मेथीची भाजी
प्रस्तावना :-
मेथीची भाजी अत्यंत पौष्टिक असून दाळ घालून केल्यास अत्यंत छान चवीला लागते.

साहित्य :-

- मेथिची एक जुडी
- आधी वाटि तुरीची दाळ
- ५ हिरवी मिर्ची बारीक़
- आधी लहान वाटि शेंगदाणे
- ६ लसून पाकळ्या
- एक छोटा अदरक टुकड़ा
- २ चिमुटभर हळद,
- फोडणीसाठी तेल
- जीरे मोहरी ,
- कोथिंबीर ,
- मीठ
कृती :-
प्रथम तुरीची दाळ धुवून घ्या.
कुकरमध्ये तुरीची दाळ ,कापलेली मेथीचि भाजी पाणी टाकून २ शिट्ट्या उकडून घ्या.
तव्यावर बारीक़ मिर्ची,शेंगदाने भाजून घ्या.
मिक्सर च्या भांड्यात हिरवी मिर्ची,शेंगदाने ,लसूण ,अदरक ,कोथिंबीर ,पाणी घालून चटनी वाटून घ्या.
एका कढाईत तेल घालून जीरे मोहरी फोडणी घाला.

नंतर त्यात चटनी, हळद घाला.
चटनी तेल सुटेपर्यत परतवा नंतर त्यात तुरीची दाळ मेथीचे मिश्रण चटनीत घाला.
गरजेप्रमाणे त्यात पाणी घाला त्यात चवीप्रमाणे मीठ घाला चार ते पांच उकळी भाजीला येऊ दया भाजीवर अर्धे झाकण ठेवा.

त्यामुळे भाजीला तेल सुटते.
मेथिची भाजी तयार आहे.

टिप्स :-
भाजिला तेल सुटण्यासाठी अर्धे झाकण ठेवावे, कारण पूर्ण भाजी झाकल्याने तेल उडून जाते.
वेळ व परिमाण:-
तयारीची वेळ :-१० मिनिटे
एकूण वेळ :-४० मिनिट
परिमाण :-५ जणांसाठी
