vaishali Ajay Chaudhari & Amol Gopal Zambare. || Maintenance by A2Z Web Solutions.