मसालेदार शेव भाजी
प्रस्तावना:::
खानदेशी शेव भाजी म्हटली म्हणजे सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटते… शेव भाजीचे बरेचसे प्रकार आहे आपण ही आज खानदेश स्पेशल शेव भाजी बघणार आहे…
साहित्य::
- एक वाटी शेव
- दोन मोठे कांदे
- एक टोमॅटो
- पाच ते दहा लाल मिरच्या
- आठ ते दहा लसूण पाकळ्या
- 15 ते 20 खोबऱ्याचे काप
- कोथिंबीर
- एक चमचा तिखट
- पाव चमचा हळद
- अर्धा चमचा धनापूड
- अर्धा चमचा गरम मसाला
- चवीप्रमाणे मीठ
- फोडणीसाठी तेल, जिरे ,मोहरी



कृती:::
दोन कांदे कापून घ्या.. गरम तव्यावर कांदा चांगला खरपूस भाजून घ्या कांदा तंबूस रंगावर झाला की गॅस बंद करा..
खोबऱ्याचे काप सुद्धा तांबूस रंग येईपर्यंत भाजून घ्या… लाल मिरच्या सुद्धा खरपूस अशा भाजून घ्या…
आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण कांदा खोबरं लाल मिरच्या, लसूण पाकळ्या तसेच अद्रकाचा तुकडा पाच मिरे पाच लवंग घालून बारीक असे वाटण करून घ्या त्यामध्ये थोडे पाणी घाला म्हणजे बारीक अशी चटणी तयार होईल…
आता आपली लाल चटणी तयार झालेली आहे… टोमॅटो बारीक चिरून घ्या…
एका कढईमध्ये तेल घाला.. तेल कडकडीत गरम झाले की मग त्यामध्ये जिरे मोहरी घाला… तेजपांनाचे तुकडे करून घाला..चिरलेला टोमॅटो घाला आणि परतून घ्या…
त्यानंतर त्यामध्ये केलेली चटणी घाला आणि चटणी व्यवस्थित चांगली परतवून घ्या..
आता चटणी मध्ये पाव चमचा हळद एक चमचा तिखट पाव चमचा गरम मसाला अर्धा चमचा धनापूर घालून व्यवस्थित परतून घ्या.. आणि चटणीला चांगले तेल सुटू द्या… चटणीला छानसे तेल सुटल्यानंतर त्यामध्ये दोन ग्लास गरम उकळते पाणी घाला…
भाजीमध्ये पाणी व्यवस्थित मिक्स करून घ्या. त्यानंतर भाजीला उकड्या येऊ द्या…. चवीप्रमाणे मीठ घाला…
कोथिंबीर चिरून घाला… भाजीला चांगला पाच ते सहा उकड्या येऊ द्या…
त्यानंतर त्यामध्ये एक वाटी शेव(इथे पिवळसर गाठी शेवचा वापर मी केलेला आहे.. ही शेव अत्यंत फिकी असते तुम्ही तिखट शेवचा सुद्धा वापर करू शकतात.
भाजीची चव फक्त अजून झणझणीत होईल… तुमच्याकडे जी शेव उपलब्ध आहे त्या शेवचा तुम्ही वापर करू शकता फक्त जाड शेवचा वापर करा…)
घाला आणि पुन्हा एक उकळी येऊन गॅस बंद करा…
आपण ही शेवभाजी पोळी सोबत बाजरीच्या भाकरी सोबत खाऊ शकतो. आपली गरमागरम शेव भाजी तयार झालेली आहे….
चला तर मग खानदेश स्पेशल मसालेदार शेव भाजी झणझणीत अशी…..
टिप्स::: मसाले भाजी करताना चटणी चांगली बारीक करून घ्या… म्हणजे ग्रेव्ही व्यवस्थित तयार होईल… चटणी तयार करण्यासाठी इथे लाल मिरचीचा वापर केलेला आहे आणि तिखटाचा सुद्धा वापर केलेला आहे…. त्यामुळे भाजीला अत्यंत लाल असा रंग येतो आणि आपली तरी तयार होते भाजी शिजू देताना आपण अर्धवट झाकण ठेवावे म्हणजे भाजीला चांगला तवंग येतो…
वेळ व परिमाण::
तयारीची वेळ:१० मिनिटे
एकूण वेळ:३० मिनिटे
परिमाण:४ व्यक्तींसाठी
