पनीर मटर मसाला
प्रस्तावना::

हॉटेल पनीर मटर मसाला सगळ्यांनाच आवडतात… बाहेर जाण्याऐवजी त्या जर घरी केला तर किती छान.….. मुल अगदी आवडीनेच खाऊ शकतील……
साहित्य::

- एक मोठी वाटी मटर
- पाव किलो पनीर
- सहा कांदे
- दोन मोठे टमाटे
- कोथिंबीर
- पंधरा ते वीस लसूण पाकळ्या
- अर्धा इंच अद्रकाचा तुकडा
- अर्धी वाटी फ्रेश साई सकट दही
- पाच लवंग
- पाच मिरे
- एक दालचिनीचा तुकडा
- एक तेजपान
- फोडणीसाठी तेल
- पाव चमचा हळद
- अर्धा चमचा धनापुड
- दोन चमचे लाल
- तिखट
- मीठ
- पाणी
कृती:::
सर्वप्रथम कांदे कापून घ्या टोमॅटो सुद्धा कापून घ्या… आता आपण चिरलेला कांदा चिरलेला टोमॅटो एका पातेल्यामध्ये घालून त्यामध्ये लसूण पाकळ्या अद्रकाचा तुकडा पाणी घालून पाच मिनिटे चांगले वाफवून घ्या….
हे सर्व मिश्रण वापरल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये लवंग मिरे, दालचिनीचा तुकडा घालून त्यामध्ये कांदा टोमॅटो घालून भाजी कशी चटणी किंवा पेस्ट करून घ्या…

सुरुवातीला मसाले फिरवून घ्यावे त्यानंतर कांदा टोमॅटो त्यामध्ये बारीक करावे म्हणजे मिश्रण एकदम व्यवस्थित बारीक होईल….
कढईमध्ये तेल घालून मटर तळून घ्या.. मटर अगदी छान असे फ्राय करून घ्यायचे आहे आपल्याला दोन ते तीन मिनिटे आणि मग ते एका डिशमध्ये काढून घ्या…..

आता कढई मधील गरम तेलाचा वापर करून घ्या… तेल जर कमी वाटत असल्यास थोडे तुम्ही अजून घाला..
तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये एक तेज पान घाला परतल्यानंतर त्यामध्ये केलेली चटणी घाला.. आणि मिश्रण व्यवस्थित एकत्र करून घ्या……
त्यानंतर त्यामध्ये पाव चमचा हळद दोन चमचे तिखट अर्धा चमचा धना पूड घालून व्यवस्थित परतून घ्या….
चटणी अगदी तेल सुटेपर्यंत परतवून घ्या.. चटणी परतण्यासाठी साधारण 10 मिनिटे लागू शकतात….. चटणीला आपल्या चांगले तेल सुटल्यानंतर त्यामध्ये मटर घालून घ्या..

आता आपल्याला पनीरचे स्लाईस करून घ्यायचे आहेत… पनीरचे स्लाईस आपल्याला मटर आणि चटणीच्या मिश्रणामध्ये घाला…

यामध्ये तुम्हाला ज्याप्रमाणे कन्सिस्टन्सी हवी त्याप्रमाणे तुम्ही पाण्याचा वापर करू शकतात… तुमचे जे कांदा टोमॅटो शिजवताना पाणी शिल्लक असले ते पाणी तुम्ही वापरून घेऊ शकतात….
किंवा गरज असल्यास अर्धा कप पाणी घाला… आणि या मिश्रणाला चांगल्या दोन ते तीन उकळ्या येऊ द्या…
मिश्रणाला उकळी आल्यानंतर त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घाला…. त्यानंतर सर्वात शेवटी त्यामध्ये 1/2 वाटी दही घाला….
तुम्हाला दहीचा वापर करायचा नसल्यास सायसकट दुधाचा वापर तुम्ही करू शकतात…. हे मिश्रण हळूहळू व्यवस्थित मिक्स करून घ्या…..

आपण दही सर्वात शेवटी घातले आहे जेणेकरून दही फाटणार नाही….
आता यामध्ये चिरलेली कोथिंबीर घाला.. यामध्ये एक तुकडा बटरचा झाला…. बटर हे ऑप्शनल आहे….
त्यामुळे मी तुम्हाला साहित्यामध्ये सांगितलेले नाही तुमच्याजवळ असेल तर घाला नाही घातले तरी चालेल….
मिश्रणाला दोन ते तीन उकळ्या आल्यानंतर गॅस बंद करा…. आपली मटर पनीरची रेसिपी तयार…..
मटर पनीर हे तुम्ही फुलक्या सोबत चपाती सोबत पराठ्यासोबत नान रोटी तंदुरी रोटी जीरा राईस सोबत खाऊ शकतात….

चला तर मग एन्जॉय करूया मटर पनीर मसाला…..
टिप्स:::
इथे मी तेलाचा वापर केलेला आहे तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही बटरचा सुद्धा वापर करू शकतात फोडणी देताना तेल न घालता अर्धी वाटी इतके बटर घालावे आणि त्यामध्येच भाजीला फोडणी द्यावी….. तसेच दही किंवा दूध घालताना सर्वात शेवटी घाला म्हणजे दूध किंवा दही फाटणार नाही. ..
वेळ व परिमाण:::
तयारीची वेळ ::१०मिनिटे
एकूण वेळ::३० मिनिटे
परिमाण ::पाच व्यक्तींसाठी
