मुगाचे भजी
प्रस्तावना::
मुगाचे भजी ही गरमागरम खास करून पावसाळ्यात चहा सोबत खाऊ शकतात.आपण कुठल्या ही समारंभ साठी बनवला जाणारा आहे.
साहित्य::

१ वाटी मुगडाळ,६ जाड बारीक हिरव्या मिरच्या,२० लसूण पाकळ्या, अर्धा इंच अद्रक तुकडा,जिरे, १० कडिपत्ता पाने,कोथिंबीर, मीठ, तळण्यासाठी तेल
कृती::
रात्री मुगाची डाळ पाण्यात भिजत घालावी.सकाळी डाळ दोन वेळा पाण्याने धुऊन घ्या.
नंतर मिक्सरमध्ये चरमरी(बारीक पण नाही जाड पण नाही) वाटून घ्या. पातेल्यात काढा.
चटणी साठी लसूण पाकळ्या,अद्रक मिरच्या, जिरे, मीठ कढीपता पाने घाला .फिरवून घ्या.चटणी पाणी घालू नका.
ही चटणी मुगाच्या डाळीत घाला रवण चांगले फेटून घ्या.

त्यात १ चमचा तेल घाला. कढाईत तेल कडकडीत गरम करा बारीक भजी हाताने सोडा.
नंतर तांबूस रंगावर तळा.भजी काढून घ्या.आता तेलात जाड मिरच्या तळून घ्या.भाजीसोबत आपण खाऊ शकतो. गरमागरम भजी तयार आहे.

टिप्स::
मुगाची भजी कुरकुरीत होण्यासाठी रवणात अर्धी वाटी हरबरा डाळ भिजत घालून वाटू शकतात.
वेळ व परिमाण::
तयारीची वेळ: २०मिनिटे
एकूण वेळ:३५ मिनिटे
परिमाण:२ जणांसाठी
