वरण बट्टी व घोटलेली वांग्याची भाजी, गंगाफळ भाजी , मिरची
🥘 १. रेसिपीचं नाव
वरण बट्टी
📸 २. फोटो / फीचर्ड इमेज :
✨ ३. प्रस्तावना
वरण बद्दी वांग्याची भाजी हा पारंपारीक पदार्थ असून लग्न कार्य, काठी समारंभ, देवांचे भंडारे यामध्ये आवर्जून केला जाणारा जिन्नस आहे.
📝 ४. साहित्य (Ingredients
- बट्टी १ किलो पीठ दळून (चरमर)
- २ वाटी तूर डाळ,
- मीठ,
- हळद,
- १ चमचा ओवा,
- तळणासाठी तेल,
- पाणी
🔥 ५. कृती (Steps)
बट्टीचे पीठ परातात घेऊन त्यावर २ चिमटी हळद घालून, १ चमचा ओवा, चवीप्रमाणे मीठ घाला. पीठामध्ये १ वाटी तेल घालून चांगले चांगले मोहन द्यावे लाडू होईल इतपत घाला.
पाणी घालून कड़क कणकेचा गोळा करून घ्या. त्याचे छोटे गोळे करून घ्या.
नंतर कुतूरमध्ये पाणी घाला बट्टी वाफवून 8 शिट्ट्या ‘घेऊन वाफवून घ्या.
नतर तूर डाळ धुवून डाळ कुकरमध्ये लावा
नंतर ३ शिट्या होऊ दया.
थंड झोले की वरण घोटून त्यात चिमूटभर हळद, व चवीप्रमाणे मीठ घाला,
बट्टी कुकरमधुन काढून घ्या, त्या थंड होऊ दया. बट्टी थंड होऊ द्या कारण बट्टी थंड न झाल्यास आपण काप करताना त्याचे दाणे पडतील किंवा भूगा होईल.
थंड झाल्या की त्याचे काप करून घ्या.
कढाईत तळण्यासाठी तेल गरम करा.
सर्व बट्टया तळून घ्या.छान पैकी बट्टी चूरून घ्या आणि त्यामध्ये गरमागरम वरण घ्या. त्यावर साजूक असे तूप घ्या. वरण बट्टी अत्यंत रुचकर लागेल.
वरण बट्ट्टी तयार आहेत
(सर्व साहित्य मेझरींग कप व बाकी स्पून ने मेझर केलेले आहे.बट्टी करताना वेगवेगळ्या पद्धतीचा वापर केला जातो. जशी की आपण बट्टी येथे वाफवून घेतली आहे आणि ती नंतर तळून घेतली आहे.
पण बऱ्याच पद्धतीने मध्ये बट्टी ज्याला की आपण लोळगे म्हणतो हे लोळगे गावाकडे कणिक भिजवल्यानंतर त्याचे मोठे मोठे लोळगे गोल करून ते शेणाच्या गौर्यांमध्ये भाजले जातात. असे हे खरपूस लोळगे वरणासोबत अत्यंत रुचकर लागतात.
लोळगे हा प्रकार मोठ्या प्रमाणावर गावाकडे समुदायाचे भोजन असल्यास केला जातो . किंवा गावाकडे घरोघरी केल्या जाणार आहे हा पदार्थ आहे कारण तिथे शेणाच्या गौर्या या उपलब्ध असतात. आपण घरीही याप्रमाणे लोळगे करू शकतो
आपल्याला हे लोळगे मोठे न करता छोट्या आकारांमध्ये करू शकतो हे लोळगे भाजताना आपल्याकडे गौर्या नसल्यास एक कढई मध्ये तूप गरम करून त्यामध्ये हे लोळगे एक ते तास भाजावे लागतात .ते सारखे पंधरा पंधरा मिनिटांनी अल्टी पलटी करून भाजावे लागतात .
लोळगे वरतून झाकण ठेवल्याने हे वाफेवर चांगले भाजले जातात. आणि अल्टी पलटी केल्यामुळे त्या सगळ्या बाजूने ते भाजले जातात. खास करून वरण बट्टी चे जेवण गणपतीच्या उत्सवात दिले जाते. गणपतीचा भंडारा देवीचा भंडारा यावेळेस भोजनामध्ये वरण बट्टी वांग्याची भाजी चा मेनू असतो. खास करून खानदेशामध्ये लग्नाच्या जेवणामध्ये स्पेशली हळदीमध्ये वरण बट्टी वांग्याची भाजी हा मेनू असतो.
तसेच तिसरी पद्धत आपण ज्याप्रमाणे बट्टी वाफवून घेतली त्यानंतर ती बट्टी कापून घेतली होती. पण हीच बट्टी छोट्या आकारात गोल गोल गोळे करून वाफवून घ्यावी व तुपामध्ये तळून घ्यावी. आणि ती पुन्हा तुपात बुडवून खाण्यास द्यावी ही बट्टी अत्यंत रुचकर असते राजस्थान भागामध्ये अशी बट्टी केली जाते आणि ती फोडणीच्या वरणासोबत खाल्ली जाते. त्याला दाल बाटी असेही म्हटले जाते. या भट्टीचा गूळ घालून चूरमा देखील केला जातो. आपण पुढील रेसिपी मध्ये सूर्मा बघणारच आहोत.)
💡 ६. टिप्स (Cooking Tips)
फोडणीच्या वरणासोबत खाल्ली जाते.
🍽️ ७. सर्व्हिंग सुचना (Serving Suggestion)
🕒 ८. वेळ व परिमाण
• तयारीची वेळ: १० मिनिटे
• शिजवण्याची वेळ: ३५ मिनिटे
• एकूण वेळ: ५० मिनिटे
❤️ ९. निष्कर्ष / लेखकाची टिप्पणी
हा पदार्थ आरोग्यदायी, झटपट आणि पारंपरिक चवीचा आहे. आठवड्याच्या शेवटी नक्की करून बघा!
📚 १०. टॅग्स / कीवर्ड्स
घोटलेली वांग्याची रुचकर भाजी कशी बनवायची या साठी येथे क्लिक करावे
