डाळ चिखोल्या (भरड)

by Vaishali Chaudhari

डाळ चिखोल्या (भरड)


प्रस्तावना::

डाळ चिखोल्या भरड का पारंपारिक पदार्थ असून झटपट बनवला जाणार आहे. आणि तुरीच्या डाळीमध्ये आपल्याला प्रोटीन भरपूर प्रमाणात प्राप्त होते.


साहित्य::

  • एक वाटी तुरीची डाळ
  • एक मोठी वाटी कणीक
  • एक वाटी ज्वारीचे पीठ
  • एक कांदा
  • एक टोमॅटो
  • एका लसणाच्या पाकळ्या
  • कोथिंबीर
  • एक चमचा तिखट
  • मीठ
  • हळद
  • फोडणीसाठी तेल
  • जिरे मोहरी
  • तूप
  • पाणी


कृती::

डाळ चिखोल्या (भरड)प्रकार नंबर १

सर्वप्रथम तुरीची डाळ स्वच्छ धुऊन घ्या पण वरण भाताचे वरण शिजवतो त्याप्रमाणे तुरीची डाळ शिजवून घ्या.
आणि शिजवलेल्या डाळ चांगली घोटून त्यामध्ये हळद आणि मीठ घालून वरण तयार करा. तयार झालेले बरं, त्यामध्ये दोन ते तीन ग्लास पाणी घाला आणि पातळ करून घ्या.

आता त्या वर्णाला चार ते पाच उकळ्या आणून शिजवून घ्या. वरण शिजल्यानंतर गॅसची आस एकदम मंद करा.

एका परातीमध्ये कणिक आणि ज्वारीचे पीठ आणि त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घाला हे पीठ मिक्स करून घ्या.

यामध्ये पाणी घालून कणीक मळून घ्या. कणकेचा गोळा तयार झाला की मग ज्याप्रमाणे आपण पोळ्या लाटतो त्याप्रमाणे पोळी लाटा.

शंकरपाळ्याचे कटर साह्याने ज्याप्रमाणे आपण काजू-कतली किंवा चौकोनी आकारात कट करा. आता ही आता हे कणकेचे काप शिजलेल्या वरणामध्ये घाला.


आणि वळणावर झाकण ठेवून चांगली दहा ते पंधरा मिनिटे शिजवत रहा. मधून मधून मिश्रण ढवळत रहा. नाहीतर चिखोल्या भांड्याला खाली चिटकून जातील.

पंधरा मिनिटे झाल्यानंतर एक चिखोली डिशमध्ये काढून शिजली की नाही हे चेक करून घ्या. आता आपली डाळ चिखल्या तयार झालेल्या आहेत…..

या डाळ चिखोल्या वर आपण साजूक तूप घेऊन खाऊ शकतो… तसेच आता आपण याला फोडणी देऊन घेऊया.

डाळ चिखोल्या (भरड)प्रकार नंबर २

एक कांदा टोमॅटो बारीक चिरून घ्या लसणाचे काप करून घ्या.एका कढईमध्ये तेल गरम करून घ्या. तेल कडकडीत गरम झाले की मग त्यात जिरे मोहरी फोडणी घाला.

त्यामध्ये पाच ते सहा लसणाच्या पाकळ्यांचे काप करून तसेच बारीक चिरलेला कांदा घाला. बारीक चिरलेला टोमॅटो घाला एक चमचा तिखट घाला थोडे मीठ घाला.

आणि हे मिश्रण चांगले परतले की ते चिखोल्यांच्या मिश्रणात एकत्र करून घ्यावरून चिरलेली कोथिंबीर घाला आणि मिश्रण चांगले एकत्र करून घ्या.

या झाल्या आपल्या फोडणीच्या डाळ चिखल्या…..


टिप्स::

डाळ चिखोल्या करताना वळणामध्ये चिखल्या चांगल्या शिजू द्याव्या 10 ते 15 मिनिटे शिजल्यावर त्या शिजल्या की नाही हाताने चेपून बघाव्या नाहीतर पुन्हा पाच मिनिटे चांगल्या वाफवू द्या. नाहीतर खाताना कच्ची कणीक लागेल. आणि त्यामुळे पोट दुखू शकते.


वेळ व परिमाण:


तयारीची वेळ :२०मिनिटे
एकूण वेळ :४०मिनिटे
परिमाण :चार व्यक्तींसाठी

https://youtu.be/RLQJZtJGL38

You may also like

Leave a Comment

अन्न हे पूर्ण ब्रम्ह
सर्वाना नमस्कार
• अन्न हे केवळ पोटभरण्यासाठी नसून ते एक पवित्र आणि आवश्यक गोष्ट आहे, ज्यातून जीवन जगण्यासाठी ऊर्जा मिळते
• अन्न हे जीवन जगण्याचा आणि ऊर्जेचा मुख्य स्रोत आहे. ते शरीराचे पोषण करते आणि स्वस्थ आरोग्य सुधारण्यास मदत करते.
• अन्न ग्रहण करताना आपण अन्नचा आदर केला पाहिजे. हळू खाणे, त्याची चव घेणे आणि कृतज्ञता बाळगणे हे महत्त्वाचे आहे.
• ‘पूर्ण’ म्हणजे संपूर्ण आणि ‘ब्रह्म’ म्हणजे निर्मिती किंवा वाढ. या वाक्यातून अन्न हे केवळ पोट भरणारे नसून ते एक दैवी देणगी आहे.
• योग्य आणि पौष्टिक अन्न घेतल्याने शरीर निरोगी राहते. तसेच, अन्नाचा आदर केल्याने मानसिक शांतता मिळते.
आज विविध प्रसार माध्यमातून अनेक पुस्तके, youtube video, reals, कार्यक्रमाच्या मध्यमातून अनेक व्यंजनाच्या पाककृती आपणास बघायला मिळतात.
ह्या वेबसाइट च्या माध्यमातून महाराष्ट्रीयन खाद्य संस्कृती मधील व्यंजन बनविण्याची ते ही पारंपरिक पद्धतीने बनविण्याची कृती याद्वारे आपल्या पर्यन्त पोहचविण्याचा प्रयत्न करीत आहोत. याचा उपयोग निश्चितच पूर्ण ब्रह्माचा आस्वाद घेण्याऱ्या खव्वये, यांना होईल.

Visitor’s Counter

4319

© 2025 All Rights Reserved | Developed by Vaishali Ajay Chaudhari & Amol Gopal Zambare. || Maintenance by A2Z Web Solutions.