#Holi Special | Thandai Recipe – होली स्पेशल ठंडाई |होळी स्पेशल#

by Vaishali Chaudhari

होळी स्पेशल थंडाई

प्रस्तावना:::

होळीमध्ये पिली जाणारी थंडाई हे शीतपेय सर्वांनाच आवडते.. होळीमध्ये यामध्ये बऱ्याच ठिकाणी भांग मिक्स केली जाते हे उत्तर प्रदेशातील फेमस असं शीतपेय आहे….. आपण इथे भाग न मिक्स करतात थंडाई बनवणार आहे….


साहित्य::

एक लहान वाटी बदाम (२ टेबल स्पून १२) एक लहान वाटी काजू (१ १/२टेबल स्पून ८) मेलन सीड( १ १/२ टेबल स्पून) १ चमचा शोप २ टेबल स्पून खसखस दहा ते बारा सहा हिरवे वेलदोडे साबूत अर्धी वाटी गुलाब पाकळ्या एक मोठा खडा खडीसाखरेचा एक ग्लास दूध


कृती:::


सर्वप्रथम खडीसाखर खलबत्त्यामध्ये कुटून घ्यावी.. नाहीतर मिक्सर चे भांडे खराब होते.. खडीसाखर डायरेक्ट मिक्सरमध्ये बारीक होत नाही…मिक्सरच्या भांड्यामध्ये खडीसाखर पावडर काजू बदाम मिलन सीड खसखस शोप मिरे, हिरवे वेलदोडे गुलाबाच्या पाकळ्या घालाव्या…. हिरवे वेलदोडे हे अख्खेच घालावे… त्यामध्ये त्याचा फ्लेवर उतरतो…. आता हे मिश्रण हळूहळू मिक्सरमध्ये बारीक करावे. त्याची एकदम बारीक सर फूड करावी.. ही पुढचा आणि च्या साह्याने गाळून घ्यावी… चाळल्यानंतर बारीक पावडर तयार होईल… त्याची बारीक पूड झाल्यानंतर त्यामध्ये पुन्हा गुलाबाची पाने लांब काप करून घालावी.. त्यानंतर यामध्ये केशराच्या काड्या घालाव्या आणि मिश्रण व्यवस्थित एकत्र करून घ्यावे… आपला थंडाई मसाला आता तयार झालेला आहे…


एका ग्लासमध्ये दूध घेऊन एक ते दीड चमचा थंडाई मसाला घालावा.. आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यावे आपली थंडाई तयार झालेली आहे… आपल्याला जर गोड आवडत असल्यास तुम्ही दुधामध्ये अजून थोडी साखर घालू शकतात…. आपली थंडाई लगेचच तयार होईल.. ही थंडाई आपण थंड दुधामध्ये केलेली आहे… या पावडरीचा वापर तुम्ही दूध गरम करून त्यामध्ये दीड चमचा थंडाई पावडर घालून एक उकळी आणून गॅस बंद करा आपली थंडाई तयार झाली आहे या पद्धतीने सुद्धा थंडाई केली जाते… थंड दुधामध्ये थंडाई पावडर अत्यंत छान लागते आणि ही थंडाई शरीर एकदम थंड ठेवते उन्हाळ्यामध्ये हे पेय पिले जाते….. इथे तुमच्याकडे गुलाब पाकळ्या नसल्यास तुम्ही गुलकंदाचा सुद्धा वापर करू शकतात फक्त गुलकंद टाकताना ज्यावेळेस आपण दूध तयार करतो त्यावेळेस एक चमचा गुलकंद घालावे आणि दीड चमचा थंडाई पावडर घालावी… चला तर आपली थंडीगार अशी थंडाई तयार झालेली आहे एन्जॉय…… होळीला आपण नक्की थांडायची रेसिपी करून बघा…. थंडी गार थंडाई……

टिप्स:::

थंडाई करताना आपल्याकडे गुलाबाच्या पाकळ्या जर नसतील तर त्याऐवजी आपण दुधामध्ये गुलकंद सुद्धा वापरू शकतो… इथे मी खडीसाखरेचा वापर केलेला आहे तुम्ही इथे खडीसाखर नसल्यास साखरेचा सुद्धा वापर करू शकतात साखर साधारण सहा चम्मच इतकी घालावी आणि पावडर करून घ्यावे…..
वेळ व परिमाण::
तयारीची वेळ: १० मिनिट
एकूण वेळ १५ मिनिटे

Leave a Comment

अन्न हे पूर्ण ब्रम्ह
सर्वाना नमस्कार
• अन्न हे केवळ पोटभरण्यासाठी नसून ते एक पवित्र आणि आवश्यक गोष्ट आहे, ज्यातून जीवन जगण्यासाठी ऊर्जा मिळते
• अन्न हे जीवन जगण्याचा आणि ऊर्जेचा मुख्य स्रोत आहे. ते शरीराचे पोषण करते आणि स्वस्थ आरोग्य सुधारण्यास मदत करते.
• अन्न ग्रहण करताना आपण अन्नचा आदर केला पाहिजे. हळू खाणे, त्याची चव घेणे आणि कृतज्ञता बाळगणे हे महत्त्वाचे आहे.
• ‘पूर्ण’ म्हणजे संपूर्ण आणि ‘ब्रह्म’ म्हणजे निर्मिती किंवा वाढ. या वाक्यातून अन्न हे केवळ पोट भरणारे नसून ते एक दैवी देणगी आहे.
• योग्य आणि पौष्टिक अन्न घेतल्याने शरीर निरोगी राहते. तसेच, अन्नाचा आदर केल्याने मानसिक शांतता मिळते.
आज विविध प्रसार माध्यमातून अनेक पुस्तके, youtube video, reals, कार्यक्रमाच्या मध्यमातून अनेक व्यंजनाच्या पाककृती आपणास बघायला मिळतात.
ह्या वेबसाइट च्या माध्यमातून महाराष्ट्रीयन खाद्य संस्कृती मधील व्यंजन बनविण्याची ते ही पारंपरिक पद्धतीने बनविण्याची कृती याद्वारे आपल्या पर्यन्त पोहचविण्याचा प्रयत्न करीत आहोत. याचा उपयोग निश्चितच पूर्ण ब्रह्माचा आस्वाद घेण्याऱ्या खव्वये, यांना होईल.

Visitor’s Counter

6361

© 2025 All Rights Reserved | Developed by Vaishali Ajay Chaudhari & Amol Gopal Zambare. || Maintenance by A2Z Web Solutions.