थोडक्यात :- हा खान्देश मधील अस्सल मराठमोळी भाजीचा प्रकार आहे हा भाकरी मोडून काला करून खाऊ शकतात
साहित्य

- १ चमच्या मेथ्या,
- अर्धी वाटी तुरीची डाळ
- १ कांदा,
- १५-२० काप खोब्रा ,
- २ चमचे शेगदाणे,
- जीरे, मोहरी
- अद्रक अर्धा इंच
- १0 लसूण पाकळ्या
- फोडणीसाठी तेल,
- कोथींबीर,
- मीठ,
- हिरव्या मिरची बारीक,
- पाणी,
- चिमूटभर हळद

कृती:
प्रथम तव्यावर मेथ्या भाजून घेणे, नंतर कुकरमध्ये मेथ्या व धुतलेली तुरीची डाळ त्यात पाणी घालून वरण लावतो, त्याप्रमाणे लावणे.
नंतर तव्यावर चिरलेला कांदा थोडा काळसर होईल, तोपर्यंत भाजणे
मिक्सरच्या भांड्यात भाजलेले कांदा, खोब्रा, शेंगदाणे, मिरच्या, थोडे जीर, लसूण , कोथींबीर घालून चटणी वाटून घेणे. चटणी बारीक करावी, पाण्याचा वापर करावा.
नंतर काढाईत तेल घाला, त्यात जिरे,मोहरी फोडणी घातल्यावर चटणी व हळद घालून परतवा
चटणीवर जो पर्यन्त तेल सुटत नाही तो पर्यन्त परता
मेथी व तुरीचे वरण थोडे रवीने घोंटून घ्या
नंतर हे मिश्रण चटणीत घालून परतवा
त्यात आपल्या आवडीनुसार पाणी घालून रस्सा करा
त्यात चवीप्रमाणे मीठ घाला
चार ते पांच उकळ्या आल्या की दाळ मेथीची भाजी तयार आहे
टिप्सः
मेथ्या कच्च्या वापर करू नये, भाजी कडू होते मेथीला आधीच कडूपणा असतो त्यामुळे भाजून मगच उकळा
वेळ व परिमाण
तयारी १० मिनीटे
एकूण वेळ ४० मिनीटे
परिमाण ५ जणांसाठी
