व्हेज फ्रँकी

by Vaishali Chaudhari

व्हेज फ्रँकी


प्रस्तावना:

व्हेज फ्रँकी हा पासपोर्टचा एक प्रकार असून आपण तो घरगुती भाज्या वापरूनच तयार केलेला आहे. साधी सोपी असेही व्हेज फ्रँकी आपण आता बघणार आहोत.

साहित्य:

  • एक वाटी किसलेले कोबी
  • एक वाटी किसलेला गाजर
  • एक वाटी लांब कापलेला कांदा
  • दोन चपात्या
  • मायोनीज पॅकेट
  • पिझ्झा पास्ता सॉस पॅकेट
  • टोमॅटो सॉस
  • ओरिगानो पावडर
  • दोन चमचे तूप


कृती::


प्रथम कणिक मळून दोन चपात्या करून घ्या.. कधी कधी चपात्या उरलेल्या असतात त्या चपात्यांपासून तुम्ही ही व्हेज फ्रँकी सुद्धा तयार करू शकतात.

चला तर मग आपण किसलेला कोबी किसलेला गाजर आणि लंबा कापलेला कांदा घ्या. एका ताटामध्ये चपाती ठेवा .

त्यावर जवळपास दोन चमचे टोमॅटो सॉस दोन चमचे मायोनीज दोन चमचे पिझ्झा पास्ता सॉस घाला. हे तीनही सॉस एकत्र चांगले फेटून घ्या.

आणि चपातीवर चमच्याच्या साह्याने पसरवून घ्या. चपातीवर सगळ्या बाजूला लागेल असे पसरवा. चपातीच्या मध्य भागाला गाजर घाला.

त्यावर किसलेली कोबी घाला. त्यावर कांदा घाला. आता त्यावर ओरिगानो पावडर स्प्रिंकल करा
तसेच तिखट आणि मीठ चवीप्रमाणे घाला.

आता त्याचा रोल करून घ्या. तवा गरम करून घ्या. आपण तव्यावर तयार केलेली तूप घालून दोघं साईडने चांगला खरपूस भाजून घ्या.

भाजल्यानंतर आपला रोल तयार झालेला आहे तो खाली प्लेटमध्ये काढून घ्या. त्याचे मध्यभागून दोन काम करा.

त्याला पेपरने रॅप करून घ्या. आपली फ्रँकी खाण्यास तयार झालेली आहे. ही फ्रेंकी तुम्ही टोमॅटो केचप सोबत खाऊ शकतात किंवा साधी ही तुम्ही खाऊ शकता.

इथे तुम्हाला आवडत असल्यास बीटचा पण वापर करू शकतात. इथे जितक्या आपल्याला कच्च्या भाज्यांचा वापर करता येईल तितका तुम्ही करू शकता.

हे मी तीनच भाज्याचा वापर केलेला आहे. आपल्या भाज्या आपण कच्च्याच वापरल्यामुळे इथे त्याची पौष्टिकता अजूनच वाढते आणि मुले हे आवडीने खातात.

बऱ्याचदा चपात्या शिल्लक असतात आणि मुलांना भाजीही नको असते त्यावेळेस तुम्ही ही फ्रँकी मुलांना बनवून देऊ शकतात.


टिप्स::

फ्रँकी बनवताना सर्व भाज्या या धुवून स्वच्छ कापून घ्या त्या वाफवू नका त्याचं कच्च्याच भाज्या घालून त्याचा वापर करा म्हणजे त्याचे पौष्टिकता टिकून राहील.

वेळ व परिमाण::


तयारीची वेळ १० मिनिटे
एकूण वेळ २० मिनिटे
परिमाण १ जणांसाठी

You may also like

Leave a Comment

अन्न हे पूर्ण ब्रम्ह
सर्वाना नमस्कार
• अन्न हे केवळ पोटभरण्यासाठी नसून ते एक पवित्र आणि आवश्यक गोष्ट आहे, ज्यातून जीवन जगण्यासाठी ऊर्जा मिळते
• अन्न हे जीवन जगण्याचा आणि ऊर्जेचा मुख्य स्रोत आहे. ते शरीराचे पोषण करते आणि स्वस्थ आरोग्य सुधारण्यास मदत करते.
• अन्न ग्रहण करताना आपण अन्नचा आदर केला पाहिजे. हळू खाणे, त्याची चव घेणे आणि कृतज्ञता बाळगणे हे महत्त्वाचे आहे.
• ‘पूर्ण’ म्हणजे संपूर्ण आणि ‘ब्रह्म’ म्हणजे निर्मिती किंवा वाढ. या वाक्यातून अन्न हे केवळ पोट भरणारे नसून ते एक दैवी देणगी आहे.
• योग्य आणि पौष्टिक अन्न घेतल्याने शरीर निरोगी राहते. तसेच, अन्नाचा आदर केल्याने मानसिक शांतता मिळते.
आज विविध प्रसार माध्यमातून अनेक पुस्तके, youtube video, reals, कार्यक्रमाच्या मध्यमातून अनेक व्यंजनाच्या पाककृती आपणास बघायला मिळतात.
ह्या वेबसाइट च्या माध्यमातून महाराष्ट्रीयन खाद्य संस्कृती मधील व्यंजन बनविण्याची ते ही पारंपरिक पद्धतीने बनविण्याची कृती याद्वारे आपल्या पर्यन्त पोहचविण्याचा प्रयत्न करीत आहोत. याचा उपयोग निश्चितच पूर्ण ब्रह्माचा आस्वाद घेण्याऱ्या खव्वये, यांना होईल.

Visitor’s Counter

4331

© 2025 All Rights Reserved | Developed by Vaishali Ajay Chaudhari & Amol Gopal Zambare. || Maintenance by A2Z Web Solutions.