फ्रेंच फ्राईज बटाटा काप भाजी
प्रस्तावना:
फ्रेंच फ्राईज बटाटा का भाजी स्पेशली लहान मुलांसाठी बनवलेली भाजी आहे रोजच्या डब्यामध्ये लहान मुलांना नवीन नवीन भाजी हवी असते. कमी साहित्यात झटपट होणारी भाजी.
साहित्य :

- दोन बटाटे,
- पाव टीस्पून तिखट ,
- मीठ ,
- तेल ,
- जिरे,
- कोथिंबीर ,
- फ्रेंच फ्राईज काप करण्याचे यंत्र
कृती:
प्रथम बटाटा सोलून घ्या बटाटा धुऊन घ्या. धुतल्यानंतर फ्रेंच राईसच्या यंत्रातून काप करून घ्या.
एका कढईत तेल गरम करून घ्या त्यात जिऱ्याची फोडणी घाला फोडणी घातल्यानंतर त्यात बटाट्याचे काप घाला.
त्यामध्ये पाव चमचा तिखट घाला ते चांगले परतवून घ्या त्यावर झाकण ठेवून पाच मिनिटे चांगली शिजवून घ्या.
अधून मधून झाकण उघडून बटाट्याचे काप अल्टी पलटी करा बटाट्याचे काप शिजल्यानंतर त्यात चवीप्रमाणे मीठ घाला .
हे बटाट्याचे काप अत्यंत खरपूस होतात. त्यावर चिरलेली कोथिंबीर घाला .

आता आपली फ्रेंच फ्राईज बटाट्याचे काप भाजी तयार आहे. ही भाजी फुलक्या सोबत किंवा चपाती सोबत खाऊ शकतात.

टिप्स :
बटाटे कापताना ते लांब (फ्रेंच प्राईज च्या शेपमध्ये) कापावे, लांब कापल्याने मुलांना खाण्यामध्ये आवड निर्माण होते.
वेळ व परिमाण:
तयारीची वेळ :१०मिनिटे
एकूण वेळ :२०मिनिटे
परिमाण :१ मुलासाठी
