व्हेज मायो पराठा
प्रस्तावना::
व्हेज मायो पराठा हा लहान मुलांना अत्यंत आवडीचा आहे सकाळच्या टिफीन साठी करता येणारा असा आहे.

साहित्य::

१ छोटा कांदा
१ छोटा टोमॅटो
१ तुकडा फ्लावरचे फुल
१ जाड मिरची
कोथिंबीर
१ चमचा मायोनीज
१ चमचा तंदुरी मायोनीज
२ चिमटी ओरिगॅनो
१ चिमटी मीठ
पिठ ( कणिक)
नरम लुसलुस कणकेचा गोळा(पूरणाच्या कणीक प्रमाणे)
पराठयाला लावायला तूप
कृती::
सर्व भाज्या कांदा, टोमॅटो,मिरची , कोथिंबीर बारीक चिरून घ्या.फ्लॉवर खिसून घ्या.
एका भांड्यात सर्व कापलेल्या भाज्या, चवीप्रमाणे मीठ घाला.१ चमचा मायोनीज घाला.

१ चमचा तंदुरी मायोनीज घाला.चिमटीभर ओरिगानो घाला.व्यवस्थित एकत्र करून घ्या.
आता कणकेचा गोळा घेऊन त्यात पूरणा प्रमाणे मिश्रण भरून घ्या. त्याला पीट लाऊन पोळी प्रमाणे पराठा लाटून घ्या.

तवा गरम करून पराठा दोनही बाजूने खरपूस भाजून घ्या.त्याला तूप लावा. व्हेज मायो पराठा तयार आहे.

हा पराठा सॉस सोबत खाऊ शकतात.किंवा दहीसोबत खाऊ शकतात.
टिप्स::
पराठा मिश्रणामध्ये चीज खिसून घालू शकता.पराठा बनवताना पराठा फाटू नये म्हणून कणिक केव्हापासून भिजून ठेवा चांगली मुरेल. व पराठा फाटणार नाही.
वेळ व परिमाण::
तयारीची वेळ:१० मिनिटे
एकूण वेळ:३० मिनिटे
परिमाण:१ मुलासाठी
