दुधी भोपळा (हिरवी रस्सा )

by Vaishali Chaudhari

दुधी भोपळा (हिरवी रस्सा )

थोडक्यात

हा खादेश भागातील हिरवी पातळ (रस्सा) भाजीचा प्रकार आहे ही भोपळ्याची भाजी,भाकरी आणि कढीचा बेट फारच भारी

साहित्य

  • 1 दुधी भोपळा (अर्धा किलो )
  • 4 चमचा हरबरा डाळ(अर्धी वाटी)
  • 9 हिरवी मिरची
  • छोटी अर्धी वाटी शेगदाणे
  • 8 लसूण पाकळ्या
  • छोटा तुकडा अद्रक
  • जिरे, मोहरी
  • फोडणीसाठी तेल
  • मीठ
  • कोथीबिर
  • पाणी
  • गरम मसाला
  • 2 चिमटी हळद

कृती :

दुधी भोपळ्याचे कापून घेणे त्यात हरबरा डाळ घालून धुवून घ्या

नंतर कुकरमध्ये भोपळा व दाळ चांगल्या पांच शिट्या घेवून वाफवून घ्या

तव्यावर हिरवी मिरची शेगदाणे भाजून घ्या

मिक्सरच्या भांड्यात मिरची, शेगदाणे लसूण,अद्रक ,जिरे ,कोथीबीर घाला

व थोडे पाणी घालून चटणी करून घ्या,

एका कढाईत तेल घालून जिरे मोहरी तडकावली की चटणी घाला

त्यात हळद घाला चटणी तेल सुटे पर्यन्त परतवा

नंतर उकडलेला भोपळा पाण्यासकट टाका, व वरून घट्ट वाटल्यास थोडे पाणी घाला. चवीप्रमाणे मीठ घाला, नंतर चार ते पांच उकळ्या आल्या की भाजी तय्यार

टिप्स

भोपळा उकळताना शिट्या पाच होऊ दया कारण भोपळा लवकर शिजत नाही

तयारीची वेळ 20 मिनिट

एकूण वेळ 40 मिनिट

परिमाण 05 झण

You may also like

Leave a Comment

अन्न हे पूर्ण ब्रम्ह
सर्वाना नमस्कार
• अन्न हे केवळ पोटभरण्यासाठी नसून ते एक पवित्र आणि आवश्यक गोष्ट आहे, ज्यातून जीवन जगण्यासाठी ऊर्जा मिळते
• अन्न हे जीवन जगण्याचा आणि ऊर्जेचा मुख्य स्रोत आहे. ते शरीराचे पोषण करते आणि स्वस्थ आरोग्य सुधारण्यास मदत करते.
• अन्न ग्रहण करताना आपण अन्नचा आदर केला पाहिजे. हळू खाणे, त्याची चव घेणे आणि कृतज्ञता बाळगणे हे महत्त्वाचे आहे.
• ‘पूर्ण’ म्हणजे संपूर्ण आणि ‘ब्रह्म’ म्हणजे निर्मिती किंवा वाढ. या वाक्यातून अन्न हे केवळ पोट भरणारे नसून ते एक दैवी देणगी आहे.
• योग्य आणि पौष्टिक अन्न घेतल्याने शरीर निरोगी राहते. तसेच, अन्नाचा आदर केल्याने मानसिक शांतता मिळते.
आज विविध प्रसार माध्यमातून अनेक पुस्तके, youtube video, reals, कार्यक्रमाच्या मध्यमातून अनेक व्यंजनाच्या पाककृती आपणास बघायला मिळतात.
ह्या वेबसाइट च्या माध्यमातून महाराष्ट्रीयन खाद्य संस्कृती मधील व्यंजन बनविण्याची ते ही पारंपरिक पद्धतीने बनविण्याची कृती याद्वारे आपल्या पर्यन्त पोहचविण्याचा प्रयत्न करीत आहोत. याचा उपयोग निश्चितच पूर्ण ब्रह्माचा आस्वाद घेण्याऱ्या खव्वये, यांना होईल.

Visitor’s Counter

4319

© 2025 All Rights Reserved | Developed by Vaishali Ajay Chaudhari & Amol Gopal Zambare. || Maintenance by A2Z Web Solutions.