मेथीची भाजी

by Vaishali Chaudhari
205 views

         मेथीची भाजी

मेथीची भाजी अत्यंत पौष्टिक असून दाळ घालून केल्यास अत्यंत छान चवीला लागते.

मेथीची भाजी
मेथीची भाजी – फोटो 2
  • मेथिची एक जुडी
  • आधी वाटि तुरीची दाळ 
  • ५ हिरवी मिर्ची बारीक़
  • आधी लहान वाटि शेंगदाणे
  • ६ लसून पाकळ्या
  • एक छोटा अदरक टुकड़ा
  • २ चिमुटभर हळद,
  • फोडणीसाठी तेल
  • जीरे मोहरी ,
  • कोथिंबीर ,
  • मीठ  

प्रथम तुरीची दाळ धुवून घ्या.

कुकरमध्ये तुरीची दाळ ,कापलेली मेथीचि भाजी पाणी टाकून २ शिट्ट्या उकडून घ्या.

तव्यावर बारीक़ मिर्ची,शेंगदाने भाजून घ्या.

मिक्सर च्या भांड्यात हिरवी मिर्ची,शेंगदाने ,लसूण ,अदरक ,कोथिंबीर ,पाणी घालून चटनी वाटून घ्या.

एका कढाईत तेल घालून जीरे मोहरी फोडणी घाला.

मेथीची भाजी – फोटो 3

नंतर त्यात चटनी, हळद घाला.

चटनी तेल सुटेपर्यत परतवा नंतर त्यात तुरीची दाळ मेथीचे मिश्रण चटनीत घाला.

गरजेप्रमाणे त्यात पाणी घाला त्यात चवीप्रमाणे मीठ घाला चार ते पांच उकळी भाजीला येऊ दया भाजीवर अर्धे झाकण  ठेवा.

मेथीची भाजी – फोटो 4

त्यामुळे भाजीला तेल सुटते.

मेथिची भाजी तयार आहे.

मेथीची भाजी – फोटो 5

भाजिला तेल सुटण्यासाठी अर्धे झाकण ठेवावे, कारण पूर्ण भाजी झाकल्याने तेल उडून जाते.

तयारीची वेळ :-१० मिनिटे

एकूण वेळ :-४० मिनिट

परिमाण :-५ जणांसाठी    

You may also like

Leave a Comment

swaadgharcha.com swaadgharcha.comअन्न हे पूर्णब्रह्म
🍛 सर्व विभाग
❤️ सेव्ह केलेल्या रेसिपी

अजून काही सेव्ह केलेले नाही. आवडलेल्या रेसिपीवरील ♡ दाबा — नंतर इथे सहज सापडेल.