कबाब:वाटाण्याचे हरे भरे चटपटीत कबाब

by Vaishali Chaudhari
2 views

वाटाण्याचे हरे भरे चटपटीत कबाब
प्रस्तावना:::

वाटाण्यांचा सिझन चालू झाला की वाटाण्यापासून काय रेसिपी करायची हे आपण सतत विचार करत असतो आणि ती सर्वांना आवडली पाहिजे कारण वाटाण्याचा उग्रपणा याची चव आपल्या रेसिपी मध्ये लागू नये आणि एकदम चविष्ट अशी रेसिपी बनवावी असे सगळ्यांनाच वाटते… तर आपण आज त्यासाठी बघणार आहे वाटण्याचा हराबरा चटपटीत असा कबाब…. आमची आजी पूर्वी अशा रेसिपी तर वेगळ्या पद्धतीने बनवायची त्याला वेगवेगळे नावं राहायचे पण आज आपण त्याला वेगळे असे नाव दिलेले आहे ते म्हणजे वाटाण्याचा हराभरा कबाब….

साहित्य::

  • १ वाटी सोललेले वाटाणे
  • दोन बटाटे
  • सात ते आठ हिरव्या मिरच्या
  • दहा ते बारा लसूण पाकळ्या
  • अर्धा इंच अद्रकाचा तुकडा
  • कोथिंबीर पाव चमचा हळद
  • एक चमचा तिखट
  • पाव चमचा ओरेगॅनो पावडर
  • एक चमचा चाट मसाला
  • चवीप्रमाणे मीठ
  • तळण्यासाठी तेल
  • आणि ब्रेडक्रम्स

कृती:::

सर्वप्रथम बटाटे उकडून घ्यावे बटाटे सोलून घ्यावे .. त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटाणे, हिरव्या मिरच्या, लसूण अद्रक घालून त्याचा जाडसर असा भरडा करून घ्यावा….

मिक्सर फिरवताना पल्स मोडवर फिरवावे जेणेकरून एकदम पेस्ट होणार नाही आपल्याला याची एकदम पेस्ट करायची नाही….

आपल्याला जाडसर भरडा करायचा आहे त्यामुळे मिक्सर हळूहळू चालू बंद करत पल्स मोडवर करावे….

आपल्या वाटाण्याचा लगदा एका भांड्यामध्ये काढून घ्यावा .. त्यानंतर त्यामध्ये सोललेले बटाटे किसणीच्या साह्याने किसून घ्यावे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यावे…

कढईमध्ये दोन चमचे तेल गरम करावे. त्यामध्ये वाटाण्याचा व बटाट्याचा लगदा घालावा….

लगदा घातल्यानंतर मिश्रणामध्ये पाव चमचा हळद एक चमचा तिखट एक चमचा चाट मसाला ओरिगानो आणि चवीप्रमाणे मीठ घालून हे मिश्रण चांगले वरून खालून परतून घ्यावे मिश्रण परतताना चांगले व्यवस्थित मिक्स होईल याची काळजी घ्यावी…..

मिश्रणामधील कचवटपणा निघून जावा यासाठी आपण मिश्रण चांगले परतवायचे आहे चांगले तीन ते चार मिनिटे आपल्याला मिश्रण परतवून घ्यायचे आहे….

आता गॅस बंद करावा… त्यामध्ये चिरलेली कोथिंबीर घाला कोथिंबीर चांगली भरपूर घाला…. त्यानंतर हे मी मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्या…

आता मिश्रण थंड होऊ द्या मिश्रण थंड झाल्यानंतर आपल्याला त्याचे लहान लहान गोळे करून त्याला चपटा आकार द्यायचा आहे…

तुम्हाला आवडतील त्या आकारामध्ये तुम्ही हे कबाब तयार करू शकतात तुम्ही लांबोळका आकार सुद्धा देऊ शकतात…

आता हे सर्व कबाब तयार झालेले आहे आता याला ब्रेडक्रम लावून घ्या… आणि कढईमध्ये किंवा पॅनमध्ये तेल गरम करा ….


तेल चांगले कडकडीत गरम झाल्यानंतर त्यामध्ये तीन ते चार कबाब किंवा पाच ते सहा कबाब घाला…

आणि कबाब एका साईडने गोल्डन ब्राऊन झाल्यानंतर कबाब पलटवून घ्या……

आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा गोल्डन ब्राऊन रंग होईपर्यंत तळून घ्या… आता आपले कबाब तयार झालेले आहेत हे कबाब तुम्ही सॉस सोबत खाऊ शकतात….

लहान मुलांना तर अशी चटपटीत कबाब खूप आवडतात…. हे कबाब तुम्ही काढून घ्या आणि लहान मुलांना टोमॅटो सॉस सोबत खायला द्या….

हे कबाब तुम्ही शेजवान चटणी सोबत सुद्धा खाऊ शकतात…. तुमचे कबाब तळताना तेलामध्ये विरघळत असतील तर तुम्ही त्यामध्ये थोडेसे ब्रेडक्रम्स मिक्स करू शकतात….

ज्यावेळेस आपण मिश्रणात तयार करतो त्यावेळेस तुम्ही ब्रेड क्रम त्यामध्ये मिक्स करा आणि मग त्याचे कबाब करून तळून घ्या….

टिप्स:::

कबाब करताना आपण गॅसवर वाटाण्याचा लगदा परतून घेतलेला आहे कारण वाटाण्यामध्ये एक वेगळाच कचवटपणा लागू नये यासाठी आपण ते मिश्रण परतवून घेतलेले आहे…. आपण जर डायरेक्ट मिश्रणाचे गोळे केले आणि कबाब केले तर यामध्ये वेगळाच कचवटपणा लागतो…. आणि कवबला एक उगीरपणा ची चव लागते….


वेळ व परिमाण::


तयारीची वेळ :१०मिनिटे
एकूण वेळ ::३०मिनिटे
परिमाण दोन :व्यक्तींसाठी

https://pin.it/rbXfN6EXB

You may also like

Leave a Comment

अन्न हे पूर्ण ब्रम्ह
सर्वाना नमस्कार
• अन्न हे केवळ पोटभरण्यासाठी नसून ते एक पवित्र आणि आवश्यक गोष्ट आहे, ज्यातून जीवन जगण्यासाठी ऊर्जा मिळते
• अन्न हे जीवन जगण्याचा आणि ऊर्जेचा मुख्य स्रोत आहे. ते शरीराचे पोषण करते आणि स्वस्थ आरोग्य सुधारण्यास मदत करते.
• अन्न ग्रहण करताना आपण अन्नचा आदर केला पाहिजे. हळू खाणे, त्याची चव घेणे आणि कृतज्ञता बाळगणे हे महत्त्वाचे आहे.
• ‘पूर्ण’ म्हणजे संपूर्ण आणि ‘ब्रह्म’ म्हणजे निर्मिती किंवा वाढ. या वाक्यातून अन्न हे केवळ पोट भरणारे नसून ते एक दैवी देणगी आहे.
• योग्य आणि पौष्टिक अन्न घेतल्याने शरीर निरोगी राहते. तसेच, अन्नाचा आदर केल्याने मानसिक शांतता मिळते.
आज विविध प्रसार माध्यमातून अनेक पुस्तके, youtube video, reals, कार्यक्रमाच्या मध्यमातून अनेक व्यंजनाच्या पाककृती आपणास बघायला मिळतात.
ह्या वेबसाइट च्या माध्यमातून महाराष्ट्रीयन खाद्य संस्कृती मधील व्यंजन बनविण्याची ते ही पारंपरिक पद्धतीने बनविण्याची कृती याद्वारे आपल्या पर्यन्त पोहचविण्याचा प्रयत्न करीत आहोत. याचा उपयोग निश्चितच पूर्ण ब्रह्माचा आस्वाद घेण्याऱ्या खव्वये, यांना होईल.

Visitor’s Counter

6489

© 2025 All Rights Reserved | Developed by Vaishali Ajay Chaudhari & Amol Gopal Zambare. || Maintenance by A2Z Web Solutions.