पावभाजी
प्रस्तावना :
पावभाजी ही भाजी सगळ्या शहरांमध्ये आवडीने खाल्ले जाणारा पदार्थ आहेत. लहानापासून मोठ्यापर्यंत पावभाजी ही सर्वांना आवडते.
साहित्य:
- २५० ग्रॅम फ्लॉवर
- २५० ग्रॅम बटाटे,
- १५० ग्रॅम वाटाणे,
- २ मोठे कांदे,
- १ टमाटर,
- १० लसूण पाकळ्या,
- अर्धा इंच अद्रक,
- २ चमचा पावभाजी मसाला,
- एक चमचा तिखट,
- ४ चमचे बटर,
- २ चमचे गावरानी तूप
- हळद
- मीठ ,
- पाणी,
- १ पावलादी
कृती:
फ्लावर कापून घ्या. बटाटे धुवून सोलून घ्या कापून घ्या. दोन कांदे, एक टोमॅटो चिरून घ्या. अद्रक लसणाची पेस्ट करून घ्या.
एका कुकरमध्ये कापलेला बटाटा फ्लावर भिजलेली वाटाणे लावून पाच शिट्ट्या होऊ द्या.
हे सर्व मिश्रण घोटून घ्या. एका कढईमध्ये बटर आणि तूप गरम करून घ्या. त्यामध्ये चिरलेला कांदा, टोमॅटो घालून परतून घ्या.
त्यामध्ये आलं लसणाची पेस्ट घाला हळद ,तिखट, पावभाजी मसाला घालून परतून घ्या.
त्यामध्ये उकडलेल्या फ्लावर बटाट्याचे मिश्रण घाला. त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घाला.
चार ते पाच उकळ्या येऊ द्या त्यामध्ये चिरलेली कोथिंबीर घाला वरून दोन चमचे बटर सोडा गरमागरम पावभाजी तयार आहे.
तव्यावर बटर टाकून पाव गरम करून घ्या. पावभाजी सोबत पाव सर्व्ह करा.

पावभाजी चटणी:
साहित्य:
९ लसून पाकळ्या, एक टेबलस्पून उकडलेल्या बटाटा वाटाण्याची पेस्ट, एक चमचा पावभाजी मसाला, मीठ, १ चमचा बटर, पावचमचा तिखट. कोथिंबीर
कृती:
एका कढईमध्ये बटर गरम करा. आलं लसणाची पेस्ट घाला त्यानंतर बटाटा वाटाण्याची पेस्ट घाला. चांगले परतवा त्यामध्ये तिखट पावभाजी मसाला घाला. चवीप्रमाणे मीठ घाला. त्यामध्ये गरम पाणी घाला. चिरलेली कोथिंबीर घाला. दोन उकळ्या येऊ द्या. पावभाजी चटणी तयार आहे.
टिप्स:
पावभाजी मसाला मसाल्याची चटणी ही पातळ असते आणि झणझणीत असते ती आपण पावभाजी मध्ये मिक्स करून खाऊ शकतो.
वेळ व परिमाण:
तयारीची वेळ: २० मिनिटे
एकूण वेळ: ४० मिनिटे
परिमाण: ३ जणांसाठी
