उपवासाचे रताळ्या पासून बनवलेले गुलाबजाम

by Vaishali Chaudhari
3 views

उपवासाचे रताळ्या पासून बनवलेले गुलाबजाम
प्रस्तावना::: उपवासाला काही नवीन नवीन रेसिपी खावेशा वाटतात कारण नेहमीच आपण या इतर सर्व रेसिपी खातच असतो पण काही वेगळं गोड खाण्याचे इच्छा झाली तर आपण रताळ्याची गुलाबजाम बनवू शकतो कारण खव्याचे गुलाबजाम पण नेहमीच बनवत असतो प्रत्येक वेळेस खवा असेलच असे नाही…. अशा वेळेस मुलांना गुलाबजाम खाण्याची इच्छा झाली तर आपण रताळ्याचे छान मऊ गुलाबजाम बनवू शकतो…. आणि चवीला समजणार सुद्धा नाही खव्यापासून बनवले आहे की रताळ्याच्या पासून बनवलेले आहे….
साहित्य::: दोन मोठे रताळी पाव किलो अर्धी वाटी साखर अर्धी वाटी मिल्क पावडर तळण्यासाठी तूप
कृती:: सर्वप्रथम रताळे दोन शिट्या घेऊन चांगले उकडून घ्या… रताळी उकळताना रताळे अर्धे बुडतील इतकेच पाणी घालावे…. कारण जास्त पाणी घालू नये नाहीतर रताळ्यांचा गचका होईल… किंवा त्याचे काप करून आपण चाळणीवर ठेवून खाली पातेल्यामध्ये पाणी ठेवून सुद्धा वाफवून घेऊ शकतो….. म्हणजे रताळ्यांचा गचगच होणार नाही…. कारण रताळ्या मध्ये पाणी मुरल्यास आपले गुलाबजाम वितळू शकतात किंवा त्यामध्ये आपल्याला अधिक मिल्क पावडर घालायला लागेल आणि गुलाबजाम कडक होऊ शकतात…. जोपर्यंत रताळी उकळली जात आहे तोपर्यंत आपण साखरेचा पाक करून घेऊ एका पातेल्यामध्ये अर्धी वाटी साखर त्यामध्ये एक वाटी पाणी घालून साखरेचा पाक करून घ्या….. पाक हा घट्ट करायचा नाही एक तारी पेक्षा कमी केला तरी चालेल…..रताळी उकडून झाले की मग रताळे सोलून घ्या आणि किसणीच्या साह्याने किसून घ्या… तुम्ही बारीक करून घेऊ शकतात… पण त्यामध्ये गुठळ्या राहू शकतात म्हणून आपण त्याला किसणीच्या साह्याने किसून घ्या…… त्यानंतर या केसांमध्ये अर्धी वाटी मिल्क पावडर घाला आणि चांगले व्यवस्थित मळून घ्या कधी कधी अर्धी वाटी पेक्षा जास्त मिल्क पावडर आपल्याला घालावी लागू शकते कारण त्यामध्ये गोळा तयार होईल …..इतपत आपण मिल्क पावडर घालावी पण एक वाटीच्या वर मिल्क पावडर लागणार नाही…. अर्धी वाटीच्यावर मी इथे थोडेसेच मिल्क पावडर वापरलेले आहे जास्त घालण्याची गरज नाही नाहीतर गुलाबजाम कडक होती….. आता गुलाबजाम आपले तयार करून घ्या सगळे गोल किंवा लांबुळक्या आकारामध्ये तुम्ही करू शकतात…. कढईमध्ये तूप गरम करून घ्या….. आधी गुलाबजाम तळून घ्या तो जर वितळत असेल तर तुम्ही अजून मिल्क पावडर त्यामध्ये घालू शकतात… शक्यतो गुलाबजाम वितळणार नाही… आता त्यामध्ये चार ते पाच गुलाबजाम खालून तळून घ्या… तळल्यानंतर लगेचच साखरेच्या पाकामध्ये गुलाबजाम घालावे…. पाक गरमच असेल त्यामध्येच गुलाबजाम घाला… काकाचा गॅस चालू ठेवू नका…. किंवा गुलाबजाम थंड झाल्यावरही त्यात घालू नका… गरम गुलाबजामस गरम पाकामध्ये घाला… या पद्धतीने सर्व गुलाबजाम तळून घ्या आणि पाकामध्ये घाला.. दोन तासासाठी त्यावर झाकण ठेवून द्या….. आता आपला पाक चांगला गुलाबजाम मध्ये मुरलेला असेल मऊ लुसलुशीत असे रताळ्याचे उपासाचे गुलाबजाम तयार झालेले आहे…..
टिप्स:: गुलाबजाम करताना तुम्हाला जास्त गोड आवडत असल्यास तुम्ही अर्धी वाटी साखरेच्या ऐवजी एक वाटी साखरेचा पाक तुम्ही करू शकतात… आणि इथे मीनिंग पावडर चा वापर केला आहे त्या ऐवजी ऑप्शन म्हणून तुम्ही शिंगाड्याच्या पिठाचा वापर करू शकतात…. प्रमाण सारखेच वापरायचे आहे अर्धी वाटी शेंगदाण्याचे पीठ वापरायचे आहे….
वेळ व परिमाण:::
तयारीची वेळ:१० मिनिटे
एकूण वेळ:३० मिनिटे
परिमाण:: दोन व्यक्तीसाठी

Leave a Comment

अन्न हे पूर्ण ब्रम्ह
सर्वाना नमस्कार
• अन्न हे केवळ पोटभरण्यासाठी नसून ते एक पवित्र आणि आवश्यक गोष्ट आहे, ज्यातून जीवन जगण्यासाठी ऊर्जा मिळते
• अन्न हे जीवन जगण्याचा आणि ऊर्जेचा मुख्य स्रोत आहे. ते शरीराचे पोषण करते आणि स्वस्थ आरोग्य सुधारण्यास मदत करते.
• अन्न ग्रहण करताना आपण अन्नचा आदर केला पाहिजे. हळू खाणे, त्याची चव घेणे आणि कृतज्ञता बाळगणे हे महत्त्वाचे आहे.
• ‘पूर्ण’ म्हणजे संपूर्ण आणि ‘ब्रह्म’ म्हणजे निर्मिती किंवा वाढ. या वाक्यातून अन्न हे केवळ पोट भरणारे नसून ते एक दैवी देणगी आहे.
• योग्य आणि पौष्टिक अन्न घेतल्याने शरीर निरोगी राहते. तसेच, अन्नाचा आदर केल्याने मानसिक शांतता मिळते.
आज विविध प्रसार माध्यमातून अनेक पुस्तके, youtube video, reals, कार्यक्रमाच्या मध्यमातून अनेक व्यंजनाच्या पाककृती आपणास बघायला मिळतात.
ह्या वेबसाइट च्या माध्यमातून महाराष्ट्रीयन खाद्य संस्कृती मधील व्यंजन बनविण्याची ते ही पारंपरिक पद्धतीने बनविण्याची कृती याद्वारे आपल्या पर्यन्त पोहचविण्याचा प्रयत्न करीत आहोत. याचा उपयोग निश्चितच पूर्ण ब्रह्माचा आस्वाद घेण्याऱ्या खव्वये, यांना होईल.

Visitor’s Counter

6598

© 2025 All Rights Reserved | Developed by Vaishali Ajay Chaudhari & Amol Gopal Zambare. || Maintenance by A2Z Web Solutions.