व्हेज हक्का नूडल्स

by Vaishali Chaudhari
1 views

व्हेज हक्क नूडल्स
प्रस्तावना::: चायनीज म्हटलं की सर्वांच्या तोंडाला पाणी सुटते… त्यातल्या त्यात लहान मुलांना तसेच मोठ्यांनाही नूडल्स चे प्रकार आवडतात… आज आपण पार्टीसाठी कॉन्टिटी मध्ये हक्का नूडल्स बनवणार आहे…
साहित्य::: हक्का नूडल्स ची तीन पॅकेट अर्धा किलो पत्ताकोबी पाव किलो सिमला मिरची पाच ते सहा कांदे कोथिंबीर एक इंच अद्रकाचा तुकडा अर्धा चमचा मिरे पूड दोन चमचे सोया सॉस दोन चमचे रेड चिली सॉस दोन चमचे ग्रीन चिली सॉस दोन चमचे शेजवान सॉस एक पॅकेट हक्क नूडल्स मसाला एक चमचा तिखट मीठ चवीप्रमाणे परतायसाठी तेल पाणी
कृती:: नूडल्स पॅकेट फोडून त्याचे थोडे तुकडे करून घ्या… एका पातेल्यामध्ये गरम पाणी करा त्यामध्ये थोडे मीठ घाला… आणि पाच ते सहा मिनिटे नूडल्स उकळवून घ्या.. नूडल्स व्यवस्थित उकडल्यानंतर चाळणीमध्ये गाळून घ्या… त्यानंतर त्यावर थंड पाणी घाला.. थंड पाणी घातल्यामुळे नूडल्स मोकळ्या होतील… त्या चिकट होणार नाहीत…. आता पत्ताकोबी आपल्याला लांब चिरून घ्यायची आहे तसेच कांदा सुद्धा लांब चिरून घ्यायचा आहे सिमला मिरची लांब चिरून घ्यायची आहे…. लसणाचे काप करून घ्यायचे आहे… अद्रक किसून घ्या… कढईमध्ये तेल गरम करा… कढईमध्ये तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये लसणाचे काप आणि अद्रकाची किस घालून परतवून घ्या…. त्यानंतर त्यामध्ये सिमला मिरची घाला…. चिरलेला कांदा चिरलेली पत्ताकोबी घाला…. आणि मिश्रण चांगले परतवून घ्या… आपल्याला हे मिश्रण शिजू द्यायचे नाही… त्यावर लगेचच दोन चमचे सोया सॉस दोन चमचे चिली सॉस दोन चमचे रेड चिली सॉस दोन चमचे शेजवान सॉस आणि हक्का नूडल्स मसाला घाला…. त्यामध्ये तिखट घाला…. त्यानंतर अर्धा चमचा मिरे पूड घाला…आता यामध्ये नूडल्स घाला… आणि नूडल्स व्यवस्थित परतून घ्या. त्यावर चवीप्रमाणे मीठ घाला…. नूडल्स आणि मसाला व्यवस्थित मिक्स करून घ्या….. सर्वात शेवटी त्यामध्ये वर चिरलेली कोथिंबीर घाला…. आपले हक्का नूडल्स आता तयार झालेले आहे…. चला तर मग एन्जॉय करूया व्हेज हक्का नूडल्स … यामध्ये सुद्धा मी अजून अजिनोमोटो चा वापर केलेला नाही…. जरी आपण यामध्ये वापर केलेला नसला तरी आपण जो वेज हक्का नूडल्स चा मसाला वापरलेला आहे… त्यामध्ये थोडेफार अजिनोमोटो चे प्रमाण असते… त्यामुळे सेपरेट घालायची गरज नाही…. चला तर मग एन्जॉय करूया गरमागरम व्हेज हाका नूडल्स…..
टिप्स::: ज्यावेळेस आपण नूडल्स उकळतो त्यावेळेस पाण्यामध्ये एक चमचा तुम्ही तेल घालू शकतात… त्यामुळे नूडल्स आहेत… नूडल्स सेपरेट सेपरेट होतील….
वेळ व परिमाण::
तयारीची वेळ::२० मिनिटे
एकूण वेळ ::६०मिनिटे
परिमाण:१५ व्यक्तीसाठी

You may also like

Leave a Comment

अन्न हे पूर्ण ब्रम्ह
सर्वाना नमस्कार
• अन्न हे केवळ पोटभरण्यासाठी नसून ते एक पवित्र आणि आवश्यक गोष्ट आहे, ज्यातून जीवन जगण्यासाठी ऊर्जा मिळते
• अन्न हे जीवन जगण्याचा आणि ऊर्जेचा मुख्य स्रोत आहे. ते शरीराचे पोषण करते आणि स्वस्थ आरोग्य सुधारण्यास मदत करते.
• अन्न ग्रहण करताना आपण अन्नचा आदर केला पाहिजे. हळू खाणे, त्याची चव घेणे आणि कृतज्ञता बाळगणे हे महत्त्वाचे आहे.
• ‘पूर्ण’ म्हणजे संपूर्ण आणि ‘ब्रह्म’ म्हणजे निर्मिती किंवा वाढ. या वाक्यातून अन्न हे केवळ पोट भरणारे नसून ते एक दैवी देणगी आहे.
• योग्य आणि पौष्टिक अन्न घेतल्याने शरीर निरोगी राहते. तसेच, अन्नाचा आदर केल्याने मानसिक शांतता मिळते.
आज विविध प्रसार माध्यमातून अनेक पुस्तके, youtube video, reals, कार्यक्रमाच्या मध्यमातून अनेक व्यंजनाच्या पाककृती आपणास बघायला मिळतात.
ह्या वेबसाइट च्या माध्यमातून महाराष्ट्रीयन खाद्य संस्कृती मधील व्यंजन बनविण्याची ते ही पारंपरिक पद्धतीने बनविण्याची कृती याद्वारे आपल्या पर्यन्त पोहचविण्याचा प्रयत्न करीत आहोत. याचा उपयोग निश्चितच पूर्ण ब्रह्माचा आस्वाद घेण्याऱ्या खव्वये, यांना होईल.

Visitor’s Counter

7370

© 2025 All Rights Reserved | Developed by Vaishali Ajay Chaudhari & Amol Gopal Zambare. || Maintenance by A2Z Web Solutions.