दोडक्याची कोरडी भाजी
प्रस्तावना:
ही प्रत्येक घरात केली जाणारी कोरडी भाजी आहे रोजच्या जेवणात समावेश आपण करू शकतो.

साहित्य:
- पाव किलो दोडके,
- सहा बारीक हिरव्या मिरच्या,
- अर्धी वाटी शेंगदाणे,
- आठ लसूण पाकळ्या,
- अर्धा इंच अद्रक तुकडा,
- जिरे मोहरी,
- पाव चमचा हळद,
- मीठ,
- फोडणीसाठी तेल,
- कोथिंबीर
कृती:
दोडके धुऊन घ्या. दोडके सोलून बारीक चिरून घ्या.
शेंगदाणे भाजून त्याचं शेंगदाण्याचं कूट करून घ्या.
अद्रक लसणाची पेस्ट करून घ्या. मिरचीचे तुकडे काप करून घ्या.
एका कढाई मध्ये तेल गरम करून घ्या.
तेल गरम झाल्यानंतर जिरे मोहरी फोडणी घातल्यानंतर हिरव्या मिरच्यांची काप घाला. त्यामध्ये अद्रक लसणाची पेस्ट घाला.
त्यामध्ये हळद घाला.
त्यामध्ये चिरलेले दोडके घाला.
चिरलेले दोडके वाफले गेले की त्यामध्ये शेंगदाण्याचे कूट घाला. चवीप्रमाणे मीठ घाला.
भाजी चांगली शिजल्यानंतर गॅस बंद करा.
त्यामध्ये चिरलेली कोथिंबीर घाला.
दोडक्याची कोरडी भाजी तयार आहे.

टिप्स:
दोडक्याची कोरडी भाजी करताना दोडके पूर्ण शिजवून झाल्यावरच मीठ घाला.
वेळ व परिमाण:
तयारीची वेळ:१० मिनिटे
एकूण वेळ: ३५ मिनिटे
परिमाण :२ जणांसाठी
