मशरूम फ्राय

by Vaishali Chaudhari
0 views

मशरूम फ्राय

प्रस्तावना:::

मशरूम मध्ये खूप विटामिन्स असतात त्यामुळे ते हाडे मजबूत होण्यासाठी उपयोगी असतात…

साहित्य::

पाच ते सहा मशरूम फोडणीसाठी तेल जिरे हळद तिखट मीठ कोथिंबीर चाट मसाला

कृती:::

सर्वप्रथम मशरूम दोन ते तीन पाण्यामधून स्वच्छ धुऊन घ्या… मशरूम निवडताना मशरूमचा खालील भाग एकदम पॅक हवा… मशरूम उघडलेले नको…. मशरूम करताना लंबी काम करा .. जेणेकरून मशरूम चा आकार आपल्याला फ्राय केल्यानंतरही दिसेल…. आता मशरूम दोन ते तीन पाण्यातनं स्वच्छ धुतल्यानंतर आपण कापून घेतले आहे…. कढईमध्ये थोडे तेल गरम करा…. तेल गरम केल्यानंतर त्यामध्ये जिरे घाला… जिरे तडतडल्यानंतर त्यामध्ये मशरूम घाला…. त्यावर पाव चमचा हळद अर्धा चमचा तिखट चवीप्रमाणे मीठ घाला…. आणि थोडासा पाण्याचा शिपका घालून… दोन ते तीन मिनिटे झाकण ठेवून चांगले शिजू द्या… मशरूम मधील पाणी सगळे निघून जाऊ द्या… मशरूम लगेचच शिजतात…. ते जास्त वेळ शिजवावे लागत नाही…. आणि आटल्यानंतर आपले मशरूम तयार झाले आहे…. आतापर्यंत त्यावर चिरलेली कोथिंबीर आणि चाट मसाला घाला… आणि आपली मशरूम खाण्यास तयार झाली आहे…..

टिप्स::: मशरूम जास्त वेळ शिजवू नका… ते लगेच शिकतात….

You may also like

Leave a Comment

अन्न हे पूर्ण ब्रम्ह
सर्वाना नमस्कार
• अन्न हे केवळ पोटभरण्यासाठी नसून ते एक पवित्र आणि आवश्यक गोष्ट आहे, ज्यातून जीवन जगण्यासाठी ऊर्जा मिळते
• अन्न हे जीवन जगण्याचा आणि ऊर्जेचा मुख्य स्रोत आहे. ते शरीराचे पोषण करते आणि स्वस्थ आरोग्य सुधारण्यास मदत करते.
• अन्न ग्रहण करताना आपण अन्नचा आदर केला पाहिजे. हळू खाणे, त्याची चव घेणे आणि कृतज्ञता बाळगणे हे महत्त्वाचे आहे.
• ‘पूर्ण’ म्हणजे संपूर्ण आणि ‘ब्रह्म’ म्हणजे निर्मिती किंवा वाढ. या वाक्यातून अन्न हे केवळ पोट भरणारे नसून ते एक दैवी देणगी आहे.
• योग्य आणि पौष्टिक अन्न घेतल्याने शरीर निरोगी राहते. तसेच, अन्नाचा आदर केल्याने मानसिक शांतता मिळते.
आज विविध प्रसार माध्यमातून अनेक पुस्तके, youtube video, reals, कार्यक्रमाच्या मध्यमातून अनेक व्यंजनाच्या पाककृती आपणास बघायला मिळतात.
ह्या वेबसाइट च्या माध्यमातून महाराष्ट्रीयन खाद्य संस्कृती मधील व्यंजन बनविण्याची ते ही पारंपरिक पद्धतीने बनविण्याची कृती याद्वारे आपल्या पर्यन्त पोहचविण्याचा प्रयत्न करीत आहोत. याचा उपयोग निश्चितच पूर्ण ब्रह्माचा आस्वाद घेण्याऱ्या खव्वये, यांना होईल.

Visitor’s Counter

7535

© 2025 All Rights Reserved | Developed by Vaishali Ajay Chaudhari & Amol Gopal Zambare. || Maintenance by A2Z Web Solutions.