चटपटीत भेळ

by Vaishali Chaudhari

चटपटीत भेळ


प्रस्तावना::

भेळ म्हटले की सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटते भेळ हा अत्यंत चटपटीत असा पदार्थ आहे लहान मुलांना तो तर आवर्जून आवडतो. भेळ मधील कुरमुरे चिवडा शेव त्यामुळे तो अत्यंत चवदार होतो. आणि तो केव्हाही बनवला जाणारा सहज सोपा पदार्थ आहे. लहानापासून मोठ्यापर्यंत अतिशय आवडणारी अशी भेळ आहे.

साहित्य::

  • पाव किलो मुरमुरे (कुरमुरे),
  • एक वाटी चिवडा
  • एक वाटी तिखट शेव,
  • एक वाटी फिके शेव,
  • अर्धी वाटी बारीक शेव,
  • दोन कांदे,
  • 2 टोमॅटो,
  • कोथिंबीर,
  • तीन उकडलेले बटाटे,
  • चिंचेची चटणी,
  • एक हिरवी मिरची,
  • तिखट ,
  • मीठ

कृती::

सर्वप्रथम दोन कांदे बारीक चिरून घ्या. दोन टोमॅटो ही बारीक चिरून घ्या .कोथिंबीर बारीक चिरून घ्या .

एका हिरव्या मिरचीची पेस्ट करून घ्या. एका मोठ्या पातेल्यामध्ये किंवा भांड्यामध्ये मुरमुरे शेव चिवडा एकत्र करून घ्या.भेळ करताना तुम्ही कुठल्याही प्रकारची मुरमुरे वापरू शकतात. मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मुरमुरे उपलब्ध असतात.

भेळ मध्ये तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे चिवड्याचा वापर करू शकतात. पण इथे मिक्स चिवड्याचा वापर केला तर चांगलं त्यामध्ये शेव (बारीक, जाड ,तिखट) तसेच पापडी याची सर्व योग्य प्रमाण असते. त्याला पण मिक्स चिवडा असं म्हणतो. त्याचा वापर तुम्ही इथे करू शकता.

मग आपल्याला जाड शेव बारीक शेव असे वेगवेगळे टाकायची गरज नाही. फक्त वरतून बारीक शेव तुम्ही घालू शकतात.

हे मिश्रण सर्व एकत्र व्यवस्थित करून घ्या. त्यामध्ये चिरलेला कांदा चिरलेला टोमॅटो चिरलेली कोथिंबीर घाला.

आता वेळ मध्ये चवीप्रमाणे तिखट मीठ घाला. एका जाड मिरचीची जी पेस्ट केलेली आहे ती ही घाला.

उकडलेले बटाटे सोलून घ्या त्याचा रगडा करून घ्या त्यामध्ये तिखट मीठ घाला. आता हा रगडा बीडमध्ये घाला आणि व्यवस्थित मिक्स करा.

आता हे व्यवस्थित मिक्स केल्यानंतर त्यामध्ये चिंचेची चटणी गरजेप्रमाणे घाला. आता भेळ वर बारीक शेव घाला आणि वरून थोडी चिंचेची चटणी पुन्हा घाला.

आणि आता वेळ खाण्यास तयार आहे. दही सुद्धा घालू शकतात हे ऑप्शनल आहे. आवडीप्रमाणे घालू शकतात. भेळ मध्ये बारीक शेव चा वापर जास्तीत जास्त करावा त्यामुळे भेळच्या चवीमध्ये वेगळा स्वाद निर्माण होतो.

तसेच तुम्ही मी इथे बटाट्याचा वापर केलेला आहे तुम्ही कचोरी समोस्याचा सुद्धा वापर करू शकतात. एक कचोरी एक समोसा मोडून सुद्धा तुम्ही भेळ बनवू शकतात..

भेळ मध्ये तुम्ही इथे मी चिंचेचा चटणीचा वापर केलेला आहे तुम्ही खजुराच्या चटणीचा सुद्धा वापर करू शकतात. आंबटगोड असते आणि खजुराची चटणी ही गोड असते. किंवा थोड्या थोड्या प्रमाणात दोन्ही चटणी घातल्या तरी चव अत्यंत रुचकर लागेल.यामध्ये तुम्ही पुदिनाची चटणी चा वापर सुद्धा करू शकतात याला हिरवी चटणी असेल पण मी म्हणतो…

चिंचेची चटणी आणि पुदिन्याची चटणी मी माझ्या रेसिपी मध्ये शेअरच करेल. चला तर मग भेळ एन्जॉय करूया.

टिप्स::

भेळ बनवताना सर्व साहित्य ज्यावेळेस आपण एकत्र करतो त्यावेळेस लगेच हे खाण्यास घ्यावे. कारण ही भेळ वातळ होऊन चव जाते.

You may also like

Leave a Comment

अन्न हे पूर्ण ब्रम्ह
सर्वाना नमस्कार
• अन्न हे केवळ पोटभरण्यासाठी नसून ते एक पवित्र आणि आवश्यक गोष्ट आहे, ज्यातून जीवन जगण्यासाठी ऊर्जा मिळते
• अन्न हे जीवन जगण्याचा आणि ऊर्जेचा मुख्य स्रोत आहे. ते शरीराचे पोषण करते आणि स्वस्थ आरोग्य सुधारण्यास मदत करते.
• अन्न ग्रहण करताना आपण अन्नचा आदर केला पाहिजे. हळू खाणे, त्याची चव घेणे आणि कृतज्ञता बाळगणे हे महत्त्वाचे आहे.
• ‘पूर्ण’ म्हणजे संपूर्ण आणि ‘ब्रह्म’ म्हणजे निर्मिती किंवा वाढ. या वाक्यातून अन्न हे केवळ पोट भरणारे नसून ते एक दैवी देणगी आहे.
• योग्य आणि पौष्टिक अन्न घेतल्याने शरीर निरोगी राहते. तसेच, अन्नाचा आदर केल्याने मानसिक शांतता मिळते.
आज विविध प्रसार माध्यमातून अनेक पुस्तके, youtube video, reals, कार्यक्रमाच्या मध्यमातून अनेक व्यंजनाच्या पाककृती आपणास बघायला मिळतात.
ह्या वेबसाइट च्या माध्यमातून महाराष्ट्रीयन खाद्य संस्कृती मधील व्यंजन बनविण्याची ते ही पारंपरिक पद्धतीने बनविण्याची कृती याद्वारे आपल्या पर्यन्त पोहचविण्याचा प्रयत्न करीत आहोत. याचा उपयोग निश्चितच पूर्ण ब्रह्माचा आस्वाद घेण्याऱ्या खव्वये, यांना होईल.

Visitor’s Counter

4319

© 2025 All Rights Reserved | Developed by Vaishali Ajay Chaudhari & Amol Gopal Zambare. || Maintenance by A2Z Web Solutions.