ओल्या तांदूळ डाळीचे ढोकळे
प्रस्तावना:-
ढोकळा हा मुळात गुजराती भागात केला जाणारा प्रसिद्ध पदार्थ आहे. यामध्ये वेगवेगळ्या मिश्र डाळींचे ढोकळे केले जातात.
साहित्य:-
- एक वाटी तांदूळ
- एक वाटी हरभऱ्याची डाळ
- एक इनोचे पॅकेट
- अर्धा चमचा मीठ
- पाणी
- 1 वाटी तेल,
- फोडणीसाठी जिरे मोहरी ,
- ५ जाड हिरव्या मिरच्या,
- चिमटीभर हळद
- कढीपत्ता
- कोथिंबीर
कृती :-
एक वाटी डाळ आणि एक वाटी तांदूळ रात्री भिजत घालावे.
सकाळी डाळ तांदूळ स्वच्छ धुऊन मिक्सरमध्ये बारीक वाटण करून घ्यावे ते एकत्र करावे त्यात मीठ घाला.

संध्याकाळी हळद ची चिमटीभर दोन टेबलस्पून तेल घालावे. मिश्रण चांगले फेटून घ्यावे.
एका कढईमध्ये पाणी गरम करून घ्यावे एका कढाई मध्ये पाणी गरम करून घ्यावे.

ताटाला तेल लावून घ्यावे. मिश्रण मध्ये इनो पुडी वरचेवर घालावी.
इनो ऍक्टिव्हेट करण्यासाठी त्यावर पाण्याचे चार-पाच थेंब टाकावे आणि मिश्रण हळूहळू ढवळून घ्यावे.
मिश्रण ढवळल्यानंतर ताटामध्ये घालावे आणि ते ताट कढईमध्ये ठेवावे त्यावर झाकण ठेवावे. वीस मिनिटे मिश्रण वाफवून घ्यावे.
नंतर ताट उघडून बघावे. एक सुरी तेलामध्ये भिजवून ती ढोकळ्यांमध्ये घालून बघावी .
सुरीला ढोकळ्याचं चिटकला नाही तर ढोकळा झाला आहे. असे समजावे. त्यावर फोडणीचे तेल घाला कोथिंबीर घाला आणि ढोकळे तयार आहे

फोडणीचे तेल कृती:
अर्धी वाटी तेल गरम करा. त्यामध्ये जिरे मोहरी फोडणी घाला.
मिरचीचे तुकडे घाला .कढीपत्ता घाला. चांगले कडकडीत गरम होऊ द्या.
टिप्स :
मिश्रण चांगले बारीक वाटावे त्यामुळे ढोकळे नरम होतात आणि मिश्रण जास्त पातळ किंवा जास्त घट्ट नसावे. भजी प्रमाणे रवण असावे.
वेळ व परिमाण :
तयारीची वेळ :२० मिनिटे
एकूण वेळ :४० मिनिटे
परिमाण :दोन जणांसाठी
