ड्रायफूट श्रीखंड सोप्या पद्धतीने कसे तयार करायचे

by Vaishali Chaudhari
0 views

ड्रायफूट श्रीखंड सोप्या पद्धतीने कसे तयार करायचे

साहित्य:::

सहाशे ग्रॅम चक्का दीड वाटी पिठी साखर तीन वेलची जायफळ चार ते पाच काड्या केसर चार ते पाच काजू दोन ते तीन बदाम चिमटीभर फूड कलर

कृती:::

सर्वप्रथम एका पातेल्यामध्ये चक्का घ्या… त्यामध्ये दीड वाटी पिठीसाखर घाला… आता हे वीस वर्षाच्या साह्याने चांगले फेटून घ्या… विस्करच्या साह्याने फेटा… साखर व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये वेलची पूड आणि जायफळ पावडर घाला… त्यानंतर विस्कर पुन्हा फेटून घ्या… त्यामध्ये केसर च्या काड्या घाला…. आणि व्यवस्थित फेटून घ्या…त्यामध्ये काजू बदाम चे तुकडे घाला.. यामध्ये थोडासा चिमटीभर पिवळा फूड कलर झाला… फूड कलरचा वापर नाही केला तरी चालेल तुम्ही केसरचा जास्त वापर केल्यास त्याला पिवळा रंग येईल….. आता आपले केसर ड्रायफ्रूट श्रीखंड तयार झालेले आहे… एन्जॉय करूया श्रीखंड…

टिप्स::: श्रीखंड तयार करताना विस्करच्या साह्याने चांगले फेटा…

वेळ व परिमाण:::
तयारीची वेळ:१० मिनिटे
एकूण वेळ :२०मिनिटे
परिमाण: चार व्यक्तींसाठी

You may also like

Leave a Comment

अन्न हे पूर्ण ब्रम्ह
सर्वाना नमस्कार
• अन्न हे केवळ पोटभरण्यासाठी नसून ते एक पवित्र आणि आवश्यक गोष्ट आहे, ज्यातून जीवन जगण्यासाठी ऊर्जा मिळते
• अन्न हे जीवन जगण्याचा आणि ऊर्जेचा मुख्य स्रोत आहे. ते शरीराचे पोषण करते आणि स्वस्थ आरोग्य सुधारण्यास मदत करते.
• अन्न ग्रहण करताना आपण अन्नचा आदर केला पाहिजे. हळू खाणे, त्याची चव घेणे आणि कृतज्ञता बाळगणे हे महत्त्वाचे आहे.
• ‘पूर्ण’ म्हणजे संपूर्ण आणि ‘ब्रह्म’ म्हणजे निर्मिती किंवा वाढ. या वाक्यातून अन्न हे केवळ पोट भरणारे नसून ते एक दैवी देणगी आहे.
• योग्य आणि पौष्टिक अन्न घेतल्याने शरीर निरोगी राहते. तसेच, अन्नाचा आदर केल्याने मानसिक शांतता मिळते.
आज विविध प्रसार माध्यमातून अनेक पुस्तके, youtube video, reals, कार्यक्रमाच्या मध्यमातून अनेक व्यंजनाच्या पाककृती आपणास बघायला मिळतात.
ह्या वेबसाइट च्या माध्यमातून महाराष्ट्रीयन खाद्य संस्कृती मधील व्यंजन बनविण्याची ते ही पारंपरिक पद्धतीने बनविण्याची कृती याद्वारे आपल्या पर्यन्त पोहचविण्याचा प्रयत्न करीत आहोत. याचा उपयोग निश्चितच पूर्ण ब्रह्माचा आस्वाद घेण्याऱ्या खव्वये, यांना होईल.

Visitor’s Counter

7370

© 2025 All Rights Reserved | Developed by Vaishali Ajay Chaudhari & Amol Gopal Zambare. || Maintenance by A2Z Web Solutions.