बटाटा हिरवी भाजी (येड़ा घेंगा)
प्रस्तावना :-
बटाटा हिरवी भाजी ही भाजीला पर्याय म्हणून परन्तु चवीला अत्यंत छान लागते. ह्या भाजीला येड़ा घेंगा यासाठी म्हणतात भाजीला पर्याय म्हणून केली जाणारी अशी ही भाजी साधी आहे.
साहित्य :-

- २ बटाटे
- १ कांदा
- १५-२० खोब्रा काप
- ७ हिरवी मिर्ची बारीक़
- १ चमचा शेंगदाणे
- ८ लसून पाकळ्या
- एक छोटा अदरक टुकड़ा
- २ चिमुटभर हळद
- फोडणीसाठी तेल
- १ चिमटी गरम मसाला
- जीरे मोहरी
- कोथिंबीर
- मीठ
कृती :-
बटाटा सोलून बटाट्याचे काप करून घ्या. कांदा सोलून तो चिरून घ्या खोबऱ्याचे काप करून घ्या. तवा गरम करून तव्यावर हिरव्या मिरच्या खरपूस भाजून घ्या.
एक चमचा शेंगदाणे भाजून घ्या. खोबरं चांगले लाल तांबूस रंगापर्यंत भाजून घ्या. कांदाही तांबूस काळपट होईपर्यंत भाजून घ्या.
मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरच्या भाजलेला कांदा भाजलेले खोबरे लसूण पाकळ्या अद्रकाचा तुकडा आणि कोथिंबीर घालून थोडे पाणी घालून बारीक चटणी वाटून घ्या.
एका पॅनमध्ये थोडे तेल घालून त्यामध्ये जिरे घाला त्यामध्ये कापलेले बटाट्याचे काप परतून घ्या. साधारण पाच ते सहा मिनिटे बटाटा परतवायला लागेल.
बटाटा चांगला परतवला गेला की मग तो डिशमध्ये काढून घ्या. एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवा. तेल कडकडीत गरम झाले की त्यावर जिरे मोहरीची फोडणी घाला.
जिरे मोहरीची फोडणी घातल्यानंतर त्यामध्ये आपण केलेली चटणी घाला. चटणी सतत परतवत राहा. चटणी तेल सुटेपर्यंत परतवा.
पाच मिनिटांनी चटणीला तेल सुटलेले असेल त्यामध्ये तेलात परतवलेला बटाटा चे काप घाला. पतीला मध्ये पाणी गरम करून घ्या .
आणि हे पाणी परतवलेल्या चटणी आणि बटाट्याच्या मिश्रणामध्ये घाला. पाणी आपल्या गरजेप्रमाणे घालावे भाजी आपल्याला कितपत पातळ हवी याप्रमाणे ते घालावे.
आता भाजीमध्ये चवीप्रमाणे मीठ घाला. भाजीवर अर्धे झाकण ठेवा.भाजीला चांगल्या पाच ते सहा उकड्या येऊ द्या.
ही बटाट्याची भाजी ज्यावेळेस आपल्याकडे काही पर्याय नाही त्यावेळेस झटपट बनणारी आणि झणझणीत अशी भाजी आहे.
आता आपली हिरव्या बटाट्याची भाजी तयार झालेली आहे ही भाजी तुम्ही पोळी चपाती भाकरी बाजरीची भाकरी यासोबत खाऊ शकतात झणझणीत अशी बटाट्याची रस्सा भाजी तयार झाली आहे….
येड़ा गेंगा भाजी तयार आहे.
टिप्स :-

भाजिला तेल सुटण्यासाठी अर्धे झाकन ठेवावे कारण पूर्ण भाजी झाकल्याने तेल उडून जाते.
वेळ व परिमाण:-
तयारीची वेळ :-१० मिनिटे
एकूण वेळ :-४० मिनिट
परिमाण :-५ जणांसाठी
