मुळा ची पानांची रस्सा भाजी
प्रस्तावना::
मुळ्याच्या पानांची रस्सा भाजी ही खान्देशी भागातील भाजी आहे.ही भाजी गावरानी मुळ्याची चवीला रुचकर लागते.

साहित्य:
- २ मुळ्याचा पाने,
- १ मुळा,
- १ वाटी तुरीची डाळ,
- ६ बारीक हिरव्या मिरच्या,
- अर्धी वाटी शेंगदाणे,
- ९लसूण पाकळ्या,
- अर्धा इंच अद्रक तुकडा,
- फोडणीसाठी तेल,
- जिरे मोहरी,
- कोथिंबीर,
- १ चिमूट गरम मसाला,
- २ चिमूटभर हळद,
- मीठ
कृती::
चटणीची तयारी:
गरम तव्यावर मिरच्या शेंगदाणे खरपूस भाजून घ्या.एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरव्या मिरच्या अर्धी वाटी शेंगदाणे,लसूण पाकळ्या अर्धा इंच अद्रक तुकडा, कोथिंबीर, पाणी घालून चटणीचे बारीकवाटण करून घ्या .
कृती::
मुळ्याच्या पाने धुऊन चिरून घ्या.मुळा धुऊन चिरून घ्या. डाळ धुऊन घ्या.कुकरमध्ये मुळाची पाने,मुळा, डाळ तीन शिट्ट्या घेऊन शिजवून घ्या.वाफ निघाली की मिश्रण चाळणीत ओता. मिश्रणातील पाणी निघू द्या.
एका कढईत तेल गरम करुन त्यात जिरे मोहरी फोडणी घाला. त्यामध्ये चटणी घालून परतून घेऊन घ्या.चटणीला तेल सुटल्यानंतर त्यामध्ये शिजवलेले मुळ्याचे मिश्रण घाला. त्यात गरजेप्रमाणे गरम पाणी घाला.भाजीला तीन-चार उकड्या येऊ द्या. चवीप्रमाणे मीठ घाला. भाजी तयार आहे.
टीप्स::

मुळ्याची भाजी अत्यंत पौष्टिक आहे.ही भाजी तुम्ही ज्वारीची भाकरी किंवा बाजरीची भाकरी सोबत खाण्यास रूचकर लागते.
