मुगाच्या डाळीच्या चिले(ऐळण्या )

by Vaishali Chaudhari

मुगाच्या डाळीच्या चिले(ऐळण्या )


प्रस्तावना::

मुगाच्या डाळीच्या चिले हा नाश्त्यासाठी हलकाफुलका पदार्थ असून पचण्यास एकदम सोपा जातो. आणि झटपट होणारा असा पदार्थ आहे. आपण त्यात सॅलड घालून त्याची पौष्टिकता अजून वाढवू शकतो.

साहित्य:


  • एक मोठी वाटी मुगाची डाळ
  • अर्धी वाटी हरभऱ्याची डाळ
  • एक काकडी
  • कोथिंबीर
  • सात ते आठ बारीक हिरव्या मिरच्या
  • 15 ते 20लसणाच्या पाकळ्या
  • एक कांदा
  • एक टोमॅटो
  • काकडी
  • एक चीज क्यूब
  • अर्धा इंच अद्रकाचा तुकडा
  • अर्धा चमचा धने जिरेपूड
  • पाव चमचा हळद
  • चवीप्रमाणे मीठ
  • पाणी
  • तेल

कृती::
चिले प्रकार १::


सर्वप्रथम मुगाची डाळ आणि हरभऱ्याची डाळ स्वच्छ धुऊन घ्या. रात्री मुगाची डाळ आणि हरभऱ्याची डाळ सात ते आठ तास भिजण्यास ठेवा.

सकाळी ही डाळ पुन्हा पाण्याने धुऊन घ्या आणि मिक्सर भांड्यामध्ये पाणी घालून त्याचे बारीक असे वाटण करून घ्या.

त्यानंतर काकडीत धुवून व्यवस्थित किसून घ्या. कोथिंबीर बारीक चिरून घ्या. पंधरा ते वीस लसूण पाकळ्या तसेच अर्धा इंच अद्रकाचा तुकडा आणि हिरव्या बारीक मिरच्या या सर्वांची मिक्सरच्या भांड्यात पेस्ट करून घ्या.

मिक्स करताना तुम्ही थोडे पाणी घालू शकतात अथवा डायरेक्टही पेस्ट करू शकतात.

आता हे मुगाच्या डाळीचे मिश्रण एका पातेल्यामध्ये घाला त्यामध्ये अद्रक लसूण मिरचीची पेस्ट घाला. पाव चमचा हळद घाला अर्धा चमचा धने जिरे पूड घाला.

त्यानंतर त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घाला. आणि मिश्रण पातळ करण्यासाठी पाणी घाला. ज्याप्रमाणे डोस्याचे रवण असते त्याप्रमाणेच आपण चिल्याचे रवण तयार करणार आहे.

या रावणामध्ये आता चिरलेली कोथिंबीर घाला. चिलाचे रवण चांगले फेटून घ्या. डोसा करायच्या पॅनवर आपण हे चिले काढू शकतो किंवा पूर्वी वापरली जाणारी कहाली कोणाकडे असेल त्यावरही चिले केले तरी चालतील.

येथे मी कहाली वापरलेली आहे. कहाली ला गरम करून घ्या. कहानी वर सर्व बाजूला व्यवस्थित तेल पसरवून घ्या.

तेल पसरल्यानंतर चमच्याच्या साह्याने एक चमचा मुगाच्या डाळीची चिलाची रवण घाला आणि त्याचा डोसा प्रमाणे करून घ्या.

आता ही चिल्यावर झाकण ठेवा पाच सेकंद झाल्यानंतर झाकण उघडून चिले पलटून घ्या त्यावर सराट्याच्या साह्याने तेल घाला.

दोघ बाजूने चिले खरपूस भाजून घ्या. आता आपले मुगाच्या डाळीची चिले तयार झालेले आहे ते आपण दही किंवा शेंगदाण्याची चटणी तसेच चिंचेची चटणी यासोबत खाऊ शकतो….. चला तर मग आपले चिले तयार आहे….

चीज चिले प्रकार २::


वरील प्रमाणेच मुगाच्या डाळीचे रवण तयार करून घ्यावे. ज्याप्रमाणे वरती अद्रक लसूण मिरची आणि कोथिंबीर हे सर्व साहित्य त्या रावणामध्ये मिक्स करावे.

रवण तयार झाल्यानंतर ज्याप्रमाणे आपण नॉनस्टिक वर डोसा काढतो त्याप्रमाणे मुगाचे चिले घालावे. दोघं साईडने ते खरपूस परतून घ्यावे.

चिले परतल्यानंतर त्यावर चिरलेला कांदा चिरलेला टोमॅटो चिरलेली कोथिंबीर पसरवावी. त्यावर किसलेला चीज घालावा वरून थोडी कोथिंबीर घालावी.

त्यावर झाकण ठेवून दहा सेकंद वाफ येऊ द्यावी. आपलं चीज येथे मेल्ट झालेले आहे. त्यावर चाट मसाला आपल्या आवडीप्रमाणे घालावा.

आता आपले मुगाचे चीज चिले तयार झालेले आहे…. हे मुगाची चीज चिले लहान मुलांना खूप आवडतात….

त्यावर चीज आपल्या आवडीप्रमाणे घालावे…. चला तर मग आपले तयार आहे मुगाचे चीज चीले……

टिप्स::

डाळ साधारण सात ते आठ तासात भिजते. यामध्ये आपण थोडा हरभऱ्याच्या डाळीचा उपयोग केलेला आहे कारण हरभऱ्याच्या डाळीला चिकटपणा असतो आणि चिल्यामध्ये खरपूसपणा निर्माण होतो. डाळ वाटताना बारीकच वाटावी.

वेळ व परिमाण::

तयारीची वेळ :२०मिनिटे
एकूण वेळ :३०मिनिटे
परिमाण:३ व्यक्तींसाठी

You may also like

Leave a Comment

अन्न हे पूर्ण ब्रम्ह
सर्वाना नमस्कार
• अन्न हे केवळ पोटभरण्यासाठी नसून ते एक पवित्र आणि आवश्यक गोष्ट आहे, ज्यातून जीवन जगण्यासाठी ऊर्जा मिळते
• अन्न हे जीवन जगण्याचा आणि ऊर्जेचा मुख्य स्रोत आहे. ते शरीराचे पोषण करते आणि स्वस्थ आरोग्य सुधारण्यास मदत करते.
• अन्न ग्रहण करताना आपण अन्नचा आदर केला पाहिजे. हळू खाणे, त्याची चव घेणे आणि कृतज्ञता बाळगणे हे महत्त्वाचे आहे.
• ‘पूर्ण’ म्हणजे संपूर्ण आणि ‘ब्रह्म’ म्हणजे निर्मिती किंवा वाढ. या वाक्यातून अन्न हे केवळ पोट भरणारे नसून ते एक दैवी देणगी आहे.
• योग्य आणि पौष्टिक अन्न घेतल्याने शरीर निरोगी राहते. तसेच, अन्नाचा आदर केल्याने मानसिक शांतता मिळते.
आज विविध प्रसार माध्यमातून अनेक पुस्तके, youtube video, reals, कार्यक्रमाच्या मध्यमातून अनेक व्यंजनाच्या पाककृती आपणास बघायला मिळतात.
ह्या वेबसाइट च्या माध्यमातून महाराष्ट्रीयन खाद्य संस्कृती मधील व्यंजन बनविण्याची ते ही पारंपरिक पद्धतीने बनविण्याची कृती याद्वारे आपल्या पर्यन्त पोहचविण्याचा प्रयत्न करीत आहोत. याचा उपयोग निश्चितच पूर्ण ब्रह्माचा आस्वाद घेण्याऱ्या खव्वये, यांना होईल.

Visitor’s Counter

4319

© 2025 All Rights Reserved | Developed by Vaishali Ajay Chaudhari & Amol Gopal Zambare. || Maintenance by A2Z Web Solutions.