ज्वारीचे धिंडे(धिरडे)

प्रस्तावना:
ज्वारीची धिंडे(धिरडे) हा पूर्वीपासून केले जाणाऱ्या पदार्थ आहे. हा पदार्थ साधारणतः हिवाळ्यामध्ये केला जातो कारण या धिंड्यावर घातला जाणारा गुळ त्यामुळे शरीरास गर्मी उत्पन्न होते. ज्याप्रमाणे थंडीमध्ये डिंकाचे लाडू खाल्ले जातात त्याचप्रमाणे धिंडे हा पदार्थ खाल्ला जातो. अत्यंत उत्कृष्ट असा चवीला लागणारा पदार्थ हा गावोगावी केला जातो.
साहित्य:
- एक किलो ज्वारी
- पाव वाटी मेथ्या
- 15 लसणाच्या पाकळ्या
- 1 इंच अद्रकाचा तुकडा
- एक चमचा धण्याची पूड
- किसून घेतलेला गुळ
- तेल
- एक वाटी साईसकट दूध
- मीठ

कृती :
सर्वप्रथम ज्वारी ही पांढरीशुभ्र असावी. एक किलो ज्वारी स्वच्छ धुऊन घ्यावी. अर्धा तास पाण्यामध्ये ज्वारी भिजत घालावी.
त्यानंतर एका चाळणीमध्ये तिला नितरत ठेवावी. ज्वारी मधील संपूर्ण पाणी निघू द्यावे त्यानंतर ज्वारी एका कपड्यावर पसरवून घ्यावे.
वरून थोडा फॅन लावावा ज्वारी पानतूटी होईल. आता एक मिक्सरची भांडी घेऊन त्यामध्ये थोडी ज्वारी घाला ती सीमवर थांबून थांबून फिरवा.
लगातार एकसारखे फिरवू नका आपल्याला ज्वारी वरचे सालट काढायचे आहे त्यामुळे ती हळूहळू सीमवर फिरवा.
एका कपड्यावर ती काढून घ्या. याचप्रमाणे संपूर्ण किलोभर ज्वारी सिमवर हळूहळू फिरवत काढून घ्या नंतर ती स्वच्छ अशी चोळून घ्या.
थोडी थोडी पाखडून घ्या त्यावरचे बोंडे व काहीच सालट निघून जातील त्यामुळे ज्वारी कांडली जाईल. आणि आणखी पांढरीशुभ्र होईल.
आता ज्वारी पाण्यामध्ये रात्रभर भिजत ठेवा. एका दुसऱ्या पातेल्यामध्ये पाव वाटी मेथ्या भिजत घाला.
आपण मिक्सरमधून फिरवल्यानंतर जो बारीक सर भुगा शिल्लक असेल सालटे सोडून तू भूगाही पाण्यामध्ये घाला .
सकाळी सर्व ज्वारी पुन्हा धुवून घ्या. आता एका कढईमध्ये पाणी उकडीला ठेवा. पाण्याला उकळी आली की मग जो भुगा आपण भिजू घातलेला आहे.
तसेच थोडी ज्वारी घेऊन ती उकडलेल्या पाण्यामध्ये घाला तसेच त्यामध्ये मेथ्या घाला.
या ज्वारी आणि मेथीच्या मिश्रणाला चांगल्या दहा ते पंधरा उकळ्या येऊ द्या. हे मिश्रण सारखे ढवळत रहा.
याला घाटा शिजवणे असे म्हणतात. असे म्हणतात घाटा शिजवला की धिरडे (धिंडे)तुटत नाही. त्यामध्ये एक चिवटपणा येतो.
आता हा घाटा शिजला की मग ज्वारीच्या मिश्रणामध्ये घाला. हे मिश्रण सगळे एकत्र करा.
आधीची ज्वारी आणि शिजवलेल्या घाटाचे मिश्रण आपण चक्कीवरून वाटून आणू शकतो. किंवा आपल्या मिक्सरवरही वाटू शकतो.
ज्याप्रमाणे आपण इडलीचे रवण वाटतो त्याचप्रमाणे हे रवण वाटून घ्यावे. रवण वाटल्यानंतर साधारण सात ते आठ तासात ते फुगून येते.
आता आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये अद्रक लसूण आणि धने पूड घालून त्यात थोडे पाणी घालून पातळसर चटणी वाटून घ्या.
हे मिश्रण फुगले की त्यामध्ये आपण अद्रक लसूण याची चटणी घाला. आणि चवीप्रमाणे मीठ घाला.
आपण संध्याकाळी आपण संध्याकाळी या मिश्रणाचे ज्याप्रमाणे डोसे करतो त्याप्रमाणेच धिंडे बनवू शकतो.
हे धिंडे निर्लेप तव्यावर तुम्ही काढू शकतात. किंवा ज्यांच्याकडे पूर्वापार असलेली कहानी असल्यास त्यावर अत्यंत उत्तम असे धिंडे तयार होते.

त्या कहानीला तेल लावून डोशाप्रमाणे एक चमचाभर रवण घालून पसरवा. त्यावर झाकण ठेवा आता ते ज्वारीचे धिंडे पलटवा.
पलटवल्यानंतर त्यावर तेल घाला. वरून किसलेला गूळ पसरवा. आता तुमचे ज्वारीचे धिंडे तयार आहे.
हेधिंडे आपण दुधासोबत खाऊ शकतो किंवा असेही खाल्ले जाते कारण त्यावर गोड असा गोड असतो. चवीला अति उत्तम असे लागते.

टिप्स :
ज्वारीचे धिंडे तयार करताना आपण जो घाटा शिजवतो .त्यामुळे धिंड्याला एक चिवटपणा निर्माण होतो काही वेळेस धिंडे हे ज्यावेळेस आपण तव्यावर घालतो त्यावेळेस त्याचे तुकडे पडतात. हे धिंडे सहजासहजी जमत नाही काही लोक घाटा न शिजवताच धिंडे रवण तयार करतात. असे रवणचे धिंडे करण्यास कठीण जातात.

वेळ व परिमाण:
तयारीची वेळ: दोन दिवस
एकूण वेळ: दोन दिवस
परिमाण: पाच ते सहा जणांसाठी
