घरगुती पिझ्झा
प्रस्तावना:-
पिझ्झा हा इटली मधील फेमस पदार्थ आहे. आता आपल्या देशातही केला जातो लहान मुलांचा आवडता पदार्थ आहे.

पिझ्झा बेस चे साहित्य:
- चार वाट्या कणीक,
- एक चमचा ड्राय ईस्ट,
- एक चिमूटभर कणीक
- दीड चमचा साखर,
- पाव टीस्पून मीठ,
- पाणी
पिझ्झा बेस बनवण्याची कृती:
प्रथम एका वाटीमध्ये कोमट पाणी घेऊन त्यामध्ये साखर घालून साखर विरघळून घ्या.
त्यामध्ये एक चिमटी कणिक घाला, त्यानंतर एक चमचा ईस्ट घाला हे मिश्रण पाच मिनिटे झाकून ठेवा, ते फुगून येईल.
एका परातात चार वाट्या कणीक मध्ये पाव चमचा मीठ घालून मिसळून घ्या. हे फुललेले ईस्ट कणिक मध्ये मिसळा.
त्यानंतर पाणी टाकून नरम कणीक मळून घ्या. यामध्ये तेलाचा काटा घालून कणीक चांगली मळून घ्या आणि एक तास झाकण ठेवून बाजूला ठेवा.
एक तास झाल्यानंतर त्याचे गोळे करून घ्या साधारण पाच बेस बनतील.
बेस बनल्यानंतर ते जाड पोळी लाटून त्यावर फोर्कने होत करून ते तव्यावर दोघं बाजूने मंद आचेवर भाजून घ्या. पिझ्झाचे बेस तयार आहेत.

पिझ्झा वरील टॉपिंग चे साहित्य:

- पत्ता कोबी अर्धा किलो
- सिमला मिरची पाव किलो ,
- ४ टोमॅटो,
- दहा ते बारा मिरे पूड
- मीठ ,
- बटर ,
- ओरिगॅनो पावडर,
- एक चमचा साखर,
- पंधरा लसूण पाकळ्या,
- लाल तिखट टोमॅटो सॉस ,
- चिली फ्लेक्स,
- व्हेज मायोनीज पॅकेट,
- चीज क्यूब मोठा २५० ग्रॅमचा
पिझ्झा च्या टॉपिंग ची कृती:
प्रथम पत्ताकोबी सिमला मिरची धुवून बारीक अशी चिरून घ्या.
एका कढाई मध्ये एक चमचा बटर घालून त्यामध्ये सिमला मिरची, लसणाची पेस्ट तसेच पत्ताकोबी आत कच्ची परतवून घ्या.
त्यामध्ये चिमूटभर चिली फ्लेक्स,मिरेपूड घाला. आणि चवीप्रमाणे मीठ घाला. हे मिश्रण तयार आहे.(पिझ्झा टॉपिंग मध्ये तुम्ही इतरही भाज्या आवडीप्रमाणे टाकू शकतात.)

पिझ्झा बेस वर लावायचा सॉस कृती:
प्रथम टमाटे एका पातेल्यामध्ये उकडून घ्या. थंड झाले की त्याची साल काढून घ्या.
मिक्सरच्या भांड्यामध्ये सात आठ लसूण पाकळ्या तसेच उकडलेले टोमॅटोचे काप घालून मिक्सरमध्ये बारीक चटणी वाटून घ्या .
एका कढईमध्ये एक चमचा बटर घालून ही चटणी चांगली परतावा .
यामध्ये एक चमचा साखर ,एक चमचा टोमॅटो सॉस, चिमटीभर लाल तिखट, चवीप्रमाणे मीठ घालून चांगले परतवा .
चिमूटभर मिरीपूड घाला.चार उकड्या आल्यानंतर गॅस बंद करा. आपली पिझ्झा बेसची चटणी तयार आहे.

पिझ्झा बनवण्याची कृती:
प्रथम पिझ्झा बेस घ्या त्यावर आपण तयार केलेली पिझ्झा बेसची चटणी चमच्याने सर्व दूध व्यवस्थित पसरवा.
पिझ्झा बेसिक टॉपिंग या चटणीवर सर्वत्र पसरवा. त्यावर व्हेज मायोनीज पसरवा.त्यावर उकडलेले स्वीट कॉर्नचे दाणे घाला.
वरून असे भरपूर असे चीज किसून घाला. त्यावरची चिली फ्लेक्स,थोडे मीठ, ओरेगॅनो स्प्रेड करा. तवा गरम करून त्यावर बटर घाला.
हा पिझ्झा त्यावर सहा ते सात मिनिटे चांगला झाकण मंद आचेवर भाजून घ्या.
नाहीतर हा पिझ्झा तुम्ही ओवन मध्ये हे तीन मिनिटे गरम करू शकतात.
त्यानंतर पिझ्झा डिश मध्ये काढून त्याची पिझ्झा कटरने आठ पिसेस कट करा आपल्या घरगुती पिझ्झा तयार आहे.

टिप्स
मुलांना बाहेरचा पिझ्झा अत्यंत आवडतो परंतु बाहेरचा पिझ्झा हा मैद्याने बनलेला असतो घरगुती पिझ्झा हा कणकेचा बनलेला असतो त्यामुळे पोट खराब होत नाही. ड्राय इस वापरल्यामुळे पिझ्झा बेस हा सॉफ्ट बनतो.पिझ्झा टॉपिंग मध्ये तुम्ही इतरही भाज्या आवडीप्रमाणे टाकू शकतात
वेळ व परिमाण:
तयारीची वेळ :एक तास
एकूण वेळ: दीड तास
परिमाण: तीन जणांसाठी
