लहान मुलांसाठी जीरा भात
प्रस्तावना:
लहान मुले तिखट खात नसल्यामुळे हा जीरा भात खाऊ शकतात.
साहित्य:

- अर्धी वाटी तांदूळ,
- एक चमचा साजूक गाईचे तूप,
- अर्धा चमचा जिरे,
- चवीप्रमाणे मीठ आणि पाणी
कृती:
तांदूळ धुऊन घ्या. एका पॅनमध्ये तूप घालून गरम झाल्यानंतर त्यात जिरे तड-तडवा.
त्यामध्ये धुतलेले तांदूळ घाला.
अर्धी वाटी तांदुळाला दीड वाटी पाणी घाला.

तीन शिट्ट्या होऊ द्या. मऊ सूट जीरा भात तयार होईल.

टिप्स:
हा भात लहान मुलांसाठी असल्यामुळे याच्यामध्ये पाण्याची प्रमाण जास्त आहे व तो मऊसूद बनावा आणि त्यांना पचनास सोपे व्हावे.
वेळ व परिमाण
तयारीची वेळ: ५ मिनिटे
एकूण वेळ: २० मिनिटे
परिमाण: १ मुलासाठी
