बटर चीज मॅगी
प्रस्तावना:-
मॅगी हा फास्ट फूड चा प्रकार आहे. लहान मुलांना मॅगी खूप आवडते.
साहित्य:-

- एक पॅकेट मॅगी
- 1 चीज क्यूब ,
- पेरी पेरी मसाला,
- बटर
- ओरिगानो
- मीठ
- पाणी
कृती:-
प्रथम एका पॅनमध्ये बटर गरम करून घ्यावे .
त्यामध्ये पाव चमचा पेरी पेरी मसाला नंतर त्यात पाणी घाल एक ग्लास पाणी घालावे.
त्यानंतर चीज किसून घ्यावे चीज किसल्यानंतर त्यात मॅगी तोडून घालावी.
पाच मिनिटे चांगली मॅगी शिजवून घ्यावी .अगदी थोडे चिमूटभर पेक्षा कमी मीठ घालावे.
कारण मॅगी मसाल्यामध्ये मीठ असते. शिजल्यानंतर मॅगी खाण्यास तयार आहे.
अत्यंत चवीला रुचकर लागते.
टिप्स:-
मॅगी मध्ये जास्त मीठ घालू नये कारण मॅगीच्या पॅकेटमध्ये मसाल्याचे पॅकेट असते त्यामध्ये मीठ असते.

वेळ व परिमाण:
तयारीची वेळ :५ मिनिटे
एकूण वेळ :१०मिनिटे
परिमाण:1 व्यक्तीसाठी
