पालक वरण आणि भात

प्रस्तावना:
पालक वरण हे अत्यंत पौष्टिक असे वरण आहे. लहान मुले बऱ्याच डाळी खात नाहीत . हे वरण सर्व डाळी मिश्रित असल्यामुळे त्याची चव अधिकच वाढते.
साहित्य:

- १ पालकाची जोडी,
- १ छोटी वाटी मुगाची डाळ,
- १ छोटी वाटी हरभऱ्याची डाळ,
- १ छोटी वाटी तुरीची डाळ,
- १ कांदा,
- १ टमाटर,
- ४ हिरवी मिरची,
- १ लसूण कांदा,
- अर्धा इंच अद्रक तुकडा,
- कढीपत्ता,
- १० शेंगदाणे,
- अर्धा छोटा चमचा हळद,
- अर्धा चमचा तिखट,
- अर्धा चमचा गरम मसाला,
- २ सुकलेल्या कैरीचे काप नसल्या चिंच,
- १ चिमूटभर हिंग,
- मीठ ,
- फोडणीसाठी तेल,
- पाणी
- कोथिंबीर
- एक वाटी तांदूळ
ती:

प्रथम मुगाची डाळ, हरभऱ्याची डाळ ,तुरीची डाळ,तिघं डाळी एकत्र करून घ्या.
सर्व डाळी स्वच्छ धुऊन घ्या . तुरीच्या वरणाप्रमाणे कुकरमध्ये वरण शिजवून घ्या.
पालक बारीक चिरून घ्या. टमाटर आणि कांदाही बारीक चिरून घ्या.
अद्रक, हिरवी मिरची,लसणाची पेस्ट करून घ्या. कढईमध्ये तेल गरम करा त्यात जिरं मोहरीची फोडणी घाला.

तेलात शेंगदाणे टाका कढीपत्ता टाका. परतून घ्या. चिरलेला कांदा टमाटर परतून घ्या.
चिरलेला पालक परतून घ्या. अद्रक, मिरची,लसणाची पेस्ट घाला. कैरीचे काप घाला.
हळद ,तिखट, गरम मसाला सर्व घालून तेल सुटेपर्यंत परतवा.
डाळींचे वरण चांगले घोटून घ्या. हे डाळींचे वरण पालकाच्या मिश्रणामध्ये घाला.
व्यवस्थित हलवून घ्या. त्यात थोडे गरम पाणी घाला. चवीप्रमाणे मीठ घाला.
वरून चिरलेली कोथिंबीर घाला. वरणावर झाकण ठेवून पाच ते सहा उकड्या येऊ द्या.
गॅस बंद करा. पालकाचे वरण तयार आहे.
भाताची कृती:
तांदूळ धुऊन घ्या. कुकरमध्ये तांदूळ घालून त्यात दीड ग्लास पाणी घालून चवीप्रमाणे मीठ घाला.
दोन शिट्या होऊ द्या भात तयार होईल. भाताबरोबर अत्यंत चवीला छान लागते.
टिप्स:
पालकाच्या वळणाच्या फोडणीमध्ये कांदा टोमॅटो पालक परतल्यानंतरच आलं लसूण मिरचीची पेस्ट घालावी. त्यामुळे मिश्रण जळत नाही.
वेळ व परिमाण:
तयारीची वेळ:१५ मिनिटे
एकूण वेळ: ६० मिनिटे
परिमाण: ४ जणांसाठी
