रसई{कटाची आमटी}

by Vaishali Chaudhari
189 views

रसई


प्रस्तावना:

रसई हा मसाले भाजीचा प्रकार असून तो गोड पदार्थ सोबत खाल्ला जातो. पुरणपोळी करताना आवर्जून रसई केली जाते.रसई या भाजीला कटाची आमटी सुद्धा म्हणतात.
ही कटाची आमटी डिशमध्ये घेऊन प्यायला अत्यंत चवदार लागते. थंडीमध्ये ही पाण्याची तर वेगळीच मजा असते. झणझणीत अशी रेसिपी आहे.
रसई


साहित्य ::

  • अर्धी वाटी हरभऱ्याची शिजवलेली डाळ,
  • दोन कांदे
  • 10 खोबऱ्याचे काप,
  • दहा लसूण पाकळ्या,
  • अर्धा इंच अद्रक चा तुकडा,
  • एक चमचा लाल तिखट
  • पाव चमचा खडा मसाला पावडर,
  • पाव चमचा हळद,
  • अर्धा चमचा धने पावडर,
  • कोथिंबीर
  • मीठ
  • फोडणीसाठी तेल,
  • पाणी


कृती::


कांदा चिरून घ्या. खोबऱ्याचे काप करून घ्या.
सर्वप्रथम गरम तव्यावर कांदा गुलाबी रंगावर भाजून घ्या.

आता गरम तव्यावर खोबरे ही भाजून घ्या.

मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजलेला कांदा भाजलेले खोबरे, लसणाच्या पाकळ्या अद्रकाचा तुकडा तसेच एक चमचा लाल तिखट, पाव चमचा धने पूड ,पाव चमचा हळद ,पाव चमचा खडा मसाला पावडर हे सर्व साहित्य घाला.

मिक्सरमध्ये हा मसाला फिरवा. त्या मसाल्यामध्ये पाणी घाला. त्या मसाल्याची बारीक चटणी वाटून घ्या.

आता एका कढईमध्ये फोडणीसाठी तेल घाला. फोडणी मध्ये जिरे घाला त्यामध्ये मसाला परतवायला टाका.

तेलामध्ये मसाला चांगला परतून घ्या. मसाल्याला चांगले तेल सुटले की मग मसाला झाले असे समजावे.

वाफवलेली हरभऱ्याची डाळ चे मिश्रण चांगले रवीने घोटून घ्या. त्यामध्ये थोडे गरम करून पाणी घाला मिश्रण पातळसर करा.

ही हरभऱ्याच्या डाळीचे मिश्रण परतवलेल्या मसाल्यामध्ये घाला. वरून थोडे आपल्याला जशी पातळ रसई हवी त्याप्रमाणे थोडे गरम पाणी घाला.

त्यामध्ये आपल्या चवीप्रमाणे मीठ घाला.भाजी ला चांगल्या मंद आचेवर पाच ते सहा उकळ्या येऊ द्या.

भाजी चांगली मंद आचेवर पाच ते सहा उकळे आल्यानंतर त्यामध्ये कोथिंबीर घाला.

भाजीला चांगल्या उकड्या आल्यानंतर भाजीचा गॅस बंद करा. आता आपली पुरणपोळी सोबत खाण्याची रसई तयार झालेली आहे.


टिप्स::

ही रसायची भाजी पुरणपोळ्यांसोबत खाल्ली जाते. तसेच त्यासोबत आपण साधी चपाती सुद्धा खाऊ शकतो. येथे आपण हरभऱ्याच्या डाळीचा वापर केलेला आहे.


वेळ व परिमाण::


तयारीची वेळ: २० मिनिटे
एकूण वेळ: ३० मिनिटे
परिमाण: २ जणांसाठी

You may also like

Leave a Comment

अन्न हे पूर्ण ब्रम्ह
सर्वाना नमस्कार
• अन्न हे केवळ पोटभरण्यासाठी नसून ते एक पवित्र आणि आवश्यक गोष्ट आहे, ज्यातून जीवन जगण्यासाठी ऊर्जा मिळते
• अन्न हे जीवन जगण्याचा आणि ऊर्जेचा मुख्य स्रोत आहे. ते शरीराचे पोषण करते आणि स्वस्थ आरोग्य सुधारण्यास मदत करते.
• अन्न ग्रहण करताना आपण अन्नचा आदर केला पाहिजे. हळू खाणे, त्याची चव घेणे आणि कृतज्ञता बाळगणे हे महत्त्वाचे आहे.
• ‘पूर्ण’ म्हणजे संपूर्ण आणि ‘ब्रह्म’ म्हणजे निर्मिती किंवा वाढ. या वाक्यातून अन्न हे केवळ पोट भरणारे नसून ते एक दैवी देणगी आहे.
• योग्य आणि पौष्टिक अन्न घेतल्याने शरीर निरोगी राहते. तसेच, अन्नाचा आदर केल्याने मानसिक शांतता मिळते.
आज विविध प्रसार माध्यमातून अनेक पुस्तके, youtube video, reals, कार्यक्रमाच्या मध्यमातून अनेक व्यंजनाच्या पाककृती आपणास बघायला मिळतात.
ह्या वेबसाइट च्या माध्यमातून महाराष्ट्रीयन खाद्य संस्कृती मधील व्यंजन बनविण्याची ते ही पारंपरिक पद्धतीने बनविण्याची कृती याद्वारे आपल्या पर्यन्त पोहचविण्याचा प्रयत्न करीत आहोत. याचा उपयोग निश्चितच पूर्ण ब्रह्माचा आस्वाद घेण्याऱ्या खव्वये, यांना होईल.

Visitor’s Counter

7507

© 2025 All Rights Reserved | Developed by Vaishali Ajay Chaudhari & Amol Gopal Zambare. || Maintenance by A2Z Web Solutions.