गुळाचा शिरा
प्रस्तावना::
गुळाचा शिरा हा आजीच्या बटव्यातील पारंपारिक गोडाचा पदार्थ आहे. अत्यंत पौष्टिक असून हिवाळ्यात तर आपण दररोज खाऊ शकतो.
साहित्य::

- १ वाटी रवा,
- १ वाटी गुळ,
- १० मनुका,
- १० काजू,
- १० बदामाचे काप,
- अर्धी वाटी तूप
- वेलची पावडर
कृती::
पातेल्यात गुळ घाला व त्यात एक वाटी पाणी घाला.गुळ वितळेपर्यंत शिजवून घ्या.गुळाचा पाक करायचा नाही.
गुळाचे पाणी गाळून घ्या.कढाईत मध्ये तूप कडकडीत गरम करावे.त्यात मनुका काजू बदाम काप परतवा.त्यावर रवा घाला.
गॅस बारीक करावा. रवा चांगला तांबूस रंगावर भाजा. गॅस बारीकच ठेवा. त्यामध्ये गुळाचा पाणी घाला आणि वेलची पावडर घाला.
.त्यावर झाकण ठेवा.५ मिनिटे बारीक गॅसवर वाफ येऊ द्या.गॅस बंद करा.झाकण तसेच राहू द्या.
रवा चांगला उमलेल.आपला गुळाचा शिरा तयार आहे.

टिप्स::
गुळाचा पाक करू नये त्यामुळे शिरा कडक होईल. पूर्वी तुपाएवजी तेल वापरायचे.तेलाचा शिरा ही उत्तम चवीला लागतो.
वेळ व परिमाण::
तयारीची वेळ:१० मिनिटे
एकूण वेळ:३० मिनिटे
परिमाण :२ जणांसाठी
