चक्का कसा बनवायचा
प्रस्तावना::
चक्का पासून आपण वेगवेगळे पदार्थ बनवू शकतो… जसे की वेगवेगळ्या प्रकारचे श्रीखंड… घट्टसर अशी लस्सी असे अनेक पदार्थ तयार करता येतात… पण ते चक्क कसा बनवायचा त्याची कृती आपण आता बघणार आहे…
साहित्य:::
दीड किलो दही.
कृती:::
आपण दीड किलो दही बाहेरून विकत आणू शकतो… किंवा दही आपण घरी बनवू शकतो… मात्र इथे एकदम घट्टसर दह्याचा वापर करायचा आहे… दही ला थोडेही आंबटपणा नको… साय सकट दही म्हणजेच क्रिमी दही चा वापर आपल्याला इथे करायचा आहे… आता आपल्याला एक रुमाल घ्यायचा आहे… रुमाल आपण उद्या करून घ्यायचा आहे… तो ताटामध्ये आथरून द्यायचा. रुमालावर आपल्याला दीड किलो दही घालायचे आहे… रुमालाची चारी एकत्र करून त्याला गाठ मारायची आहे… आता याची आपण गठडी बांधून घेतली… ही बनलेली गठडी आपल्याला साधारण चार ते पाच तास टांगून ठेवायची आहे. यामधून दया मधून पाणी सर्व निघून जाईल.. ही गठळी योग्य पद्धतीने बांधायचे आहे जेणेकरून त्याचे पाणी संपूर्ण निघून जाईल…. खाली एखादे पाटील ठेवायचे…. चार ते पाच तास दही आपल्याला टांगून ठेवायचा आहे… यापेक्षा जास्त वेळ टांगून ठेवू नये… कारण दया मध्ये आंबटपणा निर्माण होईल… चार ते पाच तास झाल्यानंतर. गठडी खोलून त्यामधून सर्व पाणी निघून जाईल…. आणि घट्टसर असा चक्का तयार होईल… या छक्क्याचा वापर तुम्ही श्रीखंड किंवा लस्सी तयार करण्यासाठी करू शकतात…..
टिप्स:::
दही हे अत्यंत घट्ट हवे… नाहीतर चक्का बरोबर तयार होणार नाही….
