शेवांची भाजी

by Vaishali Chaudhari

शेवांची (हिरवी) भाजी


प्रस्तावना:

शेवांची हिरवी भाजी ही खान्देश भागातील भाजी आहे.
शेवांची हिरवी भाजी ही ज्वारीच्या भाकरी सोबत किंवा बाजरीच्या भाकरी सोबत एकदम रुचकर लागते.


साहित्य:

  • १ वाटी शेव,
  • एक लहान कांदा,
  • दहा खोबऱ्याचे काप
  • पाच हिरव्या मिरच्या
  • थोडी कोथिंबीर,
  • एक चमचा शेंगदाणे,
  • हळद
  • जिरे मोहरी
  • फोडणीसाठी तेल
  • मीठ
  • एक ग्लास गरम पाणी,
  • सात ते आठ लसूण पाकळ्या
  • अर्धा इंच अद्रक तुकडा


कृती:


प्रथम आपण कांदा बारीक चिरून घ्या.

गरम तव्यावर चिरलेला कांदा खोबऱ्याचे काप आणि मिरच्या गडद तांबूस होईपर्यंत भाजून घ्या.

नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजलेले शेंगदाणे कांदा, खोबरं अद्रक लसूण आणि कोथिंबीर थोडे पाणी घालून बारीक अशी चटणी करून घ्या.

एका कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये जिरे मोहरीची फोडणी घाला.

त्यामध्येही केलेली चटणी घाला चटणीला तेल सुटेपर्यंत परतवा.

चटणीला तेल सुटल्यानंतर त्यामध्ये एक ग्लास गरम पाणी घाला भाजीला चांगली चार ते पाच उकळ्या येऊ द्या.

भाजीला उकड्या आल्यानंतर त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घाला वरून चिरलेली कोथिंबीर घाला.

आता गॅस बंद करून एक वाटी शेव घाला आता आपली शेवांची हिरवी भाजी भाकरी सोबत खाण्यास तयार आहे.


टिप्स:


भाजी बनवताना आपण शेंगदाणे खोबरं तसेच कांदा गडद तांबूस रंगावरून यासाठी भासतो की त्याची चव चांगली लागते.


वेळ व परिमाण:-


तयारीची वेळ :१० मिनिटे
एकूण वेळ :३०मिनिटे
परिमाण :२ जणांसाठी

You may also like

Leave a Comment

अन्न हे पूर्ण ब्रम्ह
सर्वाना नमस्कार
• अन्न हे केवळ पोटभरण्यासाठी नसून ते एक पवित्र आणि आवश्यक गोष्ट आहे, ज्यातून जीवन जगण्यासाठी ऊर्जा मिळते
• अन्न हे जीवन जगण्याचा आणि ऊर्जेचा मुख्य स्रोत आहे. ते शरीराचे पोषण करते आणि स्वस्थ आरोग्य सुधारण्यास मदत करते.
• अन्न ग्रहण करताना आपण अन्नचा आदर केला पाहिजे. हळू खाणे, त्याची चव घेणे आणि कृतज्ञता बाळगणे हे महत्त्वाचे आहे.
• ‘पूर्ण’ म्हणजे संपूर्ण आणि ‘ब्रह्म’ म्हणजे निर्मिती किंवा वाढ. या वाक्यातून अन्न हे केवळ पोट भरणारे नसून ते एक दैवी देणगी आहे.
• योग्य आणि पौष्टिक अन्न घेतल्याने शरीर निरोगी राहते. तसेच, अन्नाचा आदर केल्याने मानसिक शांतता मिळते.
आज विविध प्रसार माध्यमातून अनेक पुस्तके, youtube video, reals, कार्यक्रमाच्या मध्यमातून अनेक व्यंजनाच्या पाककृती आपणास बघायला मिळतात.
ह्या वेबसाइट च्या माध्यमातून महाराष्ट्रीयन खाद्य संस्कृती मधील व्यंजन बनविण्याची ते ही पारंपरिक पद्धतीने बनविण्याची कृती याद्वारे आपल्या पर्यन्त पोहचविण्याचा प्रयत्न करीत आहोत. याचा उपयोग निश्चितच पूर्ण ब्रह्माचा आस्वाद घेण्याऱ्या खव्वये, यांना होईल.

Visitor’s Counter

4331

© 2025 All Rights Reserved | Developed by Vaishali Ajay Chaudhari & Amol Gopal Zambare. || Maintenance by A2Z Web Solutions.