काबुली चण्याची चटपटीत अशी उसळ

by Vaishali Chaudhari
2 views

काबुली चण्याची चटपटीत अशी उसळ
प्रस्तावना::: आपण रोजच्या जेवणामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या उसळी खातो जसे की मटकीची उसळ चवळीची, उसळ हिरवे मुगाची उसळ, हरभऱ्याची उसळ, उसळीचे बरेच प्रकार असतात… त्यातच आपण काबुली चण्याचे छोल्यांची भाजी करतो… पण आज त्याची आपण उसळ केलेली आहे…. ही उसळ एकदम चवीला छान लागते…. आणि पटकनही शिजते….
साहित्य::: एक वाटी चणे रात्रभर पाण्यात भिजवलेले, एक कांदा दोन ते तीन कढीपत्त्याची पाने कोथिंबीर दहा ते बारा लसूण पाकळ्या अर्धा इंच अद्रकाचा तुकडा पाव चमचा हळद दीड चमचा तिखट एक चमचा धनापूर अर्धा चमचा गरम मसाला चिमूटभर हिंग फोडणीसाठी तेल आणि चवीप्रमाणे मीठ
कृती::: एक वाटी काबुली (म्हणजेच जे पांढरे चणे असतात त्याला काबुली चणे असे म्हणतात)चणे सकाळी धुवून स्वच्छ कुकरमध्ये पाच ते सहा शिट्ट्यांमध्ये वाफवून घ्या…. चणे चांगले वाफल्यानंतर गॅस बंद करा चण्यातील पाणी एका बाजूला व्यवस्थित बाहेर काढून घ्या…. यातल्या थोड्याशा पाण्याचा आपण वापर नंतर करणार आहे…. आता पंधरा व्यवस्थित बारीक चिरून घ्या… मिक्सरच्या भांड्यामध्ये अद्रक आणि लसणाची पेस्ट करून घ्या… कढईमध्ये फोडणीसाठी तेल घाला… तेल कडकडीत गरम झाल्यानंतर एक चमचा मोहरी एक चमचा जिरे घालून तडतडून घ्या त्यामध्ये कढीपत्ता घाला त्यानंतर त्यामध्ये कांदा घाला.. कांद्याला तांबूस रंग येईपर्यंत परतवून घ्या…. त्यामध्ये अद्रक लसणाची पेस्ट घाला… मिश्रण व्यवस्थित परतून घ्या…. त्यामध्ये चिमूटभर हिंग घाला..हे मिश्रण परतल्यानंतर त्यामध्ये पाव चमचा हळद दीड चमचा तिखट एक चमचा धना पूड अर्धा चमचा गरम मसाला मिश्रण व्यवस्थित परतून घ्या.. मिश्रण व्यवस्थित परतल्यानंतर त्याला छान तेल सुटेल….. त्यामध्ये उकडलेले कबुली चणे घाला.. व्यवस्थित मिक्स करून घ्या आता दोन ते तीन मिनिटे चण्यांना चांगली वाफ येऊ द्या…. चंदन चांगली वाफ आल्यानंतर त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घाला… आपण जे उकडलेले पाणी थोडेसे ठेवले होते त्यातले साधारण दोन ते तीन टेबलस्पून इतके तुम्ही पाणी त्यामध्ये घालू शकतात… तुम्हाला रसदार मी उसळ आवडत असल्यास थोडे जास्तही घातले तरी चालेल…. आता यामध्ये चिरलेली कोथिंबीर घाला…. आपली कबुली चण्याची उसळ तयार झालेली आहे…. ही उसळ अत्यंत चटपटीत अशी लागते…. यावर तुम्ही छान लिंबू बारीक शेव घेऊन खाऊ शकतात…. किंवा ही उसळ पुरी ,चपाती, बटर नान, फुलका, खारा पराठा यासोबत खाऊ शकतात…..
टिप्स::: काबुली चणे तुम्हाला असे वाटत असल्यास की आपले चणे जुने आहेत तर तुम्ही चणे वाफवताना चिमूटभर सोडा घालावा म्हणजे चणे व्यवस्थित नरम होतील…..
वेळ व परिमाण::
तयारीची वेळ :१० मिनिटे
एकूण वेळ:४० मिनिटे
परिमाण :दोन व्यक्तींसाठी

You may also like

Leave a Comment

अन्न हे पूर्ण ब्रम्ह
सर्वाना नमस्कार
• अन्न हे केवळ पोटभरण्यासाठी नसून ते एक पवित्र आणि आवश्यक गोष्ट आहे, ज्यातून जीवन जगण्यासाठी ऊर्जा मिळते
• अन्न हे जीवन जगण्याचा आणि ऊर्जेचा मुख्य स्रोत आहे. ते शरीराचे पोषण करते आणि स्वस्थ आरोग्य सुधारण्यास मदत करते.
• अन्न ग्रहण करताना आपण अन्नचा आदर केला पाहिजे. हळू खाणे, त्याची चव घेणे आणि कृतज्ञता बाळगणे हे महत्त्वाचे आहे.
• ‘पूर्ण’ म्हणजे संपूर्ण आणि ‘ब्रह्म’ म्हणजे निर्मिती किंवा वाढ. या वाक्यातून अन्न हे केवळ पोट भरणारे नसून ते एक दैवी देणगी आहे.
• योग्य आणि पौष्टिक अन्न घेतल्याने शरीर निरोगी राहते. तसेच, अन्नाचा आदर केल्याने मानसिक शांतता मिळते.
आज विविध प्रसार माध्यमातून अनेक पुस्तके, youtube video, reals, कार्यक्रमाच्या मध्यमातून अनेक व्यंजनाच्या पाककृती आपणास बघायला मिळतात.
ह्या वेबसाइट च्या माध्यमातून महाराष्ट्रीयन खाद्य संस्कृती मधील व्यंजन बनविण्याची ते ही पारंपरिक पद्धतीने बनविण्याची कृती याद्वारे आपल्या पर्यन्त पोहचविण्याचा प्रयत्न करीत आहोत. याचा उपयोग निश्चितच पूर्ण ब्रह्माचा आस्वाद घेण्याऱ्या खव्वये, यांना होईल.

Visitor’s Counter

6598

© 2025 All Rights Reserved | Developed by Vaishali Ajay Chaudhari & Amol Gopal Zambare. || Maintenance by A2Z Web Solutions.