चटपटीत रगडा पॅटीस
प्रस्तावना::
चटपटीत पदार्थ तर सगळ्यांनाच आवडतात त्यातल्या त्यात रगडा पॅटीस बटाट्यापासून बनवलेला पदार्थ हा अत्यंत चवदार असतो..
साहित्य::
सात ते आठ बटाटे अर्धा किलो हिरवेगार सोललेले वाटाणे आठ ते दहा बारीक हिरव्या मिरच्या दहा ते बारा कढीपत्त्याचे पाने दहा ते बारा लसूण पाकळ्या अर्धा इंच अद्रकाचा तुकडा तीन कांदे कोथिंबीर एक चमचा हळद एक चमचा तिखट एक चमचा धनापूर अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा धनापूर फोडणीसाठी तेल चवीप्रमाणे मीठ आणि चिंचेची चटणी
कृती::
प्रथम बटाटे आणि वाटाणे चार ते पाच शिट्या घेऊन चांगले कुकरमध्ये वाफवून घ्या.. इथे हिरवा वाटाण्याच्या शेंगांची वाटाणे आपण काढून घेतलेले आहे या ऐवजी तुम्ही सकाळी दोन वाटी कोरडे वाटाणे भिजत घालून संध्याकाळी रगडा करू शकतात….
रगडा बनवण्याची कृती:: आपले वाटाणे वाफवून झालेले आहे..दोन कांदे सोलून कापून घ्या.. अद्रक लसूण आणि मिरचीची पेस्ट करून घ्या… कोथिंबीर बारीक चिरून घ्या… आता आपले वाटाणे वाफलेले आहेत कुकरची शिट्टी काढून त्याचे वाफ निघाल्यानंतर वाटाणे स्मॅशरच्या साह्याने चांगले बारीक करून घ्या त्याची बारीक असा रगडा करा… आता एका कढईमध्ये कडकडीत तेल गरम करा त्यामध्ये जी एक चमचा जिरे, एक चमचा मोहरी घालून तडतडवून घ्या त्यामध्ये चिरलेला कांदा घाला त्यानंतर अद्रक लसूण मिरचीची पेस्ट घाला आणि तांबूस रंगावर परतवून घ्या.. त्यामध्ये एक चमचा हळद एक चमचा तिखट अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा धनापूर एक चमचा तिखट घालून व्यवस्थित मिश्रण परतवून घ्या.. आता आपल्या मिश्रणाला चांगले तेल सुटले आहे यामध्ये आपण जो वाटाण्याचा रगडा केलेला आहे तो घाला.. यामध्ये गरम पाणी घाला…( एका पातेल्यामध्ये कडकडीत गरम पाणी करा.). आणि मिश्रणाला साधारण दोन ते तीन उकड्या येऊ द्या उकळ्या आल्यानंतर आपण चवीप्रमाणे मीठ घाला त्यानंतर त्यामध्ये चिरलेली कोथिंबीर घाला आणि पुन्हा दोन ते तीन उकळ्या येऊ द्या आपल्या रगडा आता तयार झालेला आहे गॅस बंद करा…
पॅटीस बनवण्याची कृती:
:उकडलेले बटाटे सोलून स्मॅशरच्या साह्याने लगदा करून घ्या… उकडलेल्या बटाट्यांमध्ये पाव चमचा हळद पाव चमचा तिखट चवीप्रमाणे मीठ आणि चिरलेली कोथिंबीर घाला ..आणि हे मिश्रण हाताने व्यवस्थित गोळा करून घ्या… मिश्रणामध्ये आपल्या चवीप्रमाणे तुम्ही तिखट वापरू शकतात… आता यामध्ये साधारण अर्धी वाटी ब्रेडक्रम्स घाला. आणि मिश्रण पुन्हा एकदा व्यवस्थित एकत्र करून घ्या. त्याचे छान छोटे छोटे गोळे करून त्याला थोडे चपटे आकार द्या.. याप्रमाणे सर्व मिश्रणाचे पॅटीस बनवून घ्या.. सर्व मिश्रणाचे पॅटीस झाल्यानंतर एका पॅनमध्ये तेल गरम करा.. आता पॅटीस ब्रेड स्क्रब मध्ये दोघं साईडला लावून पॅनमध्ये फ्राय करण्यासाठी ठेवा.त्यामध्ये साधारण चार ते पाच पॅटीस घाला.. एका बाजूने पॅटिस चांगले फ्राय झाल्यानंतर त्यात पलटी करा आणि दुसऱ्या बाजूनेही व्यवस्थित फ्राय करून घ्या.. आता आपले पॅटीस दोन्ही बाजूंनी चांगले फ्राय झालेले आहेत आता आपले पॅटीस तयार आहेत… एका डिशमध्ये दोन पॅटीस घालून त्यावर दोन ते तीन चमचे रगडा घाला आणि त्यावर चिंचेची एक चमचा चटणी घाला.. त्यावर चिरलेला कांदा घाला आणि चिरलेली कोथिंबीर घाला.. वरून थोडे बारीक शेव घाला… आता आपले चटपटीत रगडा पॅटीस तयार झालेले आहे…. यावर तुम्ही दही सुद्धा घालू शकतात… आपल्या आवडीप्रमाणे तुम्ही यावर पुदिन्याची चटणी सुद्धा वापरू शकतात…. चला तर मग एन्जॉय करूया गरमागरम रगडा पॅटीस……
टिप्स::
रगडा पॅटीस करताना वाटाणे चांगले भिजलेले हवे म्हणजे आपला वाटाण्याचा रगडा पेस्ट एकदम बारीक अशी होईल… आणि आपण कोरड्या वाटाण्याचा वापर करत असल्यास वाटाणे हे रात्रीच भिजत घालावे म्हणजे ते सकाळी चांगले फुगून येतील…
वेळ व परिमाण::
तयारीची वेळ ::२०मिनिटे
एकूण वेळ ::४० मिनिटे
परिमाण::चार व्यक्तींसाठी
ब्रेड स्क्रम बनवण्यासाठी आपल्याला ब्रेड साधारण दोन ते तीन दिवस कोरडे करावे. किंवा आपले उरलेले ब्रेड तव्यावर दोन्ही बाजूला मंद आचेवर खरपूस भाजून घ्यावे त्यानंतर ब्रेड कडक होतील हेच ब्रेड मिक्सरमध्ये बारीक करून घ्यावे..ब्रेड कोरडे झाल्यानंतर त्याची मिक्सरमध्ये भरड करावी..
