हिरवी ढेमशाची भाजी (गोल भेंडी)
प्रस्तावना:-
हिरवी भाजी ही रोजच्या जेवणात खाल्ली जाणारी भाजी आहे. ही भाजी साधारण उन्हाळ्यात मिळते.
साहित्य:-
पाव किलो ढेमसे(२५०gm),२ चमचे हरभऱ्याची डाळ
६ हिरव्या बारीक मिरच्या, अर्धी वाटी शेंगदाणे, ७ लसूण पाकळ्या, दोन चिमूट हळद, दोन चिमूट गरम मसाला, फोडणीसाठी तेल, चवीप्रमाणे मीठ , पाणी ,कोथिंबीर
- पाव किलो ढेमसे(२५०gm)
- २ चमचे हरभऱ्याची डाळ
- ६ हिरव्या बारीक मिरच्या
- अर्धी वाटी शेंगदाणे,
- ७ लसूण पाकळ्या,
- दोन चिमूट हळद,
- दोन चिमूट गरम मसाला,
- फोडणीसाठी तेल,
- चवीप्रमाणे मीठ ,
- पाणी ,
- कोथिंबीर
कृती:
प्रथम ढेमसे बारीक चिरून घ्या. ते स्वच्छ धुऊन घ्या. हरभऱ्याची डाळ ही धुवून घ्या.
कुकरमध्ये ढेमसे आणि हरभऱ्याची डाळ चार शिट्ट्या घेऊन शिजवून घ्या.
तव्यावर हिरव्या मिरच्या आणि शेंगदाणे भाजून घ्यावे.
मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरव्या मिरच्या, शेंगदाणे, लसूण पाकळी, कोथिंबीर आणि पाणी घालून वाटण करून घ्यावे. चटणी एकदम बारीक वाटावी.
एका कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये जिरे मोहरी फोडणी घालून त्यामध्ये चटणी घालावी.
चटणी घातल्यावर हळद गरम मसाला घालून चटणी चांगली तेल सुटेपर्यंत परतवावी.
चटणीला तेल सुटल्यानंतर ढेमसे आणि उकडलेले हरभऱ्याची डाळ चे मिश्रण पाण्यासकट त्यात घालावे.
ती व्यवस्थित एकत्र करावे. त्यानंतर चवीप्रमाणे मीठ घालावे.
भाजी पातळ हवी असल्यास थोडे पाणी घालावे.
पाणी घालायची गरज पडत नाही कारण ढेमसे आणि हरभऱ्याच्या डाळीच्या उकडलेल्या मिश्रणात पाणी असते.
ते मिश्रण आपण पाण्यासकट चटणीत घालतो. भाजी वर झाकण ठेवावे.
चार ते पाच उकळ्या आल्यानंतर भाजीचा गॅस बंद करावा. दिवसाची हिरवी भाजी तयार आहे.
टिप्स:-
ढेमशाच्या हिरव्या भाजीमध्ये आपल्याला आवडत असल्यास हरभऱ्याच्या डाळ ऐवजी चवळी ही घालू शकतात.
वेळ व परिमाण:
तयारीची वेळ: १० मिनिटे
एकूण वेळ: ४५ मिनिटे
परिमाण: ५ जणांसाठी
