शीर खुरमा

प्रस्तावना:::
हा पदार्थ ईद सणासाठी तयार केला जातो… आपण गोड म्हणून हा स्वीट मध्ये खाऊ शकतो….
साहित्य::
- अर्धी वाटी बारीक शेवया
- चार ते पाच काजू
- चार ते पाच बदाम
- अर्धी वाटी बारीक खोबऱ्याचा कीस
- अर्धी वाटी खारीक पावडर
- एक चमचा भर तूप
- एक वाटी दूध
- 1/2 वाटी साखर
कृती:::
काजूचे तुकडे करून घ्या बदामाचे सुद्धा तुकडे करून घ्या… तुमच्याकडे खोबरं असेल तर ते खोबरं बारीक किस किसून घ्या………
साधारण अर्धी वाटी किस आपल्याला लागेल… खारीक तुमच्याकडे अखी असेल तर ती कुटून मिक्सरमध्ये अगदी बारीक पूड करून घ्या….
सर्वप्रथम कढई एक चमचा तूप घालून गरम करा.. तूप गरम झाले की त्यामध्ये शेवया घाला… शेवया ह्या अत्यंत तांबूस रंगावर परतून घ्या….

शेवया चांगलं तांबूस रंगावर परतल्यानंतर खोबरा कीस खारीक पावडर काजू-बदामाचे काप… घालून चांगले परतवून घ्या.. …….
मिश्रण चांगले परतले की त्यामध्ये तुम्ही एक वाटी दूध घाला… आणि अर्धी वाटी साखर घाला… आता आपल्याला थोडे झाकण ठेवून शेवया च्या तीन ते चार मिनिटे शिजवून घ्यायच्या आहे…

शेवया चांगल्या नरम झाल्या की गॅस बंद करावा… तुम्हाला मिश्रण जर घट्ट वाटत असेल तर तुम्ही अजून एक वाटी त्यामध्ये दूध घालू शकतात…

तसेच मी इथे काजू बदामचे चे प्रमाण वापरलेले आहे त्याऐवजी तुम्ही जास्त काजू बदामची पूड त्यानंतर पिस्त्याची पूड सुद्धा वापरू शकतात….
त्यामध्ये वेलची पूड सुद्धा तुम्ही घालू शकतात…
आपला गरमागरम शीर खुरमा तयार झालेला आहे….

टिप्स::
शीरखुर्मा शिजवताना त्यामध्ये मनुका घालू नका… दूध नासण्याची शक्यता असते….
