पालक वरण आणि भात

by Vaishali Chaudhari

पालक वरण आणि भात


प्रस्तावना:


पालक वरण हे अत्यंत पौष्टिक असे वरण आहे. लहान मुले बऱ्याच डाळी खात नाहीत . हे वरण सर्व डाळी मिश्रित असल्यामुळे त्याची चव अधिकच वाढते.


साहित्य:

  • १ पालकाची जोडी,
  • १ छोटी वाटी मुगाची डाळ,
  • १ छोटी वाटी हरभऱ्याची डाळ,
  • १ छोटी वाटी तुरीची डाळ,
  • १ कांदा,
  • १ टमाटर,
  • ४ हिरवी मिरची,
  • १ लसूण कांदा,
  • अर्धा इंच अद्रक तुकडा,
  • कढीपत्ता,
  • १० शेंगदाणे,
  • अर्धा छोटा चमचा हळद,
  • अर्धा चमचा तिखट,
  • अर्धा चमचा गरम मसाला,
  • २ सुकलेल्या कैरीचे काप नसल्या चिंच,
  • १ चिमूटभर हिंग,
  • मीठ ,
  • फोडणीसाठी तेल,
  • पाणी
  • कोथिंबीर
  • एक वाटी तांदूळ

ती:


प्रथम मुगाची डाळ, हरभऱ्याची डाळ ,तुरीची डाळ,तिघं डाळी एकत्र करून घ्या.

सर्व डाळी स्वच्छ धुऊन घ्या . तुरीच्या वरणाप्रमाणे कुकरमध्ये वरण शिजवून घ्या.

पालक बारीक चिरून घ्या. टमाटर आणि कांदाही बारीक चिरून घ्या.

अद्रक, हिरवी मिरची,लसणाची पेस्ट करून घ्या. कढईमध्ये तेल गरम करा त्यात जिरं मोहरीची फोडणी घाला.

तेलात शेंगदाणे टाका कढीपत्ता टाका. परतून घ्या. चिरलेला कांदा टमाटर परतून घ्या.

चिरलेला पालक परतून घ्या. अद्रक, मिरची,लसणाची पेस्ट घाला. कैरीचे काप घाला.

हळद ,तिखट, गरम मसाला सर्व घालून तेल सुटेपर्यंत परतवा.

डाळींचे वरण चांगले घोटून घ्या. हे डाळींचे वरण पालकाच्या मिश्रणामध्ये घाला.

व्यवस्थित हलवून घ्या. त्यात थोडे गरम पाणी घाला. चवीप्रमाणे मीठ घाला.

वरून चिरलेली कोथिंबीर घाला. वरणावर झाकण ठेवून पाच ते सहा उकड्या येऊ द्या.

गॅस बंद करा. पालकाचे वरण तयार आहे.


भाताची कृती:


तांदूळ धुऊन घ्या. कुकरमध्ये तांदूळ घालून त्यात दीड ग्लास पाणी घालून चवीप्रमाणे मीठ घाला.

दोन शिट्या होऊ द्या भात तयार होईल. भाताबरोबर अत्यंत चवीला छान लागते.

टिप्स:

पालकाच्या वळणाच्या फोडणीमध्ये कांदा टोमॅटो पालक परतल्यानंतरच आलं लसूण मिरचीची पेस्ट घालावी. त्यामुळे मिश्रण जळत नाही.

वेळ व परिमाण:


तयारीची वेळ:१५ मिनिटे
एकूण वेळ: ६० मिनिटे
परिमाण: ४ जणांसाठी

You may also like

Leave a Comment

अन्न हे पूर्ण ब्रम्ह
सर्वाना नमस्कार
• अन्न हे केवळ पोटभरण्यासाठी नसून ते एक पवित्र आणि आवश्यक गोष्ट आहे, ज्यातून जीवन जगण्यासाठी ऊर्जा मिळते
• अन्न हे जीवन जगण्याचा आणि ऊर्जेचा मुख्य स्रोत आहे. ते शरीराचे पोषण करते आणि स्वस्थ आरोग्य सुधारण्यास मदत करते.
• अन्न ग्रहण करताना आपण अन्नचा आदर केला पाहिजे. हळू खाणे, त्याची चव घेणे आणि कृतज्ञता बाळगणे हे महत्त्वाचे आहे.
• ‘पूर्ण’ म्हणजे संपूर्ण आणि ‘ब्रह्म’ म्हणजे निर्मिती किंवा वाढ. या वाक्यातून अन्न हे केवळ पोट भरणारे नसून ते एक दैवी देणगी आहे.
• योग्य आणि पौष्टिक अन्न घेतल्याने शरीर निरोगी राहते. तसेच, अन्नाचा आदर केल्याने मानसिक शांतता मिळते.
आज विविध प्रसार माध्यमातून अनेक पुस्तके, youtube video, reals, कार्यक्रमाच्या मध्यमातून अनेक व्यंजनाच्या पाककृती आपणास बघायला मिळतात.
ह्या वेबसाइट च्या माध्यमातून महाराष्ट्रीयन खाद्य संस्कृती मधील व्यंजन बनविण्याची ते ही पारंपरिक पद्धतीने बनविण्याची कृती याद्वारे आपल्या पर्यन्त पोहचविण्याचा प्रयत्न करीत आहोत. याचा उपयोग निश्चितच पूर्ण ब्रह्माचा आस्वाद घेण्याऱ्या खव्वये, यांना होईल.

Visitor’s Counter

4333

© 2025 All Rights Reserved | Developed by Vaishali Ajay Chaudhari & Amol Gopal Zambare. || Maintenance by A2Z Web Solutions.